हरवलेले ते शब्द, मी शोधत असताना
मला ते शब्द आज प्रतिलिपीवर व काव्यपुष्प वर भेटले
आज माझ्या मुलीचा वाढदिवस दिसला तो
भाव भावनांचा झर्यात ते शब्द विहार करतांना दिसले..!
ही प्रेमाची शब्दरुपी सरिता आज
माझ्या अंगणी वाहतच आली जणु
कल्पनाताई,कोमुताई,अनिलदादा,देव सरांचे
मी आज आभार कसे बरे मानु.!
भावना तयांनी शब्दात मांडुन
वात्सल्य,आपुलकीची गुंफन
शब्दरुपी भावनेत अशी मांडली
जशी माया भुमिकाविषयी त्यांची मनातुन सांडली.!
अनेक माझ्या बंधु आणि भगिनींनी
समिक्षेरुपी आशिर्वाद आज माझ्या लेकीस दिले.!
प्राजक्तरुपी फुलाची बहरच जणु आज माझ्या दारी बहरली.!
जणु प्रेमाची आभाळमायाच आम्हावरी अवतरली..!
आयुष्यात कुठेही असो मी
कधी विसरणार नाही मी हा लळा.!
लेकीच्या पुढच्या आयुष्यासाठी तुमचे आशिष कामी येईल.
तुमच्या शब्दाने दाटुन आला माझा गळा!
खुप खुप धन्यवाद सवाॅचे ज्यांनी माझा व माझ्या लेकीचा व माझ्या कुटूंबाचा दिवस अविस्मरणीय असा केला..!
🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🙏😊😊😊
मोहन सोमलकर 🙏🍫😊

