* * * * * * कवी-मोहन सोमलकर
मोहन सोमलकर
मोहन सोमलकर
कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.
शनिवार, ५ जुलै, २०२५
सातपुडा साहित्य मंच..
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम
*विषय- विठूची वारी (अभंग)
शीर्षक:- माझे माहेर पंढरी
चला पंढरीला।। विठ्ठलाला पाहु॥
भक्तीभाव वाहु॥ पांडुरंगा॥१॥
आषाढी कार्तिकी॥ भक्त होई गोळा॥
रम्य तो सोहळा॥ पंढरीत ॥२॥
चंद्रभागे तीरी॥ भेटे वारकरी॥
किती टाळकरी॥ दिसे तिथे॥३॥
वैष्णवांचा मेळा॥ आगळा वेगळा॥
सुखावला डोळा॥ पाहुनिया॥४॥
युगे अठ्ठावीस ॥ उभे विटेवरी॥
कर कटावरी॥ पांडुरंग ॥५॥
तुळशीचा हार॥ गळ्यात शोभतो॥
विठ्ठल हासतो॥ भक्तापुढे॥६॥
हाती टाळ विणा ॥ मुखात अभंग॥
भजनात दंग॥ वारकरी॥७॥
हर एक वर्षी ॥ पंढरीला जावे॥
मुख ते बघावे॥ श्रीहरीचे॥॥८॥
पाहुनिया सारे॥ वाटे मोहनाला॥
जावे दर्शनाला॥ पंढरीला॥९॥
||रामकृष्ण हरी||
मोहन सोमलकर नागपूर 🙏
गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३
लळा जिव्हाळा(हायकू काव्य)
लळा
लळा जिव्हाळा
लाविला दहा वेळा
जीव ओतिला!
मन जुळले
प्रेम मला कळले
मनी फुलले!
जशी फुलावी
देठावर ती कळी
छान पाकळी!
तशी प्रितीची
फुले ती बहरली
मनी रुजली..!
मोहन सोमलकर नागपूर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
ads3
सातपुडा साहित्य मंच..
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
-
काव्यपुष्प समुहातील अनमोल मोती My gallery काव्यपुष्प एक माध्यम आहे,एक व्यासपीठ आहे. प्रतिभावंताला साहित्याच्या दालनात मोठे करणसाठी..! My g...
-
my gallery जागतीक पुरुष दिन अस्तित्व मी माझे आरश्यात पाहतो जरी दु:ख ,वेदना,अडचणींचा डोंगर ठाकला ना घाबरलो कधी वादळातुनी वाट काढुनी सारी...
-
या नभी एकच आवाज बुलंद होत राहील शब्दांचा थवा नभी सदैव उडत राहिल.! गुंफावे काव्यपुष्प जुळावे साहित्यप्रेमी एकच ध्यास होता आबांच्या मनी...
