मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

गुरुवार, २४ मार्च, २०२२

जाणता राजा

 

My gallery 



जाणता राजा 


महाराष्ट्राचे कुलदैवत राजे आमुचे

छत्रपती शिवाजीमहाराज ते श्रेष्ठ 

शुरविर बलाढ्य,धूर्त डोकेबाज 

शत्रुचा समोर ना चाले आवाज 

गनिमीकाव्यातुन लढले ते

रणांगणावर जिंकलेत 

मुठभर मावळ्यांनीच

 साथ देत जिंकविले

जिद्दिने लढुनिया

मराठी रक्त ते

खवळलेले

पाहुनच 

इंग्रज

गेले

ते


मोहन सोमलकर

बुधवार, २३ मार्च, २०२२

शहिद दिवस (२३ मार्च)


 धन्य धन्य त्या माता 

जयजयकार त्यांचाही करा या भुवरी 

वीर जवान ऐसे त्यांनी जन्म घातले.!

रुधीर त्या क्रांतिकारांचे मायभु साठी अर्पिले.!


भारतमातेला आपली खरी आई मानुनी 

स्वराज्याला मानला आपला पिता

राजगुरु,सुखदेव आणि भगतसिंग देशासाठी जन्मले

एक एक क्षण आपला देशासाठी अर्पिला ऐका त्यांची गाथा!



लोक साजरी करत होते दिवाळी 

विर पुत्र खेळत होते रक्ताची होळी

लोक बसले होते सुखरुप आपल्या घरी

शुरविर क्रांतीकारी झेलत होते छातीवरी गोळी.!


आज याद करा तयांची कुर्बानी 

आईने तयांच्या त्याग मातृत्वाचा केला

पोटचा गोळा आपुल्या 

देशावर नौछावर केला..!


धन्य धन्य त्या माता 

त्यांच्याही देशाने सन्मान करावा 

राजगुरु, सुखदेव व भगतसिंगासारखे थोर पुत्र दिले

रक्त जयांचे मायभूसाठी सांडले, त्यांचा जयघोष करावा!


लावा जयहिंद चे नारे 

शहिदांना त्या,  विभुतींना त्या द्या आदरांजली 

सदा माथ्यावरी कफन बांधुन निघायचे जे 

अशा थोर वीरपुत्रांना अर्पित  करा सुमनांची अंजली.!



जबतक सुरज चाॅद रहेगा.!

राजगुरु,भगतसिंग, सुखदेव, खुदीराम बोस, मदनलाल धिंग्रा, बटुकेश्वर दत्त,चंद्रशेखर आझाद तेरा नाम रहेगा...!



🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩

मोहन सोमलकर 

🙏🙏🙏जयहिंद 🙏🙏🙏

मंगळवार, १५ मार्च, २०२२

यशस्वी जीवन (शालान्त परिक्षा)

 

My gallery 

आजपासून " महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परिक्षा सुरु झाल्या. सगळ्याच विद्यार्थ्यांना या परिक्षेत सुयश लाभो. व सर्व विद्यार्थी ही जीवनाची पहिली पायरी यशस्वी रित्या ओलांडून पुढे जावे ,हिच मनोकामना.!

मुलांनो घेतली तुम्ही मेहनत
अभ्यासाचे धडे डोक्यात गिरवले
रात्रदिवस त्रास घेऊनी
अभ्यासक्रम पुर्ण केले..,!

आईवडीलांचे नाव उज्वल करा
कुटुंबाचे ,गुरुजनांचे होऊन नाव रोशन
डोळ्यात आनंदाचे अश्रु येईल दाटुन
मन जाईल आनंदुन

व्यर्थ ना जावी तुमची मेहनत
दाद द्यावी लागेल ,दिसली तुमची हिम्मत
देव पहातो परिक्षा जरी
त्याचीच असते रेहमत.!

नका डगमगून जाऊ
मेहनतीची कास धरा.!
शांत चित्ताने पेपर सोडवा
झेंडा यशस्वी जीवनाचा हाती धरा..!

मुलांनी खुप मेहनत घेऊन अभ्यास केला, त्यांना आधार द्या,त्यांना शांत मनाने बल द्या, त्यांचे मनोधैर्य वाढवा, पालक हो त्यांच्या डोक्यावरुन व पाठीवरून हात फिरवा.

धन्यवाद 😊🙏

मोहन सोमलकर


यशस्वी जीवन

 

My gallery 

वाट कष्टाची चालुनि

मेहनतीची कास धरुनि 

आम्ही श्वास इमानाने घेतो 

रात्रदिवस राबुनिया भाकर कष्टाची खातो.!


नको हवी महाल माडी

नको हवी घोडा गाडी

आई पाठीवरी हात फिरवे 

बाबा मुखातून कौतक करवे! 


वाट कष्टाची चालुनिया

श्वास आम्ही इमानाने घेतो

आम्ही आमच्या मुलाबाळांसमोर 

आदर्श आमच्या आईबापाचे ठेवितो


वाट कष्टाची चालुनिया 

जीवन सफल करितो 

आपल्या हिस्स्याची चटणीरोटी खाऊन 

पाणी पोटभर पितो.!


नाही डोक्यावर चिंता 

नाही कुणाचे दोन शब्द ऐकतो

कधी शेतात राबुन 

चेहरा आपला हास्याने फुलवितो


वाट यशस्वी जीवनाची 

अशिच आम्ही चालतो

एकत्र कुटुंब प्रणालीत 

आम्ही क्षण सुखाचे घालवतो.!



मोहन सोमलकर 



ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...