मोहन सोमलकर 🍁🍁🪴ओम साई 🙏
मोहन सोमलकर 🍁🍁🪴ओम साई 🙏
मेरे और उसके ऑख मे आसु आये थे.!
दोनो की ऑखे भर आयी थी..!
कभी ना ओजल ऑखो से जो होती थी.!
कभी ना वो रोती थी, सदा फुलो जैसी हसती थी..!
वो परियोकी सहजादी ...!
बिदाई के वक्त बिलगके बहोत रोई थी..!
मेरी बहना मेरे घर का गहना ..!
सदा सुहागन रहे..!
खुश रहे अपने घर..!
कभी ना आये ऑख मे आसु उसके..!
मोहन सोमलकर🍫🍫🍫🍫🍫💥🌿
मी मनातुन सर्वाचे अभिनंदन केले.!
आली माझी शाहिन ताई संपुर्ण मध्ये प्रथम पुन्हा एकदा.!
सुवर्णाताई मालपुरे मॅम व्यंग मध्ये प्रथम
शाहीनच्या डोक्यावर आशिर्वादाचे हात ठेवते अनेकदा.!
अभंग, सामाजिक मध्ये आपला सच्चु कांबळे अव्वल!
त्याच्या लेखणीत आहे सामाजिक बळ!
जीवन श्रेणीत
कमला हनवते प्रथम
डोळ्यातले अश्रु झाले नम.,!
शायरी, चारोळित
संयोगिता प्रथम आली.!
आनंदाची पर्वणी तिच्या अंगणी झाली.!
प्रतिलिपीवर मराठी साहित्य संमेलन मध्ये सोनाली वडनेरे मॅम दिसल्या
कवितेत पुन्हा त्या हसल्या.!
स्त्री विभागात
आपले रमेश चव्हाण सर झळकले
कमी व मोलाचं लिहितात
जसे ध्वजासारखे फडकले .!
प्रेम श्रेणीत
आज माझा नितिन शिंदे भाऊ आला.!
मुक्तपणे लिहतो रोज,
माझ्या ह्दयाला आज पाझर फुटला..!!
आध्यात्मिक श्रेणीत माझे "अनिल तापकीर "दादा आज चमकले.!
चेहर्यावरच दादांचा देव मला दिसले..!!
काव्यसंग्रहात आज अचॅनाताई म्हसकर प्रथम आल्या..!
नविनच आहे परिचय पण मला आनंद झाला.!
गजल,गझल
या दोन्ही श्रेणीत
मुश्ताक अली "शायर"
यांनी हजेरी लावली!
सदा त्यांनी या श्रेणीत
बाजी मारली.!!
बालसाहित्यात सोनाली पेडणेकर
आल्या आहे!
बालमनावर साहित्य त्यांचे प्रतिबिंबीत होत आहे.!!
मुक्तछंदात आपली दुर्गा मते बेटी आली
शब्दात तिने आपली छाप पाडली..,!!
सर्वाचे मनपुवॅक अभिनंदन
नावात किंवा आडनावात चुक भुल होऊ शकते
त्याबद्दल क्षमस्व 🙏🙏🙏🙏
अशीच सर्वानी उत्तरोत्तर प्रगती करावी. !
मोहन सोमलकर
👍👍👍👍👍👑👑👑👑👑👑👑👑🙏👑👑👑👑👑👑👑👑🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍁🍁🍁🍁🍁🍁😆🍁🦜🍬🍬🍬🍬🌿🌿🌿🌿🌿🌿🥈🌿🌿🥈

From Sharchat
॥ शहिदोके चिताओपर हरबरस लगेंगे मेले॥
॥वतनपर मरमिटेनेवाले का यही बाकी निशाण होगा॥
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
तु भारत का लाल
तु भारत की शान
मिली आझादी वतन को
दिया तुने पल पल बलिदान
उम्र कम थी मगर दिल मे जिन्दादिली थी..!
खुनकी होली खेलकर तुने अंग्रेजोकी शामत लाई थी..!
जितनी सासे तु जिया सिफॅ वतन के लिए नौछावर की..!
तेरे जिने का अंदाज अलग था, भगतसिंग.!
वो माॅ की कोख भी क्या थी..!
जिसने तुझ जैसा हिरा जन्मा था..!
व्यर्थ ना जाए बलिदान तेरा तु
हरपल याद आऐगा....!
हरबरस तेरे नामसे लगेगे मेले...!
शहिद भगतसिंग का नाम आदरसे हर जुबापे लिया जाऐगा....!
शहिद भगतसिंग जयंतीपर हर देशवासियोको बधाई...!
मोहन सोमलकर 🙏💥
आदरणीय प्रतिलिपी माई,
महोदया,
स.न.वि.वि.
महोदया, मी मोहन सोमलकर कवी, लेखक, नागपुर. तसा मी १९९७ पासुन लिहित आहो. मला काॅलेज मध्ये असतांना पासुन शीघ्र कवित्व प्राप्त झाले. मी अनेकांच्या नावावरती कविता त्यावेळेस लिहल्या होत्या. नाॅनस्टाप कविता ,शायरी मी करायचो, मी नागपुरात " धनवटे नॅशनल काॅलेज " च्या हाॅल मध्ये मोठ्या जनसमुदायासमोर "माझी मैत्रिचं नातं ही विनोदी वर्हाडी कविता सादर केली होती. पहिल्यांदाच सादर करत असल्यामुळेच माझे हात कापत होते. पण मी हिम्मत हारली नाही. पुर्ण कविता सादर केली. कविता एवढी सुंदर होती की, प्रचंड मला प्रतिसाद मिळुन मला टाळ्यांचा गडगडाट मिळाला. तिच माझी प्रेरणा ठरली. पुढे मी काॅलेजचे प्रतिनिधित्व करत तीन व्यक्ती " यवतमाळात, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने आयोजित केलेल्या, साहित्य सम्मेलनात सहभागी झालो व तिथे मंगेश पाडगांवकर सर, विठ्ठल वाघ सर, सुधाकर गायधनी सर .... हे सगळे भारताचे विख्यात कवी . यांच्यासमोर कविता सादर केली.
तिथे अनेक राज्यातील लोक कथा, कविता, शायरी सादर करायला आले होते. ते तीन दिवस साहित्यिक वातावरण पाहुन प्रचंड जनसमुदाय पाहुन सगळेच परतीच्या वेळेस भाऊक झाले होते.
माझे मित्र भोजराज साठवणे, प्रदीप मोटघरे, कवि कलाम यांची प्रेरणा मला कविता लिखाणात मिळाली.
मग आता मी वीस वषाॅनंतर प्रतिलिपी हे व्यासपीठ लाॅकडाऊनपासुन जाईन केले इथे मला खुप मित्र, माझ्या बहिणी, वरिष्ठ लोकांनी माझ्या लिखाणाला खुप प्रतिसाद दिला. मला भरभरुन प्रेम दिलं.
पण आता कुटूंब व नोकरीच्या व्यापापाई मी जास्त लिखाण करु शकत नाही.
आणि आता प्रतिलिपीवर विषयही बरोबर दिल्या जात नाही.
माझे प्रतिलिपीवर एकच स्वप्न आहे, ते म्हणजे एकदा तरी, संपुर्ण विभागात नाहीतर चारोळित प्रथम यावे. खुप दिवसांपासुन मी तसा प्रयत्न करित आहे. पण साध्य होत नाही.
ज्यादिवशी मी प्रथम येईल,तो दिवस माझ्या जीवनातला अनमोल राहिल.
मग मी प्रतिलिपी सोडुन देईल.
तोपर्यंत मी लिखाणावर भर देईल.
मला प्रतिलिपीवर जे प्रेम मिळाले, ते मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आबासर, येवला सर, आणि इतरही खुप लोक आहेत. ज्यांनी लिखाणात मला मोलाचे मार्गदर्शन केले.
त्या सर्वाना व प्रतिलिपीला मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही.
धन्यवाद
आपला लेखक
मोहन सोमलकर
नागपुर 🙏🙏🙏🙏🍁
==========================
Copyright ©️
तडजोड ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. दत्तु जोशी हे व्यक्ती दिव्यांग होते. मनाने साधे सरळ जीवन जगणारे. घरची परिस्थिती
साधारणच होती. एका मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्यात ते काम करुन आपली उपजीविका करत. त्यांच्या कायाॅवर घरातल्या मंडळींला खुप अभिमान होता.
त्यांच्या दिव्यांगतेवर त्यांच्या बायकोने कधीच प्रश्न केला नाही किंवा त्यांना कधीच कमीपणा भासू दिली नाही उलटपक्षी दत्तुजीची पत्नी महिला बचतगटा अंतर्गत पापड लाटायला एका ठिकाणी जायची. तेवढीच कुटुंबात मदत व्हायची.
दत्तु जोशींना एक मुलगी होती. गावापासून दुर सहा किलोमीटर दुर पायपीट करुन शाळेत जायची मुलगी रंजना अभ्यासात खुप हुशार होती. वगाॅत तिचा दरवर्षी पहिला नंबर यायचा . घरचे सवॅ कामे करण्यात आईला मदत करुन ती बाकी वेळेस, तर कधी रात्र जागून आपला अभ्यास
करायची.
दत्तुजीला आपली मुलगी पायपीट करुन शहराच्या ठिकाणी शाळेत जाते. त्यामुळे तिला त्रास सहन करावा लागतो व तिचा,जाण्यायेण्यात वेळही जातो.
याचे खुप वाईट वाटत होते. एक दिवस
त्यांनी त्यांच्या बायकोला मुलीसाठी जुनी सायकल घेऊ या. म्हणुन चर्चा केली.
सायकल घेण्यासाठी त्यांची पत्नी तयार झाली. जुन्या सायकलसाठी पैसे जमवाजमव सुरु झाले.
आपल्याला शाळेत जायला सायकल मिळणार या आनंदात रंजना खुप खुश होती.
ती आईला बिलगुन आनंद व्यक्त करु लागली.
एक दिवस तिचे वडिल शहरात जुनी सायकल घ्यायला गेले. शहरातील सायकलच्या दुकानात सायकल पाहुन तिची किंमत दुकानदाराला दत्तुजीने विचारली असता., दुकानदार दत्तुजीला भाव देत नव्हता. त्याने दत्तुजीला वागणुक बरोबर दिली नाही. हे कृत्य तिथुन जाताजाता गटविकास अधिकारी दुरुनच पाहत होते.
त्यांनी दत्तुजीची सवॅ शहानिशा केली. व त्वरीत त्या गरिब मुलीची शिक्षणाबद्दलची जिद्द पाहुन व वडिलांची मुलीला शिकविण्याची जिद्द पाहुन नविनच छान सायकल त्या मुलीला म्हणजेच रंजनाला घेण्याचे ठरविले.
अशाप्रकारे दत्तुजी जोशीचे मनोबल वाढवून गटविकास अधिकाऱ्याने त्या मुलीची व दिव्यांग वडिलांची पाठ थोपटून शाबासकी दिली.
व आदराने त्यांना नविन सायकल भेट करुन समाजात माणुसकीचे ताजे उदाहरण देऊन अजरामर केले....!
धन्यवाद !
समाप्त
=========================
लेखक:- मोहनिल (मोहन सोमलकर)
वो मेरे देश का सैनिक है
जिसके दिल मे और ऑखो मे
तिरंगा है..!
चुप्पी साधे वो सिमाप्रहरी
सीमापर खडा है..!
दिलमे और ऑखो मे नफरत नही.!
बंदुक से उसके गोली नही चलती...!
वो ऑखो से और दिलसे चलती है..!
वो मेरे देश का सैनिक है..!
मोहन सोमलकर 🙏
रमतो खेळात
![]() |
मस्तीत, मौजमजेत राहतो.!
नाही कुणाचे भय..!
सोनेरी किरणांचा जसा व्हावा उदय..!
नाॅटीबाॅय तु...!
आजीआजोबा,आतुमामाजीला, बडेपापा बडी म्ममी,दिदीला हैराण करतो..!
मोबाईल वरी व्हिडिओ गेम खेळतो
शाळेला लाॅकडाऊनपासुन मिळाली जेव्हापासून सुट्टी. !
अभ्यासासोबत झाली तुझी कट्टी...!
तुझ्याशी खेळायला तुझ्यासोबत सानादादा,
प्रेम, कान्हा बिटुकला एवढी मावळ्यांची फौज आहे..!
भरभरून वाढदिवसानिमित्त तुला शुभेच्छां.!🎈
खुप मोठा हो...🎈
नाव कमव..!🎈
आजीआजोबांचे..!🎈
आईबाबांचे, बडेपापा, बडीमम्मी 🎈
तुझ्या पाठीशी आहे..!
आतु मामाजी व दीदीचा तु राजदुलारा.!🎈
सगळ्यांच्या तु आहे प्यारा..!🎈
Happy birthday 🎂 to Rehanshu.🍫🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍫👑👑🍧🍧🍧💥🌱🌱🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
Mohan...Somalkar 🌱🎈
| From Google copy |
बहरला पळस
प्रेमाचा कळस...!
पहाटेसमयी तुलसी मातेचे दर्शन होता. दारी बहरतो पळस ,प्रेमाचा कळस गाठल्या जातो.
सुप्रभात, सर्वाना..!
मोहन सोमलकर
💚🧡💚🧡💚🧡💚🧡💕🌺
मै भुका धन दौलत का नही
मुझे प्यार चाहिए, इज्जत के मिठे बोल चाहीए
मुझमे लालची प्यास शौहरत की नही..!
बस तुम्हारे दिल मे मुझे ठहराव चाहिए..!!
🍁💚🧡🍁🌱🧡🍁😊😊🧡💕
मोहन सोमलकर 😊
दायित्व कन्या वाचविण्याचे कोण घेणार
शब्दरुपाने ती तर नेहमीच पानोपानी सजणार
!
खरा मान, खरे रक्षण तिला कधी मिळणार
शिल या भारतभूवरी तिचे कधी वाचणार
नुसता नको मान फक्त कन्या दिवसाचा
तिला सन्मान द्यावा सदा या भुवरी मातेचा
जो पर्यंत हा विचार मनोमनी रुजणार नाही
तो पयॅत या भारतभूवरी कन्याला सन्मान मिळणार नाही..!
मोहन सोमलकर 🙏🌿🌱
🌺
*मन म्हणजे काय हो.?*
*त्याला कोणी पाहिलं नाही,*
*कसं असते ते माहीत नाही,*
*पण त्याला खूप मान्सनमान असतो.*
*कधी ते लिक्विड असतं,*
*"मन भरलं नाही"*
*असं म्हणतो आपण,*
*कधी ते सॉलिड असतं,*
*मनावर खूप ओझं आहे,*
*कधी ते घर होतं,*
*मेरे मन में रहने वाली,*
*कधी ते तहानलेल असतं,*
*मेरा मन तेरा प्यासा,*
*कोणी त्याला मोरा ची उपमा देतं,*
*मन मोराचा कसा पिसारा फुलला !!*
*असं हे मन आयुष्य भर,*
*आपल्याला झूलवत ठेवतं,*
*कधी स्वतःच्या मनाने तर,*
*कधी दुसऱ्याच्या मनाप्रमाणे,*
*आपण वागत असतो,*
*हे "मन" कधीच स्थिर का बरं नसतं.?*
*ते कधी प्रेयसीच्या तोंडातून,*
*मंदिर रूप धारण करतं,*
*आणि ती म्हणते...*
*"मन में तुझे बिठाके,*
*काही जण असतात की,*
*त्याच्या "मनात"काही रहात नाही,*
*तर काही "मन कवडे" असतात.*
*मन दिसत तर नाही.*
*पण त्याने ठरवले तर ते हरवून टाकतं.*
*तर कधी शक्ती नसताना जिंकून ही देतं.*
*मनात आणलं तर काहीही होऊ शकतं,*
*जरी त्याला कोणी पाहिलेले नाही,*
*तरी ते जर चांगलं असलं,*
*तर आपण आनंदी राहतो.*
*दुसऱ्याचं भलं करतो म्हणुन,*
*म्हंटलं जातं, "मन चंगा तो...*
*कधी हे खूप डेंजर असतं,*
*स्वतःकडे राग तिरस्कार साठवून ठेवतं,*
*आणि "मनातील" राग दुसऱ्याचे नुकसान करतं.*
*याचा वेग मोजण्याचं यंत्र अजून,*
*अस्तित्वात आलेलं नाही,*
*तरी लोकं म्हणतात,*
*"मनाचा ब्रेक,उत्तम ब्रेक,*
*"मन" दिसत नसलं तरी,*
*तेच आपणाला घेऊन फिरत असतं,*
*कधी घरी,कधी डोंगरदऱ्यांत,*
*कधी आकाशात,*
*पण ते निर्मळ असतं,*
*पारदर्शक असतं.*
*म्हणुन च आपण म्हणू शकतो.*
*"मोरा मन दर्पण कहलाये."*
*अशा या न दिसणाऱ्या,*
*पण सर्वस्व असणाऱ्या,*
*"मनाला" काबूत ठेवण्याचा,*
*अनेकजण प्रयत्न करतात.*
*पण "मनाप्रमाणे" जगता आलं नाही,*
*तर त्याला काही अर्थ आहे का.?*
*मग "मनसोक्त" जगा ! !*
*आणि त्यासाठी...*
*मनापासून शुभेच्छा...!!* *आपला दिवस आनंदात जावो!!*
🙏🏻🌹🙏🏻
*श्री. मोहन अवधुतराव सोमलकर!
![]() |
आबा आहे सवॅस्व ग्रुपचे
![]() |
सवॅत्रच त्यांची नजर असते
कितीही असो कामात
दृष्टी सर्वावरच असते..!
सर्व शक्तिमान आबा
अजुनही तरुणांपेक्षा तरुण आहे
कोणत्याही समस्या असो
त्याचे समाधान करुन आहे..!
काव्यपुष्पचा हा डोंगर त्यांनी
सहज रितीने पेलला आहे.!
तो वटवृक्षच आहे आबा
त्यांनी प्रगतीचा झेंडा हाती धरला आहे.!
आम्ही त्यांचे मावळे
ते आमचे शिवबा आहे.!
साथ सदैव आम्ही देऊ
ही आमची शिव प्रतिज्ञा आहे..!!
मोहन सोमलकर 🙏🙏🙏🙏🌱🌿🌿😊
.
ती एक सखी जिच्या स्वरात मधुरता होती
विरहात,वेदनेत, दुःखात होरपळलेली होती
पण कधीच तिने दुःख दाखविले नाही
काव्यातुन मुक्त होत गेली, ती एक धैयवान स्त्री होती.!
मोहन सोमलकर 👍👍🌿🌱
सुमधुर वारा गार वाहे
अंगणात फुलाचा सुवास दरवळे !
तेजाचे किरण पडतिल दारी
सुप्रभात रानोमानी झाली, गंध दरवळे..!!
मोहन सोमलकर
🌿🌿🌿🌿💕🌱💕🌱
जे उरलेलं ते मिळवलं
नाही जे हाती ते गमवलं !
जीवनाच सुत्र बिघडलं
चांगलं तेच मी निवडलं!!
मोहन सोमलकर 🙏☺🙏
वेळ आहे का बोलायला
कधी नसतो वेळ बोलायला
जेवढा तंत्रज्ञानाचा विकास
आयुष्य गुरफटत जाते भोवती
जीवन सवाॅचे झाले भकास
पूर्वीचे जीवन खळखळता झरा होता
सुखदुःखात मनुष्य उभा होता
एकमेकांप्रती सलोखा होता
प्रत्येक जण ह्दयी गोतावळा सांभाळत होता.!
आता माणुसच माणसाचा वैरी झाला.!
एकमेकातला संवाद संपला
जिथे तिथे माणुस मोबाईल मध्ये हरवला.!
नात्यात दुरावा वाढतच गेला.!
सगळेच शाॅटकटच्या मागे धावु लागले
खरे आयुष्य जगणे विसरू लागले
बोलणे एकमेकांशी टाळु लागले
मोबाईल मध्ये तोंड खुपसुन राहु लागले.!
लग्नात,समारंभात पंक्ती उठायच्या.!
थट्टा मस्करी करित पंक्ती वाढायच्या.!
श्लोक जेवणाच्या सुरुवातीला
मस्तपैकी मुखाने मैफिली वदवायच्या.!
चेहरे फुलावाणी बहरायच्या.!
गेली ती गमंत जमंत
गेली सारी थट्टा मस्करी
पारावरची मैफिल गतकाळात विलिन झाली
ती पिढीच आता लुप्त झाली..!
संवादाचे झाले modernisation!
भाऊच भावाशी बोलत नाही
Friend request पाठवुन तो next generation चे पाळतो सारे नियम.!
पिता वयोवृद्ध ते झाले
मुलासोबत संवाद साधायला आतुरलेले
ताटावर बसल्यावर एका हाती टि.व्हीचा रिमोट
दुसर्या हाती मोबाईल धरले
बाप बिचारा केविलवाणा झाला
बोल मनातला हरपुन गेला
जन्म दिला ज्या मुलाला
तो विज्ञानयुगी व्यस्त झाला..!
मोहन सोमलकर 🙏🏼🙏🏼🙏🏼💐
![]() |
| माणुस माणसाला विसरत चालला..! |
॥मुली तु भांग्यवंत हो,यशवंत हो
नवनवीन किर्तीमान स्थापित कर.॥
अवघ्या सहा वर्षाची असताना ती पहिल्यांदा पाण्यात उतरली हळूहळू स्विमींगमध्ये रुची वाढत गेली पदका मागून पदके जिंकत गेली आणि थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आज तिच्याकडे तब्बल दोनशेच्या वर पदके आहे.
एका स्पर्धेत सर्वाधिक सहा पदके जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम तिने करून दाखविला.
नागपूरचे भूषण ठरलेली ही जलतरणपटू आहे ऋतुजा तळेगावकर..! वीस वर्षीय ऋतुजा ठरवुन स्पोर्ट्स मध्ये आली नाही. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये नागपुरच्या, रघुजी नगर मधील कामगार कल्याण केंद्रावर समर कॅम्प मध्ये आली असता तिला बाजूच्या स्विमिंग पूल मध्ये मुले मुली शिकत असल्याचे दिसले.
हा खेळ आवडल्याने तिने आईकडे हट्ट धरला. ऋतुजा च्या इच्छेचा मान राखत आईने तिला स्विमिंग मध्ये टाकले .आणि तिथूनच खऱ्या अर्थाने दिला मॅरेथॉन प्रवास सुरू झाला अनुभवी प्रशिक्षक संजय बाटवे पाटील यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या ऋतुजा ने अल्पावधीतच आपली गुणवत्ता सिद्ध केली शालेय व महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याचा सुरु झालेला सिलसिला आजपर्यंत कायम आहे .जवळपास बारा वर्षाच्या कारकिर्दीत ऋतुजा आणि विविध स्पर्धांमध्ये 100 सुवर्णपदकासह दोनशेच्या पदके व ट्राफिज जिंकले आहे. दोन वर्षापूर्वी जालंधर( पंजाब )येथे झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत मिळवली तीन सुवर्णा सह जिंकेलेली विक्रमी 6 पदके तिची राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम कामगिरी ठरली. राष्ट्रीय तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात आजवरचा हा विक्रम आहे. उल्लेखनीय म्हणजे देशभरातील 68 विद्यापीठांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत ऋतुजा आणि दुसरी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळवला आहे .ऋतुजा चा प्रेरणादायी प्रवास एवढ्यावरच थांबला नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने दोनदा झेप घेतली. 2018 मध्ये इजराइल मध्ये झालेल्या वर्ल्ड जूनियर चॅम्पियनशिप व त्यानंतर 2019 मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई ओपन वाटर चॅम्पियनशिपमध्ये तिने देशाचे प्रतिनिधित्व केले .डॉक्टर आंबेडकर कॉलेजमध्ये बीकॉम ची विद्यार्थिनी असलेल्या ऋतुजा ला भविष्यात आशियाई किंवा संधी मिळाल्यास ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकवला आहे.
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणे सोपी गोष्ट नाही याची तिला जाणीव आहे .मात्र स्वप्नपूर्तीसाठी मेहनतीची तिची पूर्ण तयारी आहे .तर प्रयत्नांची पराकाष्टा असेल तर कोणतेही जग जिंकता येते. आकाशात भरारी मारता येते, हे तिचे स्वप्न पूर्ण व्हावे. असे प्रत्येक नागपूरकरांना वाटत आहे. तिच्या यशामागे तिची आई तिचे कुटुंब सर्वस्वी पाठिंबा देत आहे. आणि आम्ही नागपूरकर सुद्धा तिच्या यशाच्या मागे कौतुकाने पाठ थोपटत आहोत .
अशीच ती सदैव भरारी मारत राहो, आणि नागपूरचे व भारत देशाचे नाव उज्वल करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.!
"ऋतुजा ला अगदी पहिल्या दिवसापासून मी पाहत आलोय. तिच्यात भरपुर टॅलेंट आहे. बारा वषाॅत दोनशेच्या वर पदके जिंकून तिने हे सिध्दही करुन दाखविले आहे. तिची सिनियर गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असुन, अशीच मेहनत आणि सातत्यपूर्ण कामगिरी राहिल्यास नक्कीच तिचे स्वप्न पुणॅ होईल.
एक प्रशिक्षक... श्री. संजयजी बाटवे सर
========================
श्रीयुत संजयजी बाटवे सरांबद्दल काय सांगायचे ,ते स्वतःच अष्टपैलु व्यक्तीमत्व आहे. ते प्रशिक्षक म्हणुन या क्षेत्रात गेल्या कित्येक वर्षांपासून जगविख्यात आहे. त्यांच्या या यशाच्या मागे त्यांची सहचारिणी व माझी शालेय मैत्रीण सौ. कुंदा संजयजी बाटवे हिचा व दोन मुलांचा सहवास आहे.
संजयजी बाटवे सरांची आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षक म्हणून ख्याती आहे.
रोजच त्यांच्या कार्याबद्दल महती सांगणारे लेख नागपुर व महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात प्रकाशित होतात.
रोजच कुटूंबाच्या दुर राहुन मुलांना स्विमिंगसाठी राज्यस्तरीय, देशव्यापी,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण देणारे संजयजीला स्वतः कितीतरी मॅडल, प्रमाणपत्र शासनाकडून मिळाला आहे.
त्यांचा हा प्रवास असाच अविरत चालु रहावा व ते देशाला उत्कृष्ट दर्जा चे स्विमर देत राहो. हिच ईश्वर चरणी प्राथॅना.
🙏🙏🙏🙏🌿🎊🎊🎊
संजय बाटवे...!🌱🌱🌱
(ऋतुजाचे प्रशिक्षक व माझ्या मैत्रीणीचे यजमान )🌺🌺🌺

मोहन सोमलकर 🌺🌺
शब्द माझे मुके झाले(पंचाक्षरी)
वाद संवाद
संपला आता !
शब्दच मुके
झालेले स्वतः !!
मैफिल बंद
हवाही कुंद !
शोधावे देव
देऊळ बंद !!
निरव शांत
स्मशान झाले !
कोलाहल तो
बोल मुकले !!
दु:खाचा सुर
जिथे तिथेच !
मुकेच शब्द
भाव सदाच.!!
भाव नयनी
नाही उरले !
स्नेहाचे दिप
सारे विझले..!!
शांत किनारा
![]() |
| मुके शब्द झाले |
समुद्र शांत !
मुक लाटाही
मुक प्रशांत !!
मोहन सोमलकर 🙏🏼
मैफिल तेरे नाम से हम सजाते है..!
सजाते है , बरखास्त करते है...!
दावते रोज रोज देते है..!
तेरे नाम से याद तुझे करके
मैफिल सजाते है...,!
रुपडे तुझे पहावे
प्रितीसागरी तुझ्या न्हावे
ऐसे नशीब माझे नाही
रात्रंदिन झुरत फक्त बसावे.!
मोहन सोमलकर 🙏🙏🙏🙏🍫
वै द्यकीय क्षेत्रातली तुझी गगनभरारी
मे घांचा पाऊस पडावा जणु तुझ्या दारी
घा व तु घातले यश, मेहनत व कष्टा वरी
रा ज केले तुझ्या बुध्दीकौशल्याने भूवरी
ज य जयकार तुझा प्रत्येक क्षेत्रात, निनाद तरी!
ज गणे फक्त आयुष्य, ध्येय तुझे ना इथवरी!
ग गनात मारिली हर क्षेत्रात तु आज भरारी.!
![]() |
| ॥॥वाढदिवस॥॥ |
ता बा मनावर ठेवून यश,किर्ती करे तुझ्या घरी चाकरी!
प दवी मोठी वैद्यकीय क्षेत्रात, नावलौकिक तुझे खुप, तू यशाची आहे मानकरी.!
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
माझी मैत्रिण, बहीण,गुरु वैद्य. सौ. मेघा राजेंद्र जगताप हिचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने तिला हे काव्यपुष्प मी बहाल केले. जिचे संपुर्ण नाव सुरुवातीला आले.
हे मी माझे मित्र व श्रेष्ठ कवि. अनिल तपकिरांच्या पध्दतीने लिहले. वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन
वैद्य. मेघा राजेंद्रजी जगताप 🌿🌿🙏🙏🙏🌺
मोहन सोमलकर 🙏🌿🌿🎉🎉
हरवलेले ते शब्द, मी शोधत असताना
मला ते शब्द आज प्रतिलिपीवर व काव्यपुष्प वर भेटले
आज माझ्या मुलीचा वाढदिवस दिसला तो
भाव भावनांचा झर्यात ते शब्द विहार करतांना दिसले..!
ही प्रेमाची शब्दरुपी सरिता आज
माझ्या अंगणी वाहतच आली जणु
कल्पनाताई,कोमुताई,अनिलदादा,देव सरांचे
मी आज आभार कसे बरे मानु.!
भावना तयांनी शब्दात मांडुन
वात्सल्य,आपुलकीची गुंफन
शब्दरुपी भावनेत अशी मांडली
जशी माया भुमिकाविषयी त्यांची मनातुन सांडली.!
अनेक माझ्या बंधु आणि भगिनींनी
समिक्षेरुपी आशिर्वाद आज माझ्या लेकीस दिले.!
प्राजक्तरुपी फुलाची बहरच जणु आज माझ्या दारी बहरली.!
जणु प्रेमाची आभाळमायाच आम्हावरी अवतरली..!
आयुष्यात कुठेही असो मी
कधी विसरणार नाही मी हा लळा.!
लेकीच्या पुढच्या आयुष्यासाठी तुमचे आशिष कामी येईल.
तुमच्या शब्दाने दाटुन आला माझा गळा!
खुप खुप धन्यवाद सवाॅचे ज्यांनी माझा व माझ्या लेकीचा व माझ्या कुटूंबाचा दिवस अविस्मरणीय असा केला..!
🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🙏😊😊😊
मोहन सोमलकर 🙏🍫😊
लिहु लागली पानावरती
मनातील भावना शब्द रुपाने
काकण तिच्या मनगटातले
किणकिणताना बोलू लागले
शब्दात ती रममान झाली
शब्द तर काकणात गवसले
पण काकण मात्र
किणकिण करु लागले...!
मोहन सोमलकर 🙏
जब खुशियाॅ लेती है अंगडाईयाॅ
सुख की बनती है लडियाॅ ( मालाये)
क्या खुब सुरत होती है वो घडियाॅ!
अलफाजो मे क्या बया करु वो खुशियाॅ.!
मोहन सोमलकर 🙏🎊
👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑तो क्षण, तो मुहूर्त , तो दिवस माझ्या जीवनातला सुवर्णमयी काळ होता.!
२३ सप्टेंबर २००४ रोज बुधवार ला माझ्या कन्येने जन्म घेतला होता.!👑
👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
जीवनात माझ्या आहे आनंदाची पवॅणी
एकच आहे कळी बहरलेली माझ्या अंगणी
जणु महालक्ष्मीच आली होती माझ्या अंगणी
महालक्ष्मीच्या जेवणाच्या दिवशी आली ती पाहुणी.!
धुंद वाहणाऱ्या सरितेची ती बहार होती.!
फुललेली कोमल जणु प्राजक्ताची ती कळी होती..!
मुलगी माझी नसावी ती
ती तर आहे एक माझ्या शरिराचाच भाग
डोळे रोज उघडावे माझे,पाहुनिया माझ्या परीच्या चेहरा येते मला जाग.!
ती आसमंतात चमकणारा एक तारा होती.!
माझ्या जीवनात आलेली मेघाची सर होती.!
रोजच बापलेक आम्ही भांडत असतो
एकमेकांची खोडी काढल्याशिवाय श्वास घेत नसतो..!
कधी जाते आजोळीला ती आईसोबत
घर माझे सुनेसुने वाटे..!
घरच्या चारभिंती दगडधोंडे वाटे.!
घास पोटात माझ्या जाईना
अंत:करण माझे माझ्या लेकीच्या आठवणीने दाटे..!
लेक माझी लाडली लय गुणाची
शिकुनसवरुन मोठी होईल नाव
कुटुंबाचे रोशन करेल
लोक म्हणेल, ही मुलगी आहे तरी कुणाची.!
माझा श्वास ती,
माझे सळसळते रक्त आहे ती.!
माय जात होती कतॅव्यावर
अंगाई गीत गाऊन झोपवले मी तिला खांद्यावर.!
शिकेल ती ,खुप तिचे नावलौकिक होईल
डाॅक्टर बनुन ती दिन दुबळ्यांची सेवा करणार
ऊंचच आकाशी झेप घेईल
तिच्या पंखात बळ आहे.!
गोरगरिंबासाठी तिच्या मनात आत्मियतेची कळ आहे..!
भुमिका माझ्या मुलीला आज वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा..!
👑👑👑👑👑👑👑👑👑🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨🍨
🍧🍧🍧🍧🍧🍧🍧🍧
🍬🍬🍬🍬🍬🍬🍬
🌺🌺🌺🌺🌺
🎊🎊🎊🎊🎊🎊
मोहन सोमलकर
HAPPY BIRTHDAY DEAR BHOOMIKA



काचा त्यांच्या चष्म्याची पुसटशी झाली होती, त्या चष्म्यातून त्यांना धुसरच दिसत होते. शर्ट जुनाट होता पण ,छान धुतलेला.....स्वच्छ केलेला होता....! पॅण्ट पण जुनाटच होता. पायातली चप्पल पुरतीच खालून घासुन घासुन पातळ झाली होती.
सायकल त्यांची खुप दिवसाची रक्ताचे नाते असल्यासारखी....! सहचारिणीची जागा घेतल्यासारखी सदैव साथ देत होती..!
अपार मेहनत करुन मुलाबाळांसाठी,त्यांच्या शिक्षणासाठी कवडी कवडी जमा करत, घरातही सरपणाचा प्रश्न सोडवत..! अनेक प्रश्नांचा बोजा आयुष्यभर डोक्यावर घेत घेत जीवन जगत. अनेक उद्भवणाऱ्या मनातील प्रश्नाला स्वतःच उत्तर देत व शोधत काका .... आपल्या सायकलींचे पायडल मारत आपल्या विचारात चालले होते. हा संसाराचा गाडा, हे मुलांसाठी चाललेले कष्ट, अजुन किती दिवस करावे लागणार.? माझ्या प्रश्नाचं, काही नाही करता येणार..? या प्रश्नाअंती ते एका कडुनिंबाच्या झाडाखाली थबकले...!
तेवढ्यात त्यांना एका मुलाने त्यांना थांबून आवाज दिला........! बाबा तुम्ही इथे काय करता..? आपल्याला कोण आवाज दिला म्हणुन काकांनी खाली असलेली मान वर केली व आपल्या धुसर चष्म्यातून त्या मुलाकडे पाहु लागले..?
मुलगा बोलला चला बाबा घरी मला लठ्ठ पगाराची नोकरी लागली...! आपण दगडुशेठ हलवाई कडुन तुमच्या पसंतीचा मैसुरपाक घेऊ...!
काकांच्या मनात उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नाचे उत्तर काकांना मिळाले होते...!
धन्यवाद
मोहन सोमलकर 🙏🙏🙏🌿
चहा आणि प्रेम
या विषयावर अशा अनेक कथा आपण लिहु शकतो. मला आठवते मी नुकताच बारावीची परिक्षा १९९२ला पास केल्यानंतर कोणत्या काॅलेज मध्ये अॅडमिशन घ्यायची आणि कोणते क्षेत्र निवडायचे हा विचार करीत असतांनाच .माझा एक जवळचा मित्र आपण कला क्षेत्रात अॅडमिशन घेऊन छान पैकी कथा, कादंबरी, निबंध लघु लेखन कविता इ. साहित्याचा आस्वाद घेऊ म्हणुन सांगु लागला.
झाले मग एकदाचे ठरले कला क्षेत्रात जायचे. अॅडमिशन झाली आणि काॅलेज सुरु झाले. त्यावेळेस प्रत्येकाकडे दोनचाकी गाडी फार निवडक लोकांकडे असायची. आणि असली तरी नुसते काॅलेज मध्ये जायला कुणी जास्त वापरत नसे. मग बाबांनी घेऊन दिलेल्या सायकलनी मस्त पैकी मी आणि माझा मित्र ५किलोमिटर अंतरावर असलेल्या काॅलेज घेऊन जायचो..
काॅलेज मध्ये जाणे आता नित्याचे चालु झाले. ५ कि.मी अंतर सायकल ने गाठल्यावर आम्ही काॅलेजच्या आधी थोड्या अंतराआधी एक छोटेसे चहाचे दुकान होते. तिथे चहा घेत बसायचो. चहा बनवणे वाल्या दुकानदाराचे नाव मधु होते. मधु शरीरयष्टी ने अगदी बारीक ४० ते ४२ वर्षे वयाचा असावा. शांत स्वभावाचा आपला चहा बनविण्यात गुंग असायचा. बसायला बाहार खुर्च्या दुकानावर शेड नाही. आपला एका डेबलावर स्टोव्ह ठेऊन त्यात राॅकेल भरुन हाताने पंप मारायचा. त्यावेळेस पाच पाच किंवा आठ ते दहा जणांची पुणॅ मित्रांची टोळी मधुचा चहा पिण्यासाठी तिथे बसायची.
मधु नावाप्रमाणेच प्रेमळ त्याच्या बोलण्यात साखेरेचा गोडवा घेऊन बोलायचा.
"मधुचा चहा" म्हणजे छान पुणॅ गंजात नुसत्या दुधात साखर अगदी मोजून, चहापत्ती, विलायची छोट्याश्या खलबत्त्यात कुटुन आणि अद्रक पण छान ठेचून ठेचून बारीक केलेले आणि मग तो चहा उकळुन त्याला मधुर असा पिण्यालायक बनवायचा.
तो चहा पिल्यानंतर,'असे वाटायचे जणु.....मधुने ......आपले प्रेम ओतले की काय असे वाटायचे. मित्रांची मैफिल सजलेली असायची. येणारा अजुन एखादा येऊन बसायचा.सकाळी सुरु झालेला मधुचा चहा संध्याकाळी अगदी ५ वाजेपर्यंत चालुच राहायचा. मधुचा चहा...घ्यायला ,"आजुबाजुला असलेले ऑफिस मधले लोक फार शौकीन झाले होते.... कारण मधु त्या चहात आपला जीव आणि प्रेम ओतत होता.......
कधी बोलता बोलता आम्ही दुसरे गिर्हाईक नसले आणि आम्हाला सवड असली की, मधु ला बोलते करायचो. त्याच्याबद्दल त्याच्या परिवारातील लोकांबद्दल जातीने विचारपूस करायचो. मग मधुही..... आम्हाला थोडा मिस्किलपणे चेहर्यावर हास्य आणित आपल्या मुलाबाळांबद्दल सांगायचा.... त्याच्या मधुर वाणीने आणि मधुर चहाने..... सवॅ विद्यार्थ्यांना निस्सीम अस प्रेम मिळाल होत...
त्यावेळेस च्या त्या १रु च्या "चहा" मध्ये आणि मधुच्या बोलण्यामध्ये जी गोडी होती... ती गोडी मला व ते मधुचे प्रेम काॅलेज पुणॅ होऊन ...........आज २० वषॅ लोटली...... पण कुठे भेटली नाही.......
ते मधुचे निस्सीम प्रेम व तो मधुचा चहा...... आम्ही मित्र कधिच विसरु शकणार नाही. ....🙏🙏🙏🙏
..................................
कथा कशी वाटली. ... अभिप्राय सांगावा
मोहन सोमलकर ☕☕☕🍵🍵
☕☕☕☕☕🌺🌺🌺🌺🌺
अनकही है कही बाते
शब्द मनाचा असतो ठेवा
भाव ओततो, वाटे मनी हेवा
कलमसे अल्फाजो को बंद करलु.!
आजाऊ आगोशमे नजरबंद करलु
मोहन सोमलकर 🙏🏼
आदमी( पुरुष) की तीन माॅ ये होती है..!
एक जो हमे जनम देती है...!
पालती है.....!
पोसती है..!
बडा करती है...!
□□□□□□□□□□□□□□□□□□□
दुसरी अपनी पत्नी होती..!
उसमेभी अपने माॅ का रुप है..!
जो जीवनभर हमे समजती,सहती है..!
अपने साथ जिन्दगी बिताती है..!
□□□□□□□□□□□□□□□□□□□□□
तिसरी अपनी बिटियाॅ रानी है
जो बुढापे मे अपनी लाठी होती है..!
सहारा होती, अपने को बच्चे जैसे संभालती..!
□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□
यही जिन्दगी है....!
You people got it.,...!
😊😊😊😊😊😊😊😊🙏💥😅😅💦
मोहन सोमलकर 🙏🍁
जब होता है इन्सान का जनम
तब उसकी तकदिर लिखी जाती है..!
इन्सान को वक्त से पहले और तकदिर
से ज्यादा कुछ नही मिलता..!
फिर क्यो आदमी इतना दौडधुप करता...!
जिन्दगी तु मुझे गम दे, खुशी दे,
मगर किसीके सामने हाथ फैलाने की नौबत न दे..!
दिल की कलम से लिखता हु....!
मन की शाई से लिखता हु...!
शब्दो मे जिता हु...!
शब्दो मे मरता हु...!
शाहिरी मे.... मै अपनी जिन्दगानी लिखता हु.!
अब सबके लिये.....!
रंजो गम के पहाड मिले..!
फुल के जगह काटे मिले..!
न डगमगाना, न हार मानना..!
वो तो अपना साहस,मन, और अपना धैर्य टटोलने को मिले...!
मै आपका शुक्रगुजार हु..!
जो मुझे आप जैसे लोग मिले..!
बरसात दु:खो की जीवन मे हो जाए..!
खुशियाॅ दुर चली जाऐ..!
हार न मानना कभी....!
ना जान कब कहाॅ..!
कोई मोड पर जिन्दगी
हसती मिल जाए...!
धन्यवाद!
मोहन सोमलकर 🙏🙏🙏🙏
असा अवकाळी नको येऊस
नको नुकसान आमचे करुस
यातना, दुःख मनाला नको देऊस
नको कुणाला असा छळुस..!
मोहन सोमलकर 💦👌🙏💞💞
आस तुझ्या येण्याची
लागे मनी दुरदुर !
मनात तु यावे
खुप लागे हुरहुर!!
आठवणीत तुझ्या
आसवांचे ओझे झेलतो
विरही तुझ्या मी
दु:खाचे आभाळ पेलतो!!
जेव्हा वाट बघावी तुझी
न यावा तू ,अश्रुच देऊन जातो
सरली जेव्हा तुझी आशा
दारात उभा राहतो...!
सुख माझे हरपले
दु:खच सदैव दिले!
नजर आसमंतात वळली
विरहातच निशेच्या हवाली झाले.!!
मोहन सोमलकर🙏
💦💦💦💦💦💦💦💦
ह्या कवितेत पाऊस आणि प्रियकराचे साम्य दशॅविले आहे. खुप मेहनतीने आणि बुध्दीकौशल्य दाखवुन दोघांचे साम्य जुडून आणले, समिक्षेसाठी कंजुषी करु नका🙏😊👍💦

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
हे श्याम, मेरे घनश्याम...!
मोहे अपने रंगमे ऐसा रंग दे..!
मै रंग जाऊ, मन मोह जाऊ
तेरे प्यार मे मुझे रंग.दे...!!
ना आये मोहे लाज
पिया पिया कहु तोहे
मोरी चुनर भिगी, मन भिगा
तेरे प्यार मे भिगी मोरी काया....!
बावरी हो कर नाचु मै
जैसे नाचे मोर बनमे !
तु है मेरा चितचोर
बसा हरदम मेरे मनमे..!!
मोहन सोमलकर 🍁🌿🍁🌿🍁
🦚💞🦚💞🦚💞🦚💞🦚💞🦚💞
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
हे श्याम, मेरे घनश्याम...!
मोहे अपने रंगमे ऐसा रंग दे..!
मै रंग जाऊ, मन मोह जाऊ
तेरे प्यार मे मुझे रंग.दे...!!
ना आये मोहे लाज
पिया पिया कहु तोहे
मोरी चुनर भिगी, मन भिगा
तेरे प्यार मे भिगी मोरी काया....!
बावरी हो कर नाचु मै
जैसे नाचे मोर बनमे !
तु है मेरा चितचोर
बसा हरदम मेरे मनमे..!!
मोहन सोमलकर 🍁🌿🍁🌿🍁
🦚💞🦚💞🦚💞🦚💞🦚💞🦚💞
प्रतिलिपीवरच भेट व्हायची
भेट कधी तरी घ्यावी रंजुजीची
मनात सदैव भावना दाटायची.!
पुष्कळदा प्रयत्न केला
योग कधी जुडून आला नाही
आज वेळात वेळ काढला
भेट झाली वेळचे भान राहिले नाही.!
मनसोक्त मारल्या गप्पा
ऊर्मिला ताई आणि त्यांच्या मिस्टरांशी
किती आपुलकी,जिव्हाळा, लळा दाखविला
नाते जुडले भावनेचे ह्दयात शंभर अंशी..!
गप्पाचा टप्पा गाठत गेलो
नुसते तिघेही बोलत राहिलो
मनात एकमेकाप्रति सलोखा वाटला
आयुष्याच्या गप्पात रंगत राहिलो..!
काढला त्यांच्या घरातुनि पाय
डोळ्यात अश्रु आले नाही
तरी अंतःकरण रडु लागले धायमोकळुन
गहिवर फुटे मनास अजुन बोलायची इच्छा पुरी झाली नाही..!
रंजुताईची आज थेटभेट झाली..!
😊😊😊😊🔥😊🙏🙏🙏🍁🍁🍁
मोहन सोमलकर 🙏
![]() |
| ॥ रेशीमगाठ ॥ |
स्नेहाच्या व आपुलकीच्या धाग्यात गुंतलेले
हा गुंता कधीही निघत नाही
नाते कधी तुटूत नाही,मनी रुजलेले..॥१॥
भाव मनाचा बहिणीसाठी
ह्दयातूनि रिता होतो,मनाच्या कोपर्यात साचतो
डोळ्यात असतो साचलेला,
दुःख झालेले असो, वा सुख...
अश्रु वाटे त्यावेळी तो ओघळलेला.!२॥
बहिण रक्ताच्या नात्यातली असो
वा असो मनाच्या नात्यातली
भावना तिच्या तेवढ्याच पारदशॅक असे...
जेवढं ओघाने वाहणाऱ नदीचे पाणी..॥३॥
हा अमूल्य ठेवा नेहमी जपावा
ह्दयातला एक तरी कोपरा !
ठेवावा रिकामा नेहमी
जशी आकाशाच्या प्रेमासाठी ठेवते धरा..॥४॥
मोहन सोमलकर 🌿🔥🌿
मी तुझ्या स्वाधीन मन केले
मी तुझ्या अधीन तन केले
सुत्रे आयुष्याची तुटे सारी
मीच वाया माझे धन केले
आता एकांत प्यारा झाला आहे
तुझ्या विरहात आगीत होरपळणे पसंद केले.!
मोहन सोमलकर 🔥🔥🌿🌿💞🔥🔥
मी तुझ्या स्वाधीन मन केले
मी तुझ्या अधीन तन केले
सुत्रे आयुष्याची तुटे सारी
मीच वाया माझे धन केले
आता एकांत प्यारा झाला आहे
तुझ्या विरहात आगीत होरपळणे पसंद केले.!
मोहन सोमलकर 🔥🔥🌿🌿💞🔥🔥
![]() |
| !! जय गणेशा !! |
॥ वक्रतुंड महाकाय सुर्य कोटी समप्रभ ॥
निर्विघ्न कुरु मे देवा सर्वकायॅषू सर्वदा.!!
🌿🔥🌿🔥🌿🔥🌿🔥🌿🔥🌿
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
देवा श्रीगणेशा तु सकलांचा देवाधिदेव..!
तुझ्या आगमनाने प्रफुल्लीत झाले मन
आनंदु लागले ,नाचु लागले.!!
चराचरात, घराघरात, मनामनात तु विराजमान ॥
प्रत्येक शुभ कार्यात तुझा मान..!!
दहा दिवस मनोभावे पुजा करतो
तुला प्रार्थनेत आम्ही पुजतो
तु आमचे दु:ख हरतो.॥
जाशील तु दुरच दुर आता
होईल उद्या तुझे विसर्जन
सुने वाटेल घर,सुने वाटेल मन..॥
पण असे होणार नाही.!
तु आहे कायमचा आमच्या मनात बसला.!
दु:खात दिली साथ
सुखात आमच्या सोबत हसला..!!
संकटात पाठीमागे उभा असलेला दिसला..!!
निरोप तुझे दहादिवसानंतर
नाही घेऊ आम्ही..!
सदैव तुला आमच्या मनात
ठेऊ आम्ही.!!
ऊ नमो गणेशाय नम:
🙏🙏🙏🕉🙏🕉🙏🕉🙏
🔥मोहन सोमलकर🔥
💞💕💕💕💕💦💞💞💞💞💞
सुगरण ती सुगरण
संसारासाठी करे ती
जागरण ती जागरण!
फुलात काटा बनूनी
कष्ट सारे सहन करते
सुगंध कुटूंबात दरवळे
तिच्या असल्याने..!
वावर तिच्या बहर घेऊन येई
दुःखाचा डोंगर हलका
वाटे तिची सोबत असल्याने
बोलली तर गुलाब पाकळ्या पडे
चुप्पी साधली तर कारावास वाटे.!
सुगरण ती सुगरण !
घरासाठी,दारासाठी
करे ती जागरण!!
सहचरिणी प्रेरित
मोहन सोमलकर 😅😆🍫🙏🖕
माध्यमांच्या बाजारी अडकलो॥ व्यस्त झालो
खुपच बुवा रमलो॥ मिडीयात ॥
वेळ मोलाचा गमविला॥ वेळ निकामी झाला
आळस अंगावरी चढला॥ क्षण जाई॥
सोडावे हे जंजाळ॥ कोणावर नाही आळ॥
दुर करतो मायाजाळ ॥ छान जगतो॥
राम राम ठोकतो॥ फुलात बहरतो॥
नित्य जगतो॥ सुखाचे जीवन॥
उद्यापासून मोबाईल दुर करतो॥ योगा करतो
मन एकाग्र करतो॥ जीवन सुंदर जगतो॥
मोहन सोमलकर 🍫🍁🙏😊
स्वप्नांचा मागोवा
खुप धावपळ चालली जीवनाची, या धावपळीत गुरपळत चाललो..!
कधी मिळते सवड स्वप्नांचा मागोवा घेत चाललो.!
चिंतन एकाकी होऊन करतो
मागचा मागोवा घेतो.!
पुन्हा नवा श्वास भरुनि ह्दयी मी पुढे चालतो.!
खुप जगायचे, पुढे जायचे आहे.!
स्वतःसाठी नव्हे,माझ्या श्वासाला जपणाऱ्या लोकांसाठी मला जिवंत राहायचे आहे..!
मोहन सोमलकर 🔥
आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक 'लाटा' उसळत असतात व कालांतराने त्या ओसरतात... त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात...
पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती...
प्रत्येक बाल्कनी - टेरेस - अंगणात गव्हांकुर पिकू लागले...
कॅन्सर, डायबेटीस.. बी.पी... गायब होणार
आणि
एकदम तंदुरुस्त होणार..
कैक टन गव्हांकुर संपले... मानसिक
समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही व लाट ओसरली !
अल्कली WATER... ह्याची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती....
म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार...
२० हजार - ३० हजार मशीनची किंमत...
मशीन्स धूळ खात पडली... लाट ओसरली !!
सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी..
वजन घटणार ...
बांधा सुडौल होणार..
हजारो लिटर मध संपले... हजार मिलीग्रामपण वजन नाही घटले...
लाट ओसरली !!!
मग आली नोनी फळाची लाट
नोनीने नानी आठवली
पण
तीही लाट नानी व नाना पार्क मधून वैकुंठाला घेऊन गेली
अलोव्हेरा ज्यूस... सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी.पी. एकदम नॉर्मल होणार.. हजारो बाटल्या खपल्या... विशेष काही बदलले नाही... लाट ओसरली !!!!
मग रामदेव बाबांची बिस्किटे आली.
५०००करोड चा व्यवसाय झाला .
परिस्थिती आहे तीच.
मग माधवबागवाले आले . तेल मसाज पंचकर्म करा हृदयाचे ब्लॉक घालवा.
राहता ब्लॉक विकायला लागला पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही.
(आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो.)
मग आली दिवेकर लाट
मग आली दीक्षित लहर
... ही लाट आता उसळ्या घेतेय... ओसरेल लवकरच !!!!!
लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय
डोकं वापरा
आणि
Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा
आणखी थोडं डोकं लावा
आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद म्हणजे नियम शास्त्र.
रोजचे साधे घरगुती जेवण पालेभाजी,वेलवर्गीय भाजी,फळभाजी,मोडआलेली कडधान्य,सँलड,साजुक तूप,बदलते गोडेतेल,गहूँ,ज्वारी,बाजरी,व मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम पहा काय फरक पडतो .
लोकांना शिस्त नकोय..
जीभ चटावलीय..
पैसा बोलतोय... "स्वयंपाक नकोय..."
आता तर घरपोच...
पंधरा मिनीटात...
.....आली लाट मारा उड्या
*हसत खेळत जगा, पण सर्वात महत्त्वाचे व्यायाम करणे आवश्यक आहे बस्स!!!*
सकाळी लवकर उठणं,
रात्री लवकर झोपणं,
दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे.
*आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणं सातत्याने आवश्यक आहे.*
*आपल्या कॉम्प्युटर,लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर सुरुवात करायला काय हरकत आहे?*
दिर्घायुष्य लाभावं,
आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत,
या करीता आपला आहार,
आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे.
*आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरिरात विकार निर्माण होतात.*
*या व्यायामात नियमितता व सातत्य असावं*.
*संकलित लेख
मोहन सोमलकर 🙏👍🍁
👌🙏🙏🙏
गणेशा वास्तवतेची बेडी तोडून
हे जन भाकिताकडे का वळत आहे.!
समाजात पापपुण्याचे पगडे भारी
मग तुझ्यापुढे हे जन सारे भक्तिभाव दाखवुन
का रडत आहे...!
मोहन सोमलकर 🙏🍁🙏🍁🙏
![]() |
| Friendship |
मैत्रीचे नाते हे जगावेगळे नाते असते. मैत्रीला कोणतीच सिमा नाही. नाही कोणत्या मर्यादा. .......कुणाच्या मनावर अधिराज्य करायचे आहे तर मैत्री हेच एकमेव नात असते....
मैत्री कुणासोबतही करता येते .असे म्हणण्यापेक्षा होऊन जाते अचानक ती मैत्री. एकमेकांना एकमेकांची मन वाचता आली की मैत्री होते.... नात्याची लोक जीवनात साथ निभवणार नाही ते सच्चे मित्र निभवतात.
घासातला घास देणारे, अडचणी च्या वेळेस मदत करणारे ते मित्रच असतात. आयुष्यात लहानपणी मित्रांसोबत घालवलेल्या दिवसाची व त्या क्षणांची आपण कधीच आठवण विसरु शकत नाही. ..
" दोस्ती वही होती है जिसमे कोई मतलब नही होता ."
असे अनेक माझे मित्र आहेत . शाळेतील मित्र, कॉलेजातील मित्र.. ज्यांनी मला या आयुष्यात मोठे केले. माझी साथ कधीच सोडली नाही. रक्ताच्या नात्यापेक्षा कितीतरी मोठे नाते त्यांनी माझ्याशी निभावले.
आज मला माझे जुने मित्र कितीतरी वर्षानंतर भेटले. हे मी माझे भाग्य समजतो.
किती मैत्री च नातं माझ्या साठी महत्त्वपुणॅ आहे. ते पुढिल कवितेतून बघा........
मैत्रीच नातं
माह्या बी मनी बसलं
आये लेकाचं मैत्री च नातं
जसं चमके माॅन्यामंदी
तलवारीचं पात...!
दोन ह्दयी जवळी जेव्हा येतं
म्या म्हणतो," लेकहो!तुमच का जातं..!
तिच्या ह्दयात म्या बी
खोललं आपल्या पिरतीचं खातं
आनं आता सांगा मले तुमचं का जातं..!!
मा बा... म्हणे....
आपलंच ओठ आणं आपलंच आहे दातं
आनं माह्या पोरानं पिरीयम केलत...
लेकहो...!तुमच्या बापाचं काय जातं..!!
काय सांगु मी ह्या मैत्रीच नातं
किती मैतत्र माझे हाईत
माझं हुदयच सांगेल तुम्हाले आतं
तेही लेकाचं मैत्रीचच गीत गातं...!!
जसं फिरे गंगुतेली निच जातं
जसं फिरे गंगुतेली निच जातं
तसचं माह्या या पाच फुटी दहा इंची
देहाचं आहे संमद्याशी मैत्रीचं नातं...!
ना नातं ना गोतं !फक्त मैत्रीच नातं...मानतो मी मोठं....
मानतो मी मोठं...!!
=================🙏🙏==============
आशा करतो सवाॅना आवडेल.
मोहन सोमलकर 👍🙏🙏
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...