मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

नव्या वर्षाचे स्वागत, पण जुने विसरु नका

 


आज डिसेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा. ...


सर्व जगात हा आठवडा Thanks Giving Days म्हणून साजरा करतात. 


 मी आजच्या या दिवसाचे औचित्य साधून माझ्या आयुष्यात असलेल्या माझ्या सर्व near and dear once ना thanks म्हणणार आहे.


 तुमच्या सगळ्यांच्या असण्यानेच माझे आयुष्य परिपूर्ण आहे. 


 प्रत्येकाने मला काहीतरी दिले आहे. शिकवले आहे. 


Thank you so much guys for being there in my life ...


तुम्ही सगळेच माझ्या आयुष्यात महत्वाचे आहात...


माझा परिवार, काव्यपुष्प परिवार 

मोहन सोमलकर 🙏🙏🙏🎊🎋🎊🎋🎊🎋

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

मुलीच्या लग्नाबद्दल

 💞⚜🌸🔆🌅🔆🌸⚜💞


My gallery 

           🌻 *आनंदी सांज 🌻


            *कन्येच्या स्वप्नपुर्तीची*

             

                  ⚜⚜⚜

       *शुभविवाह मंगलपर्व विशेष*

                  ⚜⚜⚜


💞🥀🌸🌿🌺🌿🌸🥀💞


        *शतकानुशतके जगात कितीही मतभेद असले तरी एका रुढीपरंपरेत मात्र साधर्म्य आहे ते म्हणजे मुलीनेच सासरी नांदायला जाणे. जगात आजवर कित्येक सामाजिक क्रांती झाल्या.. आधुनिकीकरण झाले.. वैज्ञानिक प्रगती झाली पण तरीही जगभरातील कुटुंबात याबाबतीत मात्र समानता आहे. या पद्धतीवर कुणाचाही आक्षेप नाही. मुख्य म्हणजे ही बाब मुलगा.. मुलगी दोन्ही कुटुंबाला आजही मान्य आहे. मुलींनाही अगदी लहानपणा पासूनच याची जाणीव असतेच.*

        *मुलींनीच सासरी जाण्यामागे कारण म्हणजे मुलींना प्राप्त असलेली समजूतदारपणाची.. सहनशिलतेची आणि नविन कुटुंबात एकरुप होण्याची ईश्वरदत्त देणगी.*

        *पण ही बाब प्रत्येक मुलीच्या घरच्यांसाठी सुखद.. आनंदाची असली तरीही स्विकारणे जड जातेच. मग काळाचा वेग किती प्रचंड आहे हे जाणवते ते मुलीच्या भरभर मोठे होण्यात. कालपर्यन्त खुदकन हसत.. बागडणारी.. भातुकली खेळणारी कोमल कळी आता चक्क लग्नाच्या बोहल्यावर उभी राहणार. आईवडिलांनी मोठ्या लाडात तिला वाढवले. शक्य होईल तेवढं सुखही बहाल केलं. तिचा शब्दन शब्द प्रमाण मानला.* 

        *आता ही लाडकी कन्या कुणाची तरी सुन होणार. तिचा संसार थाटणार. तिने या घरातील लोकांना तिच्या सहवासाचा जेवढा आनंद दिला तेवढाच आनंद सासरी पण देणार. तिचा प्रेमळ स्वभाव असा आहे की तिच्यासाठी माहेर म्हणजे काशीचे पवित्र मंदिर आहे, तर सासर म्हणजे रामेश्वर, म्हणूनच आनंदाने ती सासरी जाणार आहे. तिचं स्वप्न आता साकार होणार आहे.*


🌹🔆🥀👁❣👁🥀🔆🌹


  *_लेक लाडकी या घरची,_*

  *_होणार सून मी त्या घरची ॥ध्रु॥_*


  *_सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली_*

  *_कळी कळी फुलून,_* 

  *_ही चढते मंडपी, वेल मायेची ॥१॥_*


  *_संपताच भातूकली,_*

  *_चिमुकली ती बाहुली_*

  *_आली वयात खुदूखुदू हसते_* 

  *_होऊनी नवरी लग्नाची ॥२॥_*


  *_हे माहेर, सासर ते,_* 

  *_हि काशी रामेश्वर ते_*

  *_उजळीते कळस दो घरचे_*

  *_चंद्रिका पूर्ण चंद्राची ॥३॥_*


🌷🥀🌸🍃🌺🍃🌸🥀🌷


  *गीत : पी. सावळाराम*         ✍


  *संगीत : वसंत प्रभू*              🎹


  *स्वर : लता मंगेशकर*            🎤


  *चित्रपट : कन्यादान (१९६०)*📺


  *🎼🎶🎼🎶🎼*              🎧


     *!! नियम पाळा, सुरक्षित रहा !!*


    *🌹🙏शुभ संध्या🙏🌹*


                *२१.१२.२०२१*


💞🥀🌸🌹🤝🌹🌸🥀💞


मोहन सोमलकर 



एकांत

 


                               My gallery 




मिडिया एक चक्रव्यूह आहे,नव्या आधुनिक काळातलं, जे आपल्या पाच इंद्रियांवर प्रभुत्व गाजवत आहे, हे आभासी जग, हा मोहमायेचा विळखा , हे गुरफटत जाणे त्यातल्या त्यात, आणि खरे आयुष्य जगणे विसरुन जाणे होय.


डोळे,मन, ह्दय,  हात,आणि मेंदु या पाच ज्ञानेद्रियावर या वाईट मिडीयारुपी चक्रव्यूहाने आज प्रभुत्व मिळविले आहे.


त्यामुळेच आपण खरे आयुष्य विसरुन मोबाईल नावाच्या व्यसनाच्या अधीन झालो आहोत. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत चक्रव्यूहात सारेच फसले. या गेलेल्या पाच वषाॅत या चक्रव्यूहाची व्याप्ती वाढली.


दुरुपयोग तसे सदुपयोग पण आहे मोबाईलचे पण आपल्यासारखे रात्ररात्र जागुन बिनाकामाने या व्यसनाच्या आधीन झालो.


मग हजारो रोगाप्रमाणे विभिन्न ग्रुप च्या स्वाधिन झालो.

त्यातील मग मेंबर्स चे पर्सनल अकाउंट, अजुन पोट समुह किती आणि किती ग्रुप हे सहन करणार. फक्त एकटा माणुस, त्याचा एकटा मेंदु आणि हजारो वाटसअप ग्रुप..!


त्यापेक्षा एकांत बरा, हा एकांत आता मला हवाहवासा वाटत आहे. माझ्या भरवशावर कित्येक लोक आहेत ,मला कित्येकांनी गुरफटून ठेवलं आहे.पण स्व हितासाठी व स्वतः च्या इच्छेने जगण्यासाठी एकांत वास जवळ करुन गोंगाटातुन अलिप्त राहणे गरजेचे आहे..!



ओम नमो शिवाय 

तुझे सेवेत लवकरच येईल,शंभो🙏🙏🙏🙏🙏


मोहन सोमलकर 🙏🙏🙏🙏



सोमवार, २० डिसेंबर, २०२१

वाढदिवस श्वेताताईचा🌻🌷🌻

                         my gallery 
 वाढदिवस श्वेताताईचा


असतो वाढदिवस आनंदाचा दिवस

तो साजरा करण्यात येतो मग रस🙏🙅🙅


असतोच तो दिवस खुपच खास 

शुभेच्छाचा नजराना मिळतो खास 


आनंदीआनंदाचा अंगणी असतो सहवास 

नवी स्वप्ने साकार करण्याचा तो ध्यास 


आज आहे २० डिसेंबर २०२१ सोमवार दिवस

आपल्या श्वेताताईच्या खुप सारी स्वप्न पुरे करण्याचा दिवस


आनंदात ,सुखस्वप्नात तिच्या सहभागी व्हा 

सुख, समृद्धी, व भरभराटीचे आशिर्वाद द्या.!



श्वेताताईला वाढदिवसानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा 


काव्यपुष्प व सर्व अडमिन 

मोहन सोमलकर 

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

मैत्री रामाची हनुमानरायाची

 

My gallery 

मैत्री मदतीची नसुन मनाला जपणारी

संकंट काळी जो येतो धावुन
तो प्रिय सखा वाटतो
जो प्रिय असतो जीवाचा
त्याने दगा दिला की कंठ दाटतो.

राम वनवासी दरदर भटकला
भाऊ पाटीराखा लक्ष्मण
सदैव सावलीसारखा पाठीशी राहिला
गेले आनंदुन रामाचे मन.!

हनुमानजी काय तयाची लिला
भोळी भक्ती रामप्रती तयाची
मनात कोरली प्रतिमा हनुमानाने
प्रिय सखा प्रभु श्रीरामाची..!

एवढे मित्रप्रेम कधी नसेल पाहिले
अंतःकरणात रामसिता होते बसले
हात दोन्ही छातीला त्यांनी लावले
फाडुनी मनातुन भगवंतच ह्दयात दावले.!

धन्य धन्य भक्ती व मित्रप्रेम
ते जगाला हो दिसले

रामजीचे नाव माझ्या आधी घ्या
असे वीर हनुमान जगाला बोलले..!

सियावर रामचंद्र की जय
पवनपुत्र हनुमानजी की जय🙏🌹🙏🌹

मोहन सोमलकर 🙏🌹


मनातील वेदना

 

My gallery 

जाऊन सांगा तिला सगळे
तुझ्याविना घडत नाही काही वेगळे
पोटच्या पोराला बेवारस सोडुन गेली
मोठा छान दहा वर्षांचा झाला,सोडले होते त्याला नागळे

लोक म्हणतात स्त्री तशी नसते ,पण माझा मित्र आहे, त्याची पत्नी पोटच्या पोराला सोडुन गेली ती आलीच नाही, खुप विनवण्या केल्या. तिचे हात पाय जोडले खूप विनवण्या केल्या. तिला निदान मुलासाठी तरी ये पोटच्या गोळ्याला अशी टाकून जाऊ नको,
तो तुझ्या हाडामासाचा गोळा आहे. त्याच्याशिवाय तुला कसं राहता येईल  आणि तुझं जीवन समोर कसे जाईल.व सफल कस होईल याचा विचार कर .आणि या विचारानेच तू त्याला छातीशी लाव., बिलगव !आणि परत सासरि ये .
माहेरी तुझा किती दिवस निभेकार लागणार आहे. नाही नवऱ्याचा विचार ,पण कमीत कमी आपल्या मुलाचा विचार तरी तू कर.....! माझा मित्र....... चार, पाच, दहा तिच्या कडे जाऊन आला. सासूबाईला विनवणी केली. त्याच्या मेहुण्याला विनवणी केली. परंतु त्यांनी म्हटले
.

की आम्ही मुलीला पाठवणार नाही. त्याने एकट्यात तिला समजाविले, मी वाटल्यास वेगळा राहतो. भाड्याने दुसरी खोली घेऊन,..... परंतु तू माझ्या नाही तर मुलाच्या सुखासाठी नागपुरला चल.. पण ती काहीएक ऐकण्याच्या तयारीत नव्हती . दिवसा मागुन दिवस गेले, वर्ष सरले मुलगा मोठा होत गेला. आई पेक्षा आजीच्या कुशीत झोपत गेला. आजी म्हणजे त्याला आई वाटू लागली.

सगळे लाड, सगळेच खेळ, सगळे दिवस, सगळी रात्र...... बाप आपल्या मुलासाठी जागू लागला. होते पाहिजे नव्हते ते तो आपल्या मुलासाठी करू लागला  तो आपल्या शिवबा साठी जिजाई झाला .तो आपल्या श्याम साठी श्यामची आई झाला, तो आपल्या कान्ह्यासाठी, यशोदा झाला, देवकी झाला तो आपल्या पोटच्याच्या गोळ्या साठी सगळं काही झाला , सगळं काही विसरून चुकला तो, तो आपल्या पत्नीला सुद्धा विसरून गेला. आणि एकच ध्येय, एकच उद्दिष्ट मनात साकार करून,

फक्त आणि फक्त आपल्या मुलासाठी तू जगू लागला . आम्ही किती आम्ही मित्रमंडळींनी, कितीदा त्याला दहा वेळा म्हटले असेल सुनील दुसरे लग्न करून या मुलाच्या सुखासाठी, मुलाच्या पालनपोषणासाठी .

परंतु सुनिलने काही ऐकलं नाही. आणि दहा वर्ष होईपर्यंत त्याने आपल्या मुलासाठी दुसरे लग्न केले नाही .
त्याचा एकच विचार होता की, मी दुसरे लग्न तर करून घेईल.  परंतु माझ्या मुलाला लहानपणापासून आईची माया मिळाली नाही तर आईची माया देण्याइतपत आई मिळेल काय . त्याच्या सख्ख्या आईनेच त्याची ती माया हिरावून घेतली,तर दुसरी कोणी ती माया देईल काय.?

आज तो मुलगा आणि बाप सर्व सुखी परिवार आहे. आणि दोन वर्ष झाले त्याने त्याच्या भावाच्या साळी सोबत दुसरे लग्न केले .

सुखी समाधानी ती चार लोक  पूढिल आपले आयुष्य आनंदित व्यतीत करत आहे .त्याच्या भावाच्या साळीला सुद्धा तिच्या नवऱ्याने असे सोडून दिले होते ,आणि तिला तिच्या नवऱ्याकडून एक मुलगी सुद्धा झाली होती.
दोन दिशा देवाने या नियतीने एकत्र केल्या. माझ्या मित्राने त्या पाच वर्षांच्या एक मुलगी असलेल्या आईला स्वीकारले . आणि त्या माऊलीने सुध्दा माझ्या मित्राच्या मुलाला मनातुन स्वीकारले. व आपली ममता देऊ लागली.

पुन्हा एक वचन मित्राने त्या नवपत्नीला दिले की, आपल्याला मुलगीही आहे आणि मुलगा... आता आपल्यापासून तिसरे अपत्य होऊ द्यायचे नाही, ही आपण काळजी घेऊ व , या दोघा  मुलांवरच आपले प्रेम संपुर्ण अर्पण करु . ती मंजुर झाली.

आज ते चार जण सुखी कुटुंब नांदत आहे.

तो पहिल्या पत्नीची आता आठवण पण काढत नाही.!

मोहन सोमलकर 🙏🙏


गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

सतिश खरे एक मुर्तिमंत शिल्पकार, कविताकार

 

My gallery 

सतिश एक शांत मृदु स्वभावाचा

लाभला हिरा जणु काव्यपुष्पला 

गर्व करण्यापद आहे, आहे मौल्यवान तो

त्याला पण अहंकार नाही गुणाच्या आपल्या !


स्तुतीसुमन उधळावे जेव्हा जेव्हा

म्हणतो तो अजुन खुप शिकायचे

आताच तर पाऊल टाकले शर्यतीत 

मला अजुन पुढे आहे धावायचे....!


काय दाद द्यावी अशा कलावंताला

आभाळ ठेंगणे पडावे त्याची महती गायाला

शिल्पकार तर तो आहेच खरा

पण खरा माणुसही आहे पटला माझ्या मनाला!


आज त्याने एवढ्या दिवसानंतर 

आपल्या हातानी बनविलेले शिल्प दाखविले

अहो  शिल्पकारच तर आहे तो

मुर्तिमंत रुप जिवंत शिल्पात साकारले.!


या शिल्पकाराला माझे कर जुळती

खुप पुढे प्रगती होवो.!

तो शिल्प छान घडवो.!


मोहन सोमलकर 

शुभेछुक 

🙏🙏🙏🙏🙏



मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

अभिनंदन शशीताई आणि दुर्गा मते

my gallery 
 ‼️अभिनंदन शशीताई ‼️

🍫‼️🍫🔅‼️🍫‼️🔅🍫‼️🍫🔅‼️


अभिनंदन शशीताई 

आज तु इतक्या दिवसांनी 

चारोळी या श्रेणीत प्रथम आली 

आनंदाची तुषार तुझ्या अंगणी उडाली


खुप छान चारोळी 

तुझी ताई असते

चारोळितुनच तु 

भाव मनातील व्यक्त होतांना दिसते!


ना अहंमपणा, ना अहंकार 

तुझ्या ठायी दिसला

पाण्याचा बुडबुडा 

जणु डोळ्यात येऊन हसला.!


नसतो तुला वेळ 

पण जसे मिळते तुला रिकामपण

कवितेतून भाव व्यक्त करते

चारोळीत किती दिसते ग तुझे शहाणपण!


शशी जसा तो नभातला 

गालातल्या गालात हसतो

काळ्याकुट्ट अंधारातही 

शितल छाया व हास्य देतो.!


तशीच शशीताई 

दोन दिवसात दादाला आपल करुन गेली

साहित्यात तिने प्रगतीचा ध्वज फडकवावा 

स्वतःच साठी मानाचे दोन शब्द राखुन गेली!


चारोळितुन प्रथम आली

ऑखे माझी नम झाली

कौतुक करण्यापरी शब्द भेटले 

तुझ्या नावावरची कविता ही प्रथम लिहली.!


अनेक शुभेच्छा पुढिल वाटचालीसाठी.!

⚘‼️⚘‼️⚘‼️⚘‼️⚘‼️

मोहन सोमलकर दादा


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

दुर्गा मते

‼️अभिनंदन बेटा‼️


My gallery 

दुर्गा आज लेख विभागातून 

⚘🔅‼️वैचारिक व सामाजिक ‼️🔅⚘

या दोन श्रेणीतुन प्रथम आली

अभिनंदन लेकीस दुर्गा बेटीस

🫒‼️🫒‼️🫒‼️🫒‼️


कौतुकाची धनी तु

कौतुकापरी तुझे कर्तृत्व आहे

लिखाणात तुझे मन दरवळते 

अशी लेखिका तु आहे.!


कुठून सुचते तुला 

एवढे भारी भारी शब्द 

वाचता वाचता 

व्हावे मग ग निशब्द! 


मोठमोठी कथा लिहिते

सामर्थ्यवान तु लेखिका शब्दात अवतरते

लेखणी तुझी अशी प्रगतीची वाट चालावी

मन माझे शुभेच्छा देते.!


लिहिण्यासाठी धडपडते 

अशी तु एका प्रतिभावंताची लेक आहे.!

शिंपल्यातील मौल्यवान मोती तु

मनाने खुप नेक आहे.!


खुप नाव कमवावे

साहित्यात तुला यश मिळावे 

आशिर्वादाचे बोल 

मुखातुनी तुझ्यासाठी निघावे.!


⚘⚘⚘⚘अनेक शुभेच्छा ⚘⚘⚘


मोहन सोमलकर 



गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

वाद करायला खुप आवडायचे

My gallery 

 काय सुरेख आणि मस्त 

होते ते बालपण 

खेळता ,बागडता 

जगत होतो जीवन   !


आनंदाचा बहर होतो अंगणी

रोजच वाद व्हायचे भाऊबंधात 

पण हसत ,खेळत राहायचो

मनात कटुता आणायच्या नसायचो फंदात!


चार भावंडे आणि एक बहिण 

जशी पाच बोटेच आईबापाची

काळजी ते,आणि आम्ही त्यांची

करुन धुंद होती जगायची!


जणु चिमणी पाखरे आम्ही

एकाच त्या कल्पतरु वरी बसायची

याची त्याची गंमत करत

एकाच अंथुरणी निजायची.!


किती बखाण करु

त्या जगलेल्या सुंदर आयुष्याचे

ते पर्व संपले ,सर्व मोठे झाले

ते पुस्तक जतन केले मी जीवनाचे.!


बहिण छोटीशी माझी होती

छोट्या वेण्या टाकुन, आई रेबिन बांधुन द्यायची

लई लाडाची होती ती सर्वाची 

वाद तिच्याशी घालण्यात किती मजा यायची


बंधु मोठा तो वडीलधारी

वाद कोणी त्याच्याशी नाही घालायचे!

होता जरी शिस्तबद्ध जगणारा

तरी त्याच्याविना कधीना करमायचे! 


आता ते सोनायाचे दिवस गेले

वाद मिटले ते बालपणीचे,हरवले..!

आनंदाचे पक्षी कुठे उडाले

जबाबदारीच्या ओझ्याखाली ते दबत गेले.!



मोहन सोमलकर 

  &

परिवार 

🙏🙏🙏🙏🙏😊🙏🙏

वाद नको

 

My gallery 

शिकवून गेली कोरोना महामारी


आपल्या संतांची शिकवण लागु पडली!


मनात कटुता ठेऊन स्वर्ग गाठता नाही येणार  भोळ्या संत तुकारामांची देहु संतनगरी सजली.!


🙏मोहन सोमलकर 🙏


बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

दोन शब्द प्रिय पत्नीसाठी...

 


प्रिय पत्नीजी,        my gallery 

तुझी आठवण कवितेतून 


लागला जसा हिवाळा

तुझ्या प्रेमात अडकावेसे वाटते

हातात तुझ्या सुगरणीची जादु 

तुझ्या हातचे  एक एक चविष्ट व्यजंन खावेसे वाटते!


जसा हिवाळा येतो

हिरव्या हिरव्या पालेभाज्या घेऊन येतो

विविध प्रकारच्या भाज्या बाजारी सजते

सर्वांचा मोह मनात सजतो.!


खुपच रुचकर बनवते तु 

त्या हिरव्या हिरव्या पालेभाज्या

त्यावर मस्त ताव मारतात

माझ्या दोन्ही म्हातार्या आज्या.!


काय खमंग व गोड असतो

तुझ्या हातचा गाजराचा हलवा

तुपात नुसता बनवला असतो

सारखेसोबतच त्याचा जलवा


वाटाणा, तुरीचे दाने, कोबी टाकुन

काय मस्त बनवते तु मसाले भात

गरम गरम खाता खाता

थांबत नाही ग माझा हात.!


या सगळ्या मेनुसोबत 

त्या आंबट कडीचा स्वादही मनात अडकतो

तुझी आठवण आल्यागत 

माझा घास मधेच लटकतो..!


🍊🍉🍉🥕🥬🥒🫑🥦🍍🫒

मोहन सोमलकर 



सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

बहन शाहीन च्या आईसाठी प्रार्थना

 

नाही तिला कुणाचा सहारा

देत आहे ती पहारा
तो बेभान सुटलेला वारा
कुठे शोधु आता निवारा..!

हे अनाधी अनंता
तु माझ्या भगवंता
किती अंत पाहशिल आता
तुच आमचा दाता..!

मी एक स्त्री एकली
असेल जरी चुकली
आईस माझ्या बरी कर मुठ तिच्या मुळे झाकली
भुक तिच्यामुळेच माझी भागली.!

आईस माझ्या लवकर बरे कर.!
ही रचना प्रार्थना म्हणून
शाहिन शेख
या
बहिणी साठी
केली
तिच्या आईच्या
आरोग्यासाठी.!

मोहन सोमलकर
🙏🙏🙏🙏🙏🙏

महमानवास महापरीनिवाॅण दिवसानिमित्त अभिवादन


 म               महान कायदेपंडित तुम्ही या जगाचे

हा        हालअपेष्टा केल्या सहन तुम्ही देशा साठी

मा        मायभूमीच्या हितासाठी आयुष्यभर लढले

न   नम्रतेने सगळ्या जगात हक्काने वावरले तुम्ही

व  वणवा जागृकतेचा मनामनात पेटविला बाबा तु.


बा  बांधिलकी हा गुण तुमच्या नसानसात होता बाबा

बा  बाबा तुम्ही दिनदलिताचे झाले ,कैवारी गोरगरीबाचे

     सा साथ दिनदलितांना देऊन शिक्षणाचा मार्ग  दाखविला !

     हे   हे  कार्य  सगळ्यास नाही जमले , हे कार्य तुम्हीच केले

ब   बर्‍याच गोष्टींवर तुम्ही न्यायाची बाजु मांडली होती !

आं  आंबेडकर नावाची प्रकाशज्योत सार्या देशाला मिळाली.

बे    बेड्या त्या अशिक्षिततेच्या, गुलामगिरीच्या नष्ट केल्या.

ड  डगमगले नाही कधी त्या इंग्रजांना पाहुन ,लढत राहिले 

क  कतॅव्य पार पाडित देशाचा विकास केला , माहामानवाने 

र  रचला इतिहास अद्भुत, अदभुत, ,सलाम या महमानवास.


भारतरत्न, कायदेपंडित, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकारण अभ्यासू,दलितांचा कैवारी,वंदनिय डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६ व्या महापरीनिवाॅण दिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏

🌐जय  डाॅ.भिमराव  बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏🌐


मोहन सोमलकर 


शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

My gallery 



 प्रितीताई व श्री. अनिरुद्धजीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेछा

जीवनाच्या धावपळीत 

रोज रममान असतो

नुसते धावत असतो

कुठे स्वतःकडे बघण्याचा

वेळ असतो..!


पण असतो जीवनसाथी

आपली काळजी घेणारा

आपल्याला आनंदात 

असतो तो सदैव पाहणारा!


हातात हात घेऊन 

आपण रोजचे जीवन जगतो

डोंगर जीवनाचा

त्याच्या सहकार्याने पार करतो.!


नाते असते ते मृदु मनाचे

फुललेल्या फुलाप्रमाणे

अगणित चकाकणार्या 

चांदण्याप्रमाणे..!


प्रितीताई व अनिरुद्धजीला 

लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक 

शुभेच्छा..!

शुभेच्छुक 

मोहन सोमलकर व काव्यपुष्प परिवार  नागपूर 

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

गझलसम्राज्ञी ,स्त्रीशक्ती एक आकलन

 आजचा माझ्या लेखाचा विषय आहे 

‼️गझलसम्राज्ञी,स्त्रीशक्ती एक आकलन‼️

My gallery 


प्रतिलिपीवर वा काव्यपुष्प या ब्लाॅग निर्मित समुहावर मी खुप दिवसांपासुन एक आकलन करतो की बरेच लोक सवॅच प्रकारात उत्तम लेखन करतात, ते लिखाण खुप सुंदर व मनोरंजन पर असते. नविन लोकांच्या हातुन चुका झाल्या तरी जेष्ठ साहित्यिक त्यांना मार्गदर्शन करुन सांभाळून घेतात. हे इथे कौतुकास्पद आहे.

तर प्रत्येक जण इथे वेगवेगळ्या काव्य प्रकारात लिखाण करतात. पण "  मराठी गझल"हा काव्यप्रकार मला खुपच किचकट आणि गुंतागुंतीचा वाटतो. पण जे लोक प्रतिलिपीवर व काव्यपुष्पावर उत्तम प्रकारे मराठीतून नियमबद्ध "गझल प्रकार " लिहतात. ते लोक फार कमी आहेत. व जे आहेत ते" काबिलेतारिफ "आहेत. 


विशेष म्हणजे त्या पाचही स्त्रियाच आहेत, हे एक कौतुकास्पद आहे. अशा या कठिण  व किचकट काव्यप्रकारचे  आपल्या गुरु मार्फत योग्य ते नियमबद्ध मार्गदर्शन घेऊन  मराठी गझल हा काव्य प्रकार शिकून अगदी सरळ व सोप्या पद्धतीने त्या गझल वाचकांसमोर आणून या पाचही गझलसम्राज्ञींनी  वाचक लोकांवर एक प्रकारचे उपकारच केले असे समजावे.


मित्रहो.! व माझ्या वाचकांनो या पाच गझलसम्राज्ञी कोण आहेत , याचे तुम्हाला प्रत्येकालाच असे कुतुहल लागले असेल. 



मित्रहो त्या गझल सम्राज्ञी दुसऱ्या तिसर्या कोणी नसुन तुमच्या आमच्यातीलच आपल्याच सहकवियत्री आहेत. मनाने आणि स्वभावाने त्या प्रेमळ ,मार्गदर्शक, सहकार्यी आहेत.



साहित्य क्षेत्रात, समाजात, कौटुंबिक क्षेत्रात  एक स्त्री म्हणुन  वेगळेच स्थान आहे,बहुमान आहे. त्या सह्दयी  ,मार्गदर्शक आहेत .


पुढिल पाच गझलसम्राज्ञी ह्या आपआपल्या ठिकाणी उत्कृष्ट गझल लिहणार्या एक कवियत्री आहेत. 


मी या पाचही गझलसम्राज्ञीची एकमेकीशी कोणतीही तुलना करणार नाही. कोण श्रेष्ठ  व कोण कनिष्ठ हे ठरविणारा मी खुप मोठा साहित्यिक नाही. 


या पाचही गझलसम्राज्ञीचे माझ्या मनातील स्थान हे आदरणीय  व उच्चकोटीचे आहे. मी या लेखात त्यांचा बहुमान  एक गझलसम्राज्ञी म्हणुन करत आहो ,त्यांची एकमेकीशी तुलना म्हणुन  नाही. 


   तसेच मी एक गोष्ट सांगु  इच्छितो की, पाचक्रमात कोणालाही पुढे मागे व्हावेच लागेल , त्याबद्दल त्या समंजस पणा घेतील हे मी समजतो. सवॅच कवियत्री मला एकसमान आहेत. आणि प्रत्येकीचे एक आगळेवेगळे स्थान आहे. तर बघा कोण आहेत त्या पाच गझलसम्राज्ञी.!


या पाच गझलसम्राज्ञीचा आपल्या लेखातून फक्त बहुमान करावे असे मला वाटले, त्यांची तुलना मी एकमेकीशी करणार नाही.

त्या पुढिलप्रमाणे आहे.


‼️एड. रुपाली सांवत मॅम

‼️सौ. प्रियंका व्ही. घोडके मॅम 

‼️सौ. वृषाली जोशी ताई

‼️सौ. वंदना सोरते मॅम

‼️सौ. राजश्रीताई जाधव



या पाचही कवियत्री ( गझलसम्राज्ञी) बाकीही काव्यप्रकारात उत्तम कविता लिहितात.

त्यांची लेखणी उत्तम, बहुमानकरणारी, तेज प्रकटणारी, माया,ममता, वात्सल्य,शक्ती, आपुलकी,प्रेरणा,गुणगौरव प्रगटणारी आहे. त्यांच्या लेखणीला माझा नम्र प्रणाम!

🙏‼️🙏‼️🙏‼️🙏‼️🙏

सर्व प्रथम प्रस्तुत करतो 

Adv.  रुपाली सावंत मॅम (रुही)





रुपाली सांवत मॅम यांना माझा प्रणाम 

🙏‼️🙏‼️🙏‼️🙏‼️🙏‼️


‼️तेजस्वीनी तु तेज वाहिनी बुध्दीमंत तु एक तेज लेखणी..!‼️


सदा आपल्या कवितेतून, आपल्या गझलेतुन शब्दाचे तेज झळकविणारी,तेजस्वी शब्दरुपी तलवार अलवार पणे घेऊन येणारी, कधी ममतामयी वात्सल्य प्रगटवणारी ही गझलसम्राज्ञी आपल्या गझलेतुन ,कवितेतून नेहमीच वेळात वेळ काढून  प्रगट होत असते. 

ते आपले घर, वकिली पेशा आणि साहित्याचे क्षेत्र योग्य सांभाळूनच.अशा या कवियत्रीला व गझलसम्राज्ञीला माझा मानाचा नमस्कार‼️

त्यांच्या गझलेचा आस्वाद घ्या..👇

‼️🔅‼️🔅‼️🔅‼️🔅‼️🔅‼️🔅‼️🔅‼️

वृत्त - कालगंगा


कल 


सूर्य माझ्या जीवनाचा मावळाया लागला

हा विचारच या मनाला का छळाया लागला


लोढणे या स्पंदनाचे का उरावर पेलले 

या रुपाचा कल कधीचा बघ ढळाया लागला 


का उराची गत अशी ही कंप सुटतो कापता 

रोज माझा प्राण थोडा का गळाया लागला 


पैलतीरी गाव दुसरा काय लेखी धाडतो 

दूत होता तो निरोप्या मज कळाया लागला


दोष हटता शूभ्र काही या रुहीने जाणले

स्फटिक शुद्धा धवल आत्मा का मळाया लागला


आज देवा मज गवसले गूढ माझ्या अंतरीचे

खेद तोवर देह सरसर बघ जळाया लागला✍️


ऍड. रुपाली सावंत, मुंबई.


बघा निसर्गदत्त देणगी लाभलेली, साहित्याची प्रतिभा लाभलेली

अशी ही एक तेज  स्त्रीशक्ती तलवार ,अलवार अशीच सदैव अग्नी,पॄथ्वी,आकाश,वायु,पाणी या पंचभुताच्या साक्षीने चमकत राहो..!

माझा सदैव यांना हार्दिक शुभेच्छा.!

‼️🙏‼️🙏‼️🙏‼️🙏‼️🙏


दुसऱ्या गझलसम्राज्ञी

सौ. प्रियंका व्ही घोडके मॅम 

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

यांना माझा सस्नेह प्रणाम.!



प्रतिलिपीवरील माझ्या दोन वषाॅच्या कालखंडात बरेच लोक माझ्या वाचनात आले , प्रतिलिपीवर लिहिता लिहिता एकदा अचानक ताईची भेट झाली ,भेट म्हणजे प्रतिलिपीवर ओळख झाली, शब्दलेखणीबद्दल कळले ,शब्दलेखणी या समुहाशी मी संलग्न झालो , आज मला बराच मोठा वाचकवर्ग व चाहतावर्ग सचिन सर व प्रियामॅम मुळे मिळाला, त्यांचे मनःपुर्वक आभार‼️🙏


प्रियामॅम बद्दल काय सांगावे, सदा प्रफुल्लित असणार्‍या  सवॅ काव्यप्रकाराच्या जाणकार, उत्कृष्ट कवियत्री, लेखक , गॄहिणी, working women बाहेरचे व कौटुंबिक जग योग्य प्रकारे सांभाळून आपले साहित्य क्षेत्र त्यांनी चोखपणे सांभाळले. शब्दलेखणीसाठी व काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणार्या निष्ठावंत प्रियामॅम शब्दलेखणी या परिवाराच्या "backbone" पाठीचा कणा आहे.

त्यांना माझा प्रणाम ‼️🙏🌷


प्रस्तुत त्यांची गझल 👇

‼️🌷‼️🌷‼️🌷‼️🌷‼️🌷👇

ह्या महागाईत सांगा मी कुणाला दान देऊ

जीवनी ह्या रोज थोडा माणसांना मान देऊ


पोरके केले घराशी पावसाने आज काही

घाव सारे भोगणाऱ्या कोणते अस्मान देऊ


वाटते द्यावे जरासे ओंजळीने रोज थोडे

वादळाना रोखन्याला कोणते रे स्थान देऊ


शासनाने तातडीने काम घ्यावे आज हाती

सोसणाऱ्या जीवनी ह्या तो जरा सन्मान देऊ


वाचला तो जीव आहे का तरीही भोगतो रे

वाटते मी त्याच हाती प्रेम त्याला वान देऊ


प्रिया...


बघा ,वाचा प्रियामॅम किती अलवार पणे कवितेतून व्यक्त झाल्या ,कधीही त्यांनी आपले प्रोब्लेम सांगितले नाही,कधीही कोणत्याही काव्य प्रकाराबद्दल विचारले की त्या योग्यरित्या समजुन सांगतात. 

पुढील वाटचालीत माझा त्यांना शुभ आशिर्वाद व खुप प्रगतीपथावर त्या जावो ह्याच शुभेच्छा.!🙏🙏🙏🙏🙏

‼️🔆‼️🔆‼️🔆🔆‼️‼️🔆‼️🫒‼️🔆‼️🔆‼️


पुढील  गझलसम्राज्ञी  आहे 


सौ वृषालीताई जोशी 



💥💥💥💥💥💥💥💥

सौ. वृषालीताई जोशी यांना मी माझी ताईच मानतो, त्याही मला आदरस्थानी आहेत सहृदय, प्रेमळ, एक आदर्श शिक्षका,गृहिणी,प्रतिभावंत साहित्यिक, सर्वच प्रकारात साहित्य लिहिणार्या, कवितेत शब्दाची उत्तम पकड व जाण असलेल्या ,साहित्य पर्वणी या कवि,कवियत्री समुहाच्या कंट्रोलर  , शब्दलेखणी या शब्दसमूह समुहाच्या आधारस्तंभ अशा आमच्या वृषालीताई  🙏💥कधीही प्रेमळ वाणीने बोलणार्या, चुकले तर समजविणार्या, मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या वृषालीताई यांना माझा मानाचा प्रणाम 🙏🔆🙏🌺🔆🙏


त्यांची गझल बघा👇

वृत्त:- व्योमगंगा

लगावली:- गालगागा गालगागा गालगागा गालगागा


चांदण्यांच्या सोबतीला चांदव्याला मान आहे

एकल्या त्या यामिनीला एवढे ते भान आहे


गुंतलेले अंतरीचे दाट होती भाव वेडे

बांधलेले पाश सारे बंधनांचे रान आहे


गारवा हा या मनाला सूर देई साज देई

माळरानी प्रेमरंगी रंगते हे गान आहे


कोवळ्या या किरणजाली बंध बांधी सावली ही

मुक्ततेला भावबंधी विहरण्याचे दान आहे


अंगणी या मोगरा हा परिमळे का धुंद होई

गंधलेल्या या क्षणाला चुंबनांचे वाण आहे


सौ. वृषाली निलेश जोशी

🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆

कशी वाटली तुम्हाला ताईची गझल  आनंद दिला की नाही.  वॄषाली ताईच्या गझलेत आणि कोणत्याही काव्यप्रकारात एक वेगळ्याच प्रकारची अनुभुती व आनंद वाचकाला होते. व वाचक मंत्रमुग्ध होऊन वृषालीताईचे काव्य वाचन करतो. नियमावलीत बसणार्या त्यांचा गझल असतात.


त्यांच्या पुढील लिखाणासाठी माझ्यातफॅ अनेक हार्दिक शुभेच्छा.!


ताईला माझा सप्रेम नमस्कार 🙏‼️‼️🙏😊🙏‼️🙏😊‼️


पुढील गझलसम्राज्ञी 

‼️🙏सौ. वंदनामॅम सोरते.




🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷

वंदनामॅम ला माझा सप्रेम नमस्कार 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

वंदनामॅम बद्दल काय बोलावे, त्यांच्या सारखी साहित्यासाठी मेहनत कोणी घेतली नसावी. रोज प्रतिलिपीवर दिलेल्या विषयानुरुप खुपच छान कविता रचतात, त्या प्रत्येक कविता एवढ्या सुंदर असतात की, प्रत्येक वाचकाचे मन मोहून जाते. 


रोज विषयानुरुप लिखाण त्या सवॅच श्रेणीत करुन प्रत्येक श्रेणीतुन त्या प्रथम क्रमांकावर येतात. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांना कवितेतला गझल प्रकार येत नव्हता. पण आदरणीय येवलासरांकडुन त्यांनी शिकुन घेतला. व आज त्या गझल खुपच उत्कृष्ट लिहतात. आतापर्यंत त्याच्या गझल १०० च्या आकड्यात पोहचल्या आहे.

वंदनामॅमची गझल वाचा.👇

गझल..!🌻

🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

आयुष्याच्या प्रांगणी मी हरत गेले...

.जीवनाचे गणित माझे सरत गेले! 


भेद हेची जाणले का कोणी...

आयुष्य हे जलसमानच तरत गेले


..सोडवून मी बघत आहे कोडे..

..व्याज सारे भांडवल ही परत गेले..


..सुटत नाही गणित हेची जीवनाचे.!...

..प्रश्नच माझ्या मी मनाशी करत गेले...


. साधले ना मांडलेले तीक्ष्णच दावे..!.

फसवूनी त्या मृगजळी मी हरत गेले गेले...


.....मंजूघोषा काव्य.....


लगावली:- गालगागा गालगागा गालगागा...

रदिफ:- गेले........

काफिया:- हरत सरत,परत,करत,हरत..


..शब्दशिल्पी" वंदू"..........(..वंदना सोरते"

काव्यसमाज्ञी")


रोजच विषयानुरुप त्या एक गझल लिहितात, आणि प्रत्येक प्रकारात त्यांची रचना प्रतिलिपीवर सजते, बालसाहित्य ही श्रेणी त्यांची आवडती श्रेणी ! आणि वेळात वेळ काढून त्या गझल या प्रकारात  लिहितात. 



पुढेही अशीच साहित्यात प्रगती करीत राहाव्या व आपल्या साहित्याची पातळी वाढवित राहाव्या..! ह्याच त्यांना माझ्या तफॅ शुभेच्छा.!


🔅🌷🔅🌷🔅🌷🔅🌷🔅🌷🔅🌷


यानंतरच्या गझलसम्राज्ञी पुढिल प्रमाणे


‼️सौ. राजश्रीताई जाधव 🙏



राजश्रीताईना माझा नमस्कार, 🙏

राजश्रीताई  बरेच दिवसापासून प्रतिलिपीवर साहित्य लिहितात, त्यांच्या कविता ,लेख खुप छान असतात. त्या आमच्या काव्यपुष्पावर कविता, लेख फारच सुंदर लिहितात. स्वभावाने उत्तम व्यक्ती असुन, त्यांनी आपल्या कविता लिहण्याचा छंद उत्तम रित्या जोपासला आहे. 


त्यांनी गझल लिहायला आता ,आता सुरुवात केली ,परंतु त्यांच्या " गझल" वाचल्या की, तो नविन पणा जाणवत नाही. 


दुसर्याचे साहित्य प्रतिलिपीवर व काव्यपुष्पावर वाचन करुन त्यांना समिक्षा देऊन साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्या नेहमीच करतात.

त्यांची गाजलेली गझल पुढिल प्रमाणे👇

वृत्त :- महामाया , लगावली :- लगागागा लगागागा 

जिभेला धार ही आहे 

कराया वार ही आहे 


दुःखाचे भोग भोगावे 

सुखाला पार ही आहे 


नसावा त्रास कोणाला 

खरा तो सार ही आहे 


मनाचे सूर लागेना 

जुळेना तार ही आहे  


नसे  आधार कोणाचा 

सदा का भार ही आहे  


सौ. राजश्री सुहास जाधव.


किती सुंदर रित्या राजश्रीताईने आपल्या मनातले भाव या गझलेत प्रगट केले आहे. एका कविला, कवियत्रीला ,लेखक., लेखिकेला कविता अथवा कथा, लेख लिहतांना आपला जीव ओतावा लागतो, आपल्या प्रतिभेचा कस लावावा लागतो, शब्दाचा शब्दकोश, भावना रित्या कराव्या लागतात. 


पण वाचक त्याची पर्वा करित नाही. कोणी वाचुन समिक्षा दोन शब्दाची न देताच निघुन जातात. 

म्हणुनच मग लेखकाच्या मनात निराशा उत्पन्न होते. बरे असो.


वरील लेख मी " गझलसम्राज्ञी" म्हणुन या पाचही स्त्रिशक्तीचा गुणगौरव माझ्या लेखणीतून करण्याचा एक छोटासा कयास केला. हा लेख मी आपल्या मर्जीने या पाचही व्यक्तींच्या सहमतीने लिहलेला आहे. 


हा लेख लिहितांनी मी कुठलेही साहित्य चोरलेले नाही. प्रत्येकीच्या गझल ह्या त्यांच्या नावाखाली दिलेल्या आहे. त्या त्यांच्या स्वरचित  आहे. 


त्या त्यांच्या परवानगीनेच लेखात टाकलेल्या आहे. प्रत्येक गझलसम्राज्ञी मला आदरस्थानी आहेत. एका गुरूच्या ठिकाणी आहे.

हा लेख म्हणजे त्यांची एकमेकींशी केलेली तुलना नव्हे. 

प्रत्येकीचे एक आगळेवेगळे आपल्या साहित्य क्षेत्रात  स्थान  आहे.


तेव्हा कोणाला राग नाही लोभ नाही.🙏😊😊🙏

पुढिल यशासाठी पाचही कवियत्रीला अनेक अनेक शुभेच्छा.!


लेखक 

मोहन सोमलकर 

🙏😊🙏😊🙏

©️®️

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...