मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, ३० जानेवारी, २०२२

वाढदिवस उदयराव परुळकरांचा

 

Gallery 

तसे पाहिले तर श्री. उदयराव परुळकर यांचा व माझा काहीच संबंध नाही. आणि तसे पाहिले तर आहेही.  त्याचे असे की, प्रतिलिपी, काव्यपुष्प  या साहित्यिक समुहातील प्रतिभावंत कवियत्री व लेखिका सौ. रंजुजी उर्फ उर्मिलाजी परुळकर यांचे उदयराव परुळकर हे यजमान आहे.




सौ. उर्मिलाताई परुळकर ह्या बहुआयामी व्यक्तीमत्व आहेत.  

प्रतिलिपीवर दोन वषाॅपासुन लिहिता लिहिता माझी व रंजुजीची समिक्षाच्या माध्यमातून व लेखनाच्या माध्यमातून ओळख झाली. पाहता पाहता. त्या नागपुरच्या आहेत व "लोकांची मुलींची शाळा, नागपुर " इथे त्यांचे शिक्षण झाले हे कळले. आनंद माझा द्विगुणित झाला. 


कारण" लोकांची मुलींची शाळा " इथे माझ्या दोन्ही बहिणीचे शिक्षण झाले. लोकांची शाळा म्हटले तर पंधरा मिनिट अंतरावर असलेली शाळा. याचा मला खूप आनंद झाला. 

माझी मग मनातील इच्छा रंजुजी व त्यांच्या कुटुंबीयांना झाली.  


असेच मग एकदा समिक्षेतुन त्यांना फोन नंबर विचारला व वार्तालाप करुन पत्ता विचारला. 


तसा मी एकाएकी कुणाकडे जात नाही, नागपुरात एवढे सारे नातेवाईक आहे  मित्र आहेत   ,परिचित आहेत परंतु मी जास्त कधी  त्यांच्याशी तरी घरी जाऊन भेट घेतली नाही.


परंतु का कुणास ठाऊक रंजू जी यांना एकदा तरी भेटून त्यांच्याशी संवाद साधावा असे मला मनोमन वाटले .त्यानंतर मी  आज उद्या जातो जातो म्हणुन, दोन महिन्यानंतर त्यांचे घर गाठले आणि त्यांच्या घरी गेलो.अगदीच माझ्या घराजवळ जगनाडे चौकात व्यंकटेश नगर येथे त्यांचे वास्तव्य आहे. घरी गेल्यानंतर त्यांच्याशी व त्यांच्या मिस्टरांची वार्तालाप केल्यानंतर दोन ते तीन तास कसे गेले हे मला कळले नाही.

एकदम मला घरच्या सारखे वाटले , उदय राव परुळकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर असे वाटले, जसे काही ते माझे जुने मित्र असावे. सरळ मनाचे गमतीशीर बोलणारे समोरच्या व्यक्ती सोबत उत्साहाने विचारपूस करणारे ,विनोदी स्वभावाचे असे उदयराज परुळकर  सरांना मी अनुभवले.जश्या व्यक्तिमत्वाचे  ते वाटले .


तशी त्यांच्यासोबत जेवढी चर्चा करावी तेवढी कमीच आहे, सकाळी बसलो आणि संध्याकाळ झाली वेळ कसा निघाला मलाच माझे कळले नाही  बोलता-बोलता त्यांनी मला एवढे आपलेसे केले की,पुढल्या वेळेस  आपली कन्या व मिसेस सोबतच घेऊन या, असे ते व रंजुजी म्हणाल्या. या दोघांच्याही मनात माझ्या व माझ्या कुटुंबाबद्दल खुप आत्मियता वाटली. अगदी आनंदमय स्वभावात त्यांच्यासोबत चर्चा झाली ,अशा पद्धतीची  चर्चा रंगली व संध्याकाळी कधी झाली कळले नाही.मी घरी निघायला गेलो तर परुळकरजी व रंजुजीचा चेहरा खिन्न झाला.


पुन्हा कधीतरी परत भेटावे असे म्हणून मी त्यांचा त्या दिवशी निरोप घेतला, मला वाटले त्यानंतर परत एकदा त्यांच्यासोबत भेट घ्यावी.  आणि लगेचच काही कारणास्तव त्या भागात गेलो असता त्यांची भेट घेतली  अगदी उत्तम व्यक्तिमत्व असलेले उदयराव परुळकर ह्यांच्याशी माझे मित्रत्वाचे संबंध जुडले.

🙏🙏🙏🎊🙏🎊🙏🎊🙏🎊🙏🎊🎊🎊🍫


परुळकर कुटुंब 

परुळकर कुटुंबाशी संवाद साधण्याची संधी फक्त रंजूताई परुळकर व उदयराव परुळकर यांच्याशीच मला मिळाली. परुळकर कुटुंब हे एका प्रतिभावंत व साहित्यिकांचे कुटुंब आहे. 


उदयराव परुळकर 


उदय राव परुळकर हे कुटुंबाचे आधारस्तंभ ! उत्तम समिक्षक, वाचक व साहित्याचे जाण असलेले व्यक्तीमत्व. 


रंजुजी परुळकर 


रंजुजी परुळकर ह्यांच्या बद्दल काय सांगावे. प्रतिलिपीवर "चारोळी क्विन" "चारोळी एक्स्प्रेस " म्हणुन प्रसिद्धीच्या झोतात आहेत. 

प्रतिलिपीवर, काव्यपुष्प समुहात त्यांचे लिहलेले साहित्य चारोळ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चारोळिची संख्या प्रतिलिपीवर ३५०० च्या घरात आहे. त्यांच्या साहित्यातुनच नेहमीच सामाजिक, जीवनविषयक, मनोरंजक ,कौटुंबिक साहित्याचा उलगडा होतो.


त्या नेहमीच आपल्या कुटूंबातील सदस्याप्रतीचे प्रेम आपल्या चारोळितुन दर्शवतात. 





मुलगा अमेय( बंटी) ,सुन (आशा) ,नातवंड त्यांचे (ब्रम्हा, विष्णु, महेश ) I.e. अबिर,अमनी अमायरा.याबद्दल त्या नेहमीच आपल्या साहित्यातुन कोड कौतुक करतात.



मुलगा अमेय(बंटी)

मुलगा अमेय हा सुध्दा प्रतिलिपीवर लिखाण करतो, त्याच्या उत्कृष्ट कविता व लेख  प्रतिलिपीवर प्रसिद्ध आहे.


नुकतीच त्याची युट्यूब वर" एहसास "नावाची देशभक्तीची व सामाजिकतेवर प्रकाश टाकणारी कविता मी ऐकली , वाचुन व ऐकुन मी दंगच राहिलो.काय प्रतिभाशैली त्याला त्याच्या आईसारखी लाभलेली आहे. 


खुप छान अभिव्यक्ती त्याने कवितेतून व्यक्त केली, सादरीकरण व संवाद उत्तम होते.


अमेयचे तीनही अपत्य मस्त खोडकर आहेत.  अबिर,अमनी,व अमायराची जेवढी तारिफ करावी तेवढी कमीच आहे. तसेच सुन आशा तर रंजुजी व उदयराव यांना सदैव मुलीचेच प्रेम देत आली. 



मुलगी,जावई व नातवंड 

मुलगी प्रिती निलदावार ही सुध्दा प्रतिलिपीवर लेखिका व कवियत्री आहे. प्रतिलिपीवर त्यांच्या उत्तम कविता प्रसिद्ध आहे. परुळकर परिवाराची शान असलेली प्रितीताई निलदावार पूर्वाश्रमीची मिस.नागपुर या किताबाने गौरवान्वीत केलेली कन्या आहे, ती परुळकर व निलदावार या दोन्ही घराण्याची शान आहे.


जावई  श्री. अनिरुद्ध निलदावार  मिलनसार व्यक्तीमत्व आहे.


नातवंड 

अबिराम व रिमझिम 

परुळकर परिवाराचा लाड व गोकुळ आहे.



असे हे साहित्यिक क्षेत्रातील कुटुंब व त्यांचे साहित्यातील मोलाचे स्थान पाहुनच मी गदगदून गेलो.


परुळकर परिवाराचे आधारस्तंभ उदयराव परुळकर यांच्या आज वाढदिवसानिमित्त संपुर्ण परिवारास मनातुन हार्दिक शुभेच्छा.




मोहन सोमलकर व परिवाराकडुन श्री. उदयराव परुळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!



गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

आसमंत तारकांनी फुलला

 


आसमंत फुललेला॥नभात फक्त चांदणे॥

गाऊया चलारे गाणे॥ आनंदाने॥


चंद्र नाजुक दिसला॥ गालात हळु हसला॥

खेळ सावलीचा झाला॥ आज सखे॥


आसमंत खुश भासे॥ गालात वातावरण ॥

सुंदर आहे ते क्षण ॥ आनंदी मन॥


गळ्यात घालुनि गळा॥ हातात हात तुझाच ॥

चढला अंगी रोमांच ॥ आज सखे॥


मोहन सोमलकर 

प्रजासत्ताक दिन

 


नुसते १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला

देशाचे स्मरण करुन कृतज्ञता व्यक्त करु नका

देशासाठी जगा,समाजहित मनात जागवा

स्वाभिमान तिरंग्यासाठी आयुष्यभर जागवा.!


कित्येक समाजसेवक, क्रांतिवीर, देशसेवक 

आपला श्वास, आपले शरिर आपले सर्वस्व 

या भारतमातेवर अर्पण करुन अजरामर झाले

लावले पिटाळून इंग्रजांना, त्यांच्यावर केले वर्चस्व! 


विर सैनिकांनी,विर शिपायांनी दिली प्राणाची आहुती 

बाबासाहेब, टिळक, सावरकर, गांधीजीची देशसेवा होती

ज्यांनी भारतभुची माती आपल्या रक्ताने व प्राणाने जपली

वीर मरण सीमेवर पत्कारुनी सैनिकांनमुळे मातृभुमी श्रृंखलेतुन मुक्त झाली होती!


एक दिवस फक्त डिपीवर तिरंगा ठेवून देशभक्ती नाही होत

कित्येक शहिदांनी दहादिशातुन प्राणाची लावली ज्योत 

आठवण तयांची समाजसेवा करुन रोज करा..

आयाबहिणाचा मान करा ,नित्यरोज त्याही आपल्या भगिनी होत.!


जयभारत देशा, मंगलदेशा.!

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

मोहन सोमलकर 

©️®️


वाढदिवस बाबा ताजुद्दिनांचा

 


अबोल नाते(बाबा ताजुद्दिनाचे)

जय बाबा हजरत ताजुद्दिनाचा विजय असो


बाबा तुझ्या दरबारी लोकांचा ओढा

प्रत्येक नर नारी धाव घेतो तुझ्याकडे

आशिष घ्यावया तव चरणी नतमस्तक होतो


ताजुद्दिन बाबा नागपुर क्षेत्री 

आज आहे तुझा गाजावाजा

कामठी स्थित तु जन्मला 

बाबा एका ठिकाणी नाही टिकला.!


मिलिट्रीत केली फौजदारी काही दिवस

तिथेच तुझा साक्षात्कार घडला

छावणीतल्या पागलखाना इस्पितळात 

तु किती दिवस बाबा राहिला..!


राजे रघुजी भोसले यांनी

तुझे मोठे चमत्कार अवगतले 

जिथे स्थित आहे छोटा ताजबाग 

तो रघुजी भोसलेंचा वाडा अर्पण तुला केला ताजबाग नाव दिले.!


छोटा ताजबाग स्थित होते प्राणीसंग्रहालय 

पक्ष्यांचा असे मेळा..!

दिवसेंदिवस सर्व संपले 

अस्तित्व तुझ्या नावाचे राहिले..!


जनसमुदाय, जनसागर येतो भेटीला

तुझ्या वाढदिवसी २७ जानेवारीला 

संपुर्ण नागपुर हजरत बाबा ताजुद्दिनांच्या 

गजराने दुमदुमते, केक घेऊनी येई सगळे तुझ्या भेटीला!


🌷जय श्री. बाबा ताजुद्दिनाचा विजय असो🌷


मोहन सोमलकर 




🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎂आज बाबा हजरत ताजुद्दिन यांचा वाढदिवस आहे.

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

खऱ्या जीवनात खरा किरदार.... सुरज

 


सुरज एक असा कलाकार 

आपल्या कलेने दुसर्‍यास हसवितो

तो गातो,डान्स करतो.!

कवितेतून तो व्यक्त होतो..!


सुंदर सुरजची लकब 

तो व्हिडिओ मिडीयात जाऊन 

सुंदर तयार करतो

होतात सारे आनंदुन .!


प्रतिभा त्याची उंचावी

साहित्याच्या गगनी मारावी त्याने भरारी

नजर त्याची करारी.!

नाव रोशन करण्याची करतो तो तयारी.!


रंजूताई ने दिलेली शर्ट आवडिने घालतो

अनघाताई चे गिफ्ट आठवणीने स्विकारतो 

राजश्रीताई चा मान करतो

वंदना ताई ला वंदनीय मानतो.!


खुप गुणवान तो सुरज

आबाचे म्हणणे ऐकतो

सर्वाचा आदर करुन

मनात जागा मिळवतो.!



मोहन सोमलकर 🙏



मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

तिळगुळ ....एक आकलन

 


तिळगुळ......एक चिंतन

तिळाच्या भेटिला गुळ यायचा

तिचा साजशृंगार मकरसंक्रांतीत दिसायचा 

सारे सण आम्ही साजरे करायचो

वर्षाचा शेवटही आनंदात व्हायचा..!


सुखदुःखाचे नाते जीवनात 

उनसावली सारखे वाटे

कोणा परक्यालाही वेदना झाल्या तरी

अंतःकरण अश्रुनेच आपलेच दाटे..!


आले कसे हे महामारीचे सावट

कोणी रचला असेल बरे हा कट

कोणी कोणासाठी नाही करत वटवट

आपल्याच घरी बसा ही जगण्याची उरली अट.!


आनंदाच्या सरी कधी बरे येईल

हसतमुखाने,आणि निर्भयतेने कधी आयुष्य जगु

आपलेच आयुष्य आपण कधीपर्यंत 

देवाला असे आमिष दाखवुन कितीदा मागु..!


नाही कुठे जाता येत, नाही कुठे फिरता येत

एक एक दिवस सरुन वर्ष पुढे चालले

कोणते सण ,कोणते महोत्सव आहेत

सारेच कसे भारताची संस्कृतीत विसरत चालले.!


तीळात मिसळतो गुळ मग येतो खाण्यात गोडवा

अहो, पोळ्याचा,होळीचा,दिवाळीचा विसरलो पाडवा

आता ऑक्सिजन कमी पडत आहे....!

आतातरी जागे व्हा आया,बहिणीनो, बापांनो ,भावांनो पाणी अडवा.!



मोहन सोमलकर 🙏😊👍

मैत्रीच नातं

 


जसा गरम गरम वरणभातावर

गरम गरम तुप टाकुन 

करतो कालवाकालव 

तशी मैतरीची होते हालवाहालव 


जशी विरघळून जाते दुधामंदी साखर 

जशी लागै गोड चटणी सोबत भाकर 

मग  भरल्या पोटावरुन 

समाधानाची देतो आपण ढेकर..!


सारे नौकर चाकर मिळुन मिसळुन 

करतात कष्ट खुप 

धंद्यात होतो असा नफा

येते सर्वास हुरूप.....!


तसेच टिकवून ठेवा खऱ्या मैत्रीचं नातं

जसे चमके मान्यामंदी तलवारीचं पातं..!



मोहन सोमलकर 

Copyright 

/^=^=^=^/



सैनिकांवर प्रेम व आदर जागवा मनात

 



*
विमानातलं जेवण*


विमानात मी माझ्या सीटवर बसलो. दिल्लीला जायचे अंतर अडीच तासांचे आहे. पुस्तक वाचणे, तासभर झोप घेणे .. 

या गोष्टी मी माझ्या प्रवासात 

बहूधा करतो.


टेक ऑफच्या अगदी आधी १० सैनिक आले आणि माझ्या आजूबाजूच्या सीटवर बसले. सर्व जागा भरल्या. 

मी माझ्या शेजारी बसलेल्या सैनिकाशी संवाद साधला …

"कुठे जात आहात ?"


"आग्रा, सर ! दोन आठवडे तिथे प्रशिक्षण घेणार आहोत. त्यानंतर, आम्हाला ऑपरेशनसाठी पाठवले जाईल," तो म्हणाला.


तासभर गेला. घोषणा ऐकू आली. ज्यांना पाहिजे ते पैसे भरून जेवणाची पॅकेट्स मागवू शकतात. दुपारच्या जेवणाचा ताप संपला असे मला वाटले, मी पर्स घेऊन माझे दुपारचे जेवण बुक करण्याचा विचार करत असताना एका सैनिकाचे बोलणे ऐकू आले.

"आपणही जेवण मागवूया का ?" 

एका सैनिकाने विचारले, 

"नाही ! त्यांचे जेवण महागडे आहे. आपला प्रवास पुर्ण झाला की विमानातून उतरून नेहमीच्या हॉटेलमध्ये जेवू या !"

"ठीक आहे !" इतर सैनिकांनी लगेच मान्य केले.


मी फ्लाइट अटेंडंटकडे गेलो व तिला सर्व सैनिकांच्या जेवणाचे पैसे दिले अन् म्हटले "सगळ्यांना जेवायला द्या." मला तिच्या डोळ्यात अश्रू दिसले. "माझा धाकटा भाऊ कारगिलमध्ये आहे, सर ! तुम्ही त्याला जेवण दिल्यासारखं वाटतंय सर." 

मी माझ्या सीटवर येऊन बसलो.

अर्ध्या तासात सर्वांसाठी जेवणाची पॅकेट्स आली... मी जेवण संपवून विमानाच्या मागे वॉशरूमला जात होतो. मागच्या सीटवरून एक वृद्ध गृहस्थ आला, "माझ्या सगळं लक्षात आलंय, तुझं अभिनंदन, मला या चांगल्या कामात वाटा घ्यायचा आहे” असे म्हणून माझ्याशी हस्तांदोलन केले व 500 रुपयांच्या काही नोटा त्याने माझ्या हातात ढकलल्या ... "मला तुझ्या आनंदात सहभागी होऊ दे."


मी परत आलो व माझ्या सीटवर बसलो. अर्धा तास गेला. विमानाचा पायलट माझा सीट नंबर शोधत माझ्याकडे आला. तो माझ्याकडे बघून हसला. तुमच्याशी हस्तांदोलन करायचे आहे असे तो म्हणाला. मी माझा सीट बेल्ट सोडला आणि उभा राहिलो. 

तो माझा हात हलवत म्हणाला, 

"मी फायटर पायलट होतो. तेव्हा तुझ्यासारख्या कोणीतरी मला जेवण विकत आणले. ते तुझ्यातील प्रेमाचे प्रतीक आहे. ते मी कधीच विसरणार नाही."


विमानातील प्रवाशांनी टाळ्या वाजवल्या. मी थोडा संकोचलो. 

मी केली ती चांगली गोष्ट होती पण मी ते कौतुकासाठी केलेले नव्हते.


प्रवास संपला. मी उठलो आणि पुढच्या सीटकडे गेलो व उतरण्यासाठी दाराजवळ उभा राहिलो. एका तरुणाने माझे नाव टिपुन घेतले आणि माझ्याशी हस्तांदोलन केले. दुसऱ्या एका व्यक्तीने माझ्या खिशात काहीतरी ठेवले आणि न बोलता निघून गेला. दुसरी टीप.


विमानातून उतरताना माझ्यासोबत उतरलेले सैनिक एका ठिकाणी जमा झाले होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि विमानातील सहप्रवाशांनी मला दिलेल्या नोटा काढल्या आणि त्यांच्या हातात दिल्या, "तुम्ही तुमच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी हे पैसे तुम्हाला काहीही खाण्यासाठी उपयोगी पडतील. *आम्ही जे काही देतो ते कमी आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या संरक्षणापेक्षा …"*

माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले.


ते दहा सैनिक विमानातील सर्व प्रवाशांचे प्रेम आपल्यासोबत घेऊन जात आहेत. माझ्या गाडीत चढताना, "जे या देशासाठी प्राण देणार आहेत त्यांच्या दीर्घायुष्याची काळजी घे, परमेश्वरा !” अशी मी मनापासून देवाला प्रार्थना केली. 


*एक सैनिक असा असतो जो भारताला दिलेल्या कोऱ्या चेकप्रमाणे आयुष्य घालवतो.*


तरीही त्यांचे मोठेपण न जाणणारेही आहेत ! 

तुम्ही शेअर करा किंवा नका करू तुमची निवड ! 

भारतमातेच्या या प्रेमळ बालकांचा आदर करणे म्हणजे आपल्या स्वतःचा आदर करणे होय !


 जय हिंद 🙏

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

(आवडल्यास नक्की फॉरवर्ड करा)

 👮‍♂️👮‍♂️👮‍♂️👮‍♂️👮‍♂️


मोहन सोमलकर 🙏🙏🙏


शनिवार, १५ जानेवारी, २०२२

स्वयंपाकघर

 


दिसते ते स्वयंपाक घर वरवर

असते ते अन्नपूर्णा मातेचे वस्तीस्थान

समृध्दी नांदते जिथुन दिसते

अन्नधान्याला भरुन मिळे मान..!


तो खजिना गृहिणीचा तिथे

तिथेच सारी खाद्याने ,कडधान्ये 

तिथेच सारा मुलद्रव्याचा खजिना

आत्मा ,मन वसते गृहिणीचा मानाने


सुगंध दरवळतो,मनाला बहरवितो

तिथे तृप्तीची ढेकर मिळते

जल शांत ,शितल तिथले करुनि ग्रहण

भुकेचे आक्रंदन कमी होते...!



स्वयंपाकघर असते आपुलकीचे 

दोन शब्द व्यक्त करण्याचे स्थान

आरोग्यासंबंधी मिळे तिथे खनिज

स्वयंपाक घर हर गृहिणीचा अभिमान.!



मोहन सोमलकर 🙏🙏🙏🌹🌹🌹😊🍉🍑🍊🍊🍊🍊🍊नागपुर 

नागपुर गेट-टुगेदर कार्यक्रम सफल

 

My gallery 

नमस्कार मित्रांनो🙏🙏🙏🙏🙏

नागपुर गेट-टुगेदर कार्यक्रम दि. ०९ ०१ २०२२ला नागपुर स्थित हुडकेश्वर आऊटर रिंगरोड ,लड्डू च्या  धाब्या बाजुला जगदंबा लाॅन मध्ये सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत  थाटामाटात, आनंदात, मौजमजेत सगळ्याची ओळख होत पार पडला, या कार्यक्रमात काही लोक चंद्रपूरचे सोडता सर्व गेट-टुगेदर समुहात सदस्यांनी सहभाग घेतला होता.

चंद्रपूरच्या मनिषाताई भोयर वांढरे, राजुर्याच्या निशा पांढरे ,भैरवीताई रेळे, तसलिमा नसरीन  ,पुष्पा भोसले, सुवार्ता सुधाकर धिवरे मॅम, पवनकुमार जाधव, राणी रामटेके(वर्धा) इच्छा असुनही  काही कारणास्तव हजर राहु नाही शकले, पंरतु देणगीतून स्वरुपात त्यांनी दिलेली रक्कम व त्यांचे आशिर्वाद कार्यक्रमास फलदायी ठरले.

कार्यक्रम सफल करण्यामागे श्री. अतुल देशमुख सर लाॅन मालक दिनेश बानाबाकुळे सर, रंजूताई परुळकर आधारस्तंभ, मोहन सोमलकर आधारस्तंभ, कल्पनाताई आधारस्तंभ, ज्ञानदेवी वानखडे प्रास्ताविक,  कल्पनाताई व योग कदम (सूत्रसंचालन), रजनी ठाकरे व नितिन भाऊ शिंदे(सूत्रसंचालन) पल्लवीताई चरपे मार्गदर्शक, अनघाताई, दिक्षा चव्हाण, रंजना मॅम, उर्मिला डिसुजा, माधुरी गोतमारे,नागपुर,  अर्चना कोहळे नागपुर,  शितल उमरे, हेमानी पाटील, संजय सावरकर नागपुर, वंदना सोरते,गडचिरोली, सुरज माने सातारा, डाॅ. प्रदिप फड( भयकथा लेखक,नागपुर), सौ. मंजुषाताई पराजित नागपुर, श्री. साहेबराव तुपे मिस्टर अॅण्ड मिसेस,  (हिंगणा नागपुर) हे प्रतिलिपीवरील साहित्यिक हजर होते.

गेट-टुगेदर कार्यक्रम सफल व मनोरंजन करण्यात सर्वाचेच सहकार्य लाभले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून १)रेल्वे पोलीस प्रोटेक्शन फोर्स अधिक्षक श्री. किरण भोसले परिवारासह आले होते,
२) प्रशांत साबळे नागपुर सहायक पोलीस निरीक्षक
३) हुडकेश्वर पोलीस स्टेशन अधिक्षक
४)श्री. उमेश नेमाडे , नगराध्यक्ष भुसावळ
५) श्री. दताभाऊ सावंत ,बारामती..

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माते समोर श्री. किरण भोसले सर यांनी दिप प्रज्वलन करुन केली. त्यानंतर श्री. उमेश नेमाडे,दत्ताभाऊ सावंत, उर्मिलाताई परुळकर, मंजुषाताई अपराजित या सर्व मान्यवरांकडून दिप प्रज्वलन झाले. त्यानंतर सरस्वतीवंदना झाली. सगळ्याच प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. श्री. प्रशांत साबळे व हुडकेश्वर थाना निरिक्षक कार्यक्रमात उशिरा पोहचले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्री. योग कदम  व कल्पनाताई ओण्ली आयडिया या दोघांनी श्रोत्यांचे मनोरंजन करुन केले.
आकर्षक पध्दतीने केलेले सूत्रसंचालन थट्टा मस्करी करित ,श्रोत्यांचे मनोरंजन करित सुंदर सूत्रसंचालनाचा भार योग कदम आणि कल्पनाताईने उचलला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूरच्या ज्ञानदेवी वानखेडे ताईने सुंदर रित्या केले. ज्ञानदेवीने कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नागपुरची महती विषद केली.

प्रत्येक सहभागी साहित्यिकांनी आपल्या दर्जेदार कविता कार्यक्रमात सादर केल्या.

भयकथेचे गड  नागपुर निवासी डाॅ. प्रदिप फड यांनी संपूर्ण नागपुरच्या स्थानिक परिसरातून नागपुरचे दर्शन कवितेच्या माध्यमातून घडविले.

मोहन सोमलकर यांनी गुरुमाऊली ही गुरुवंदनापर कविता व मैत्रीचे नातं  ही वर्‍हाडी कविता सादर केली.

अनघाताई परांजपे या ताईने राज्य स्तरीय संमेलनात सादर केलेली मराठी स्वाभिमानाची कविता उत्तम रित्या सादर केली.

पल्लवीताईची वर्‍हाडी कविता अर्ध्यावर राहिली.याबद्ल मला खंत वाटते.

वंदना सोरते मॅम नी उत्कृष्ट गझल सादर केली. रजनी ठाकरे नागपुर हिने हिन्दी गझल व वर्‍हाडी कविता सादर केली.

साहेबराव तुपे यांनी २०१२ साली लिहलेली, एका स्त्रीविशेष वर कविता खुप छान रित्या सादर करुन कौतुकास्पद वाचन कवितेचे केले.

कार्यक्रमाचा मध्यंतरानंतर दुपारचे जेवण झाले. कार्यक्रम चालु असतांना संगितवृदांनी ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून विविध गाणे म्हणुन सगळ्यांचे मनोरंजन केले.

कार्यक्रम सुरु होण्याआधी पाऊसानेही कार्यक्रमात हजेरी लावून विघ्न टाकण्याचा प्रयत्न केला.

जेवणानंतर दत्ताभाऊ सावंत ने सगळ्यांना प्रमाणपत्र बहाल केले. व वाराणसी हुन आणलेले गंगाजल भेट दिले. तसेच वाराणसीचे ब्रेसलेट,किचेन भेट दिले.

सर्वात शेवटी रंजुजी परुळकर यांनी आभारप्रदर्शन करुन कार्यक्रमात सगळ्यांचेच कौतुक करुन आभार मानले, त्यांचे आभार प्रदर्शन दर्जेदार होते.

कार्यक्रमाची सांगता मोहन सोमलकर सरांच्या .....प्रिया तु अब तो आजा....! मोनिका ओह माय डार्लिंग  ... या गाण्यावर डॅशिंग डान्स करुन झाली.

विरलेली चेहरे डान्सच्या माध्यमातून पुन्हा हसायला लागली.

प्रत्येकजण आनंदाने तिथुन निघता निघता आपल्या सोबत अविस्मरणीय आठवण घेऊन पाय काढु लागला.

कार्यक्रमाला देणगी देणारे
१) रंजूताई परुळकर   १००० ~
२) सुवार्ता सुधाकर धिवरे १००० ~
३)सौ. भारती मोहन सोमलकर ५०० ~
४) शितल उमरे ५०० ~
५) सौ. मंजुषाताई अपराजित ५०० ~
६) सौ. अनघाताई परांजपे ५०० ~
७) चंद्रकांत येवला सर ५०० ~
८) साहेबराव तुपे ५०० ~
९) सौ. वंदनामॅम सोरते ५०० ~
१०) सौ . पल्लवीताई चरपे ५०० ~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                 ६००० ~टोटल देणगी
कार्यक्रमात सगळेच येऊन आनंदी झाले. नागपुर गेट-टुगेदर कार्यक्रमात प्रसिद्ध समाजसेविका प्रतिलिपीवरील जेष्ठ लेखिका व कवियत्री सौ. उर्मिलाताई परुळकर मलेशिया रिटर्न  या थोर स्त्रीची सर्वानी भेट घेऊन आदर व्यक्त केला.
त्यांनी आपल्या घरी कल्पनाताई, वंदनामॅम, सुरज,  रजनी ठाकरे यांना दोन दिवस राजाश्रय देऊन  आपल्या हातुन सेवा घडवुन आणली.

याबद्दल मी परुळकर आधारस्तंभ परिवाराचे खूप खूप आभार मानतो.

या कार्यक्रमासाठी प्रतिलिपीवरील सदिच्छा देणारे व व्हिडिओ मॅसेज देणारे शुभेछुक ✍👇

१) श्री. दत्ताभाऊ जोशीसर
२) श्री. तेजय लिमये
३) मालाजी सबनीस
४) मेघा अरबूज
५) सौ. वर्षा झामरे
६) सौ. वर्षा ताई जगताप
७) श्री. येवला सर
८) श्री. एड. रुपाली सावंत मॅम
९) सौ. रजनी भागवत
१०) श्री. सचिन कोरडे
११) आबा( सतिश सहेर)
१२) सौ. मनिषा वांढरे ,चंद्रपूर
१३)सौ. निशाताई पांढरे
१४) सौ. मानसी आंब्रे
१५) श्री. गणेश दळवी
१६)  श्री.सतिश मुर्तिमंत
१७)श्री.तुषार दादा भुतकर
यांचे आशिर्वाद व सदिच्छा कार्यक्रमाला मनातुन लाभले.

कार्यक्रमात असलेली त्रुटी
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आठ आठ व्यक्तींना बोलविण्यात आले, त्यापैकी फक्त चारच आले.
तसेच कार्यक्रमात मुंबईकरांची गैरसोय झाली. याबद्ल आयोजक दिलगिरी व्यक्त करीत आहे.

बाकी कार्यक्रम खुप छान  झाला.
धन्यवाद

मोहन सोमलकर, 🙏🙏✍✍
✍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

किमत ही कुछ ऐसी थी..!

 


भगवान मुझसे मेरी किमत बता दे तु..

मेरी इस दुनियाॅ मे जगहा कहा है बता दे तु...!


कई आए चेहरे मेरे सामने हसाते गये मुझको कभी

उन चेहरे का हु शुक्रगुजार मुझे जिने का मतलब बता कर चल दिये


ये जमी साथ थी , आसमा न डगमगा 

मेरी राह पर फुल बिछाये जिसने वो मेरे लिए जगा..!


जो मिले दिये रोशनी के ,मेरे लिए जगे

वो लव दिये की बुझी नही ,जल उठी रोशनी के लिए...!


मोहन सोमलकर 🍅🍎🍎🍎🍎

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

सिंधुताई सपकाळ

 


तिचा प्रवास फक्त तिच्यापुरता नव्हता

असंख्य अनाथासाठी तिचे हाथ सरसावले

ज्यांना तिने रस्त्यावरून आणले उचलुन 

त्यांचे डोळे आज होते पाणावले


रडू लागली ओक्सीबोक्सी प्रत्येक ती पिल्ले

ज्यांना आकाशात उडण्यास माईने बळ दिले होते

आईला सरणावर पाहुन बिचारे 

त्या सरणावर तेही बिलगले होते..!


मोहन सोमलकर 

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...