मोहन सोमलकर
मोहन सोमलकर
कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.
शनिवार, ५ जुलै, २०२५
सातपुडा साहित्य मंच..
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम
*विषय- विठूची वारी (अभंग)
शीर्षक:- माझे माहेर पंढरी
चला पंढरीला।। विठ्ठलाला पाहु॥
भक्तीभाव वाहु॥ पांडुरंगा॥१॥
आषाढी कार्तिकी॥ भक्त होई गोळा॥
रम्य तो सोहळा॥ पंढरीत ॥२॥
चंद्रभागे तीरी॥ भेटे वारकरी॥
किती टाळकरी॥ दिसे तिथे॥३॥
वैष्णवांचा मेळा॥ आगळा वेगळा॥
सुखावला डोळा॥ पाहुनिया॥४॥
युगे अठ्ठावीस ॥ उभे विटेवरी॥
कर कटावरी॥ पांडुरंग ॥५॥
तुळशीचा हार॥ गळ्यात शोभतो॥
विठ्ठल हासतो॥ भक्तापुढे॥६॥
हाती टाळ विणा ॥ मुखात अभंग॥
भजनात दंग॥ वारकरी॥७॥
हर एक वर्षी ॥ पंढरीला जावे॥
मुख ते बघावे॥ श्रीहरीचे॥॥८॥
पाहुनिया सारे॥ वाटे मोहनाला॥
जावे दर्शनाला॥ पंढरीला॥९॥
||रामकृष्ण हरी||
मोहन सोमलकर नागपूर 🙏
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ads3
सातपुडा साहित्य मंच..
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
-
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
-
महात्मा फुले राबले॥ खुप कष्ट सोसले॥ त्रासाला नाही भिले॥ कष्ट उपसले॥ दिवसरात्र जागले॥अन्यायाविरुद्ध लढले॥ पुढे सरसावले॥ दिनदलितांसाठी॥ गरिबा...
-
My gallery वाट कष्टाची चालुनि मेहनतीची कास धरुनि आम्ही श्वास इमानाने घेतो रात्रदिवस राबुनिया भाकर कष्टाची खातो.! नको हवी महाल माडी नको ...
अप्रतिम शब्दसौदर्याने पंढरीनाथा चे गुण महात्म्य वर्णन करणारा अभंग!✍️👌
उत्तर द्याहटवाजय जय विठोबा रखुमाई 🚩🌹🙏🙏🙏🚩🌹🙏
धन्यवाद सर
उत्तर द्याहटवा