मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, ३० मे, २०२२

मानसीमॅम चा वाढदिवस

 काव्यपुष्प कंट्रोलर मानसीमॅमचा वाढदिवस 💐🎊🍫



कोणाशी कधी वाद नाही केला

अतूट प्रितीचा धागा सगळ्यांशी जुडविला

अंतरंगात मनाच्या वात्सल्य झळकले

शब्दाची रिती केली ओंजळी सार्यांना जवळ केले.!


वणवा द्वेषाचा त्यांनी आपलुकीने शांत केला

जीवात जीव गुंतवून काव्यपुष्प हा

कल्पवृक्ष त्यांनी कंट्रोलर राहुन

बहरत सदा ठेवला...!



शब्दाचे करा पुष्पगुच्छ 

कोणासही नका समजा तुच्छ

रागद्वेषाचा नायनाट करा

सगळ्यांनप्रति मन ठेवा स्वच्छ..!


आज मानसीजीचा आहे वाढदिवस 

प्रेमाची छटा, आपुलकीची गोडी नांदेल त्यांच्या जीवनी

शब्दात प्रेम,लळा,आपुलकी मानसीमॅम साठी गुंतवून 

वात्सल्य व नात्यांचे रोपटे बहरत ठेऊ त्यांच्या अंगणी..!



मानसीमॅम ला वाढदिवसाच्या खुश खुप शुभेच्छा💐🎊

मोहन सोमलकर 🌹🌹🌹🌹🌹🥳

माधुरीमॅम गोतमारे यांचा लग्नाचा वाढदिवस

 


माधुरीमॅम गोतमारे ( happy marriage anniversary)

फुलला वसंत

फुले फुलली

ओठी लाली

आज आली


बहर शेवंतीचा

मोगराही बहरला

हाती धरला

गुलाब तो लाल



आज होती शांत

किरणांची प्रखरता

गाली गुलाब हसला

कळीची दिसली सुंदरता 


सोहळा रम्य

डोळ्यात आठवु

माधुरीमॅम व सरांना

शुभेच्छा आजच पाठवु


Happy marriage anniversary stay safe,Happy & healthy 💐💐💐🍫🍫🍫🥳🥳🥳👑🥳🎃🎃


Mohan Awadhutrao Somalkar 🎷✍✍

शुक्रवार, २७ मे, २०२२

सौ. रजनीताई भागवत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

 


रजनीताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा‼️

🍫‼️🍫‼️🍫‼️🍫‼️🍫‼️🍫‼️🍫‼️


आकाश होते निरभ्र 

होते ते स्वच्छंद शुभ्र 

पावसाची येण्याची ती वेळ

आपल्या आगमनाचा झाला मेळ


पहाट कोवळी सोनेरी किरणांची

उगवली या धरणीवरी फुलत गेली

दिवस असाच कलेकलेने वाढत गेला

संध्या झाली सुर्य मावळुन रजनी आली


मैत्रीपूर्ण ते सर्वाशी नाते होते

उदारता , आनंदी हा स्वभाव होता

ज्ञानाची व्याप्ती अमर्याद तरी

अहंकार मनात कधीच दिसला नव्हता.!


आयुष्य आपले आनंदित राहावे

सुगंध जीवनात चंदनापरी दरवळावा

जीवनाच्या आकाशी इंद्रधनुष्य तुमच्या

सदा फुलत आणि बहरत रहावा..!


अपयश दुरच राहावे

यशाची सरिता आनंदाचा प्रवाह घेऊन यावी

सुखी तुमच्या जीवनात

मोगरा,जाई,जुई, चमेली या फुलांची मोहकता यावी.!


रजनीताईला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा 

👑💐💐💐💐💐💐💐🍫💐💐💐💐💐



मनाने साठविलेल्या गोष्टी

================


असंख्य अश्या मनात

साठविलेल्या गोष्टी असे

ज्यांचे धागे कुठेतरी 

जुळलेले होते जसे...!


ती मनाची यंत्रणा

मेंदुपासुन मनापर्यंत होती जुळली

डोळ्यात ने जे आत्मसात केले

मेंदुला व मनाला ती गोष्ट कळली



कधी बोलल्या गेली 

कधी मनात साठवून ठेवली

गोष्ट अशी अमुल्य होती

तिला चारचौघांत नाही काढली


मन किती मोठे 

जणु भावना जपण्याची एक पेटी

गोष्ट साठवलेली कुठे बोलावी कुठे चुप्पी साधावी

ही मनाचीच तर आहे ऐटी...!




मोहन सोमलकर 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️

गुरुवार, २६ मे, २०२२

चि. सौ.कां. अश्विनीताई राठोड व चि. सुनिल जाधव यांचा विवाह सोहळा

 


‼️‼️शुभविवाह  सोहळा‼️‼️


आज आहे घडी मुहूर्ताची 

प्रतिक्षा संपली तिची किती दिवसाची 

२६ मे चा तो दिवस शुभ उजाडला

सुरु झाली आज घाई अश्विनीताईच्या लग्नाची.!!


हि लेक स्व श्री. नागोराव व नंदाताई राठोडांची 

लई गुणवान, गुणगौरव घरण्याची 

आनंदात वाढलेली 

आनंदात अंगणी खेळलेली.!


आज पित्याचे पाहिलेले स्वप्न पुरे होत आहे

काल लागली अश्विनीताईला हळद 

आज बोहल्यावर उभी राहणार

आज तिचा शुभविवाह होत आहे.!


राठोडाची ही कन्या गुणवान 

चि. सुनिलांची सहचारिणी जाधव घराण्याची सुन होत आहे

पडतील आज तिच्या डोयीवर अक्षदा 

मंगलमय कार्य आज दोन परिवाराचे घडत आहे.!


उरी दाटुन आले मन माझे

दाटुन आला आज माझा कंठ खुप

जेव्हाचे जुडले अश्विनीताईचे लग्न 

म्हणे याल दादा अवश्य आशिर्वाद द्यायला येईल मला हुरूप 


आज नाही जाऊ शकलो तिच्या शुभ  कार्याला

अश्विनीताई व सुनिलरावांच्या विवाह सोहोळ्याला 

पण दोघांच्याही शिरी खुप मोठा आशिर्वाद राहिल 

खंत मनात उरी न जाण्याची आयुष्यभर राहील!


चि.सौ कां. अश्विनीताई व चि. सुनिल 

यांना होणार्या लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा‼️🎋🥳💐💐💐💐🎊🎊🎊💐🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊



बुधवार, २५ मे, २०२२

सुट्टीतील आठवण

 




●उन्हाळी सुट्टी निमित्त काव्यलेखन स्पर्धा●



□साहित्यिकांच्या हक्काचे व्यासपीठ..□

                      

               

 ============/@/===============÷÷


         विषय* - *सुट्टीतील आठवण*

    शिर्षक:-  " आनंद जीवनातला"

         

 

आठवते मज माझे बालपण

शिस्तबद्ध व खेळण्यात रमणारे होते मन

वर्षभर चालायची शाळा व अभ्यास 

आला उन्हाळा की यायचे आनंदी क्षण ॥१॥


त्या अभ्यासाच्या व शाळेच्या ताणातून मोकळे व्हायचो

संपताच परीक्षा लागल्या सुट्ट्या की आनंदी व्हायचो

मग ओढ लागायची मामाच्या गावी जायची

तिथल्या निसर्गात रमुन आनंद उपभोगायचो..॥२॥


ते गतजन्मीचे दिवस अजुनही आठवतात

गीत मनात सुखावून मग जातात

पुन्हा ते दिवस परत ना यायचे

बालपण ते आठवुन डोळ्यात अश्रु येतात..॥३॥


आता जग आहे बदलले सारे

बालपण मुलांचे हरवले ताणतणावात

अभ्यासाचे मोठे ओझे मुलांवर लादले जाते

वेदना मुलांच्या मनाच्या राहतो आपण पहात ॥४॥


आपल्या इच्छा व आकांक्षा आपण मुलावर लादतो

आपली स्वप्ने त्याच्यातुन पुरे करत असतो

आनंद जीवनाचा त्यांचा हिरावून घेतो

उन्हाळ्यातल्या सुट्टीतही अभ्यासाच्या घाणीला जुंपतो.॥५॥


म्हणुन  मुलांचे बालपण आपणच करतो बंदिस्त 

उन्हाळ्यातल्या सुट्टीचाही होतो अस्त

नका मुलांच्या डोक्यावर ताण देऊ जास्त 

त्यांचे बालपण नका करे असे उध्वस्त..!



मोहन सोमलकर 

मंगळवार, २४ मे, २०२२

ब्रदर्स डे व बहिण दिवसाच्या शुभेच्छा

 


आज
दिवस
खुप खास
प्रतिलिपीवर
भेटले किती बहिणीचे नाते
त्या नात्यांचे फिरेल आज जाते
आठवण त्या माझी काढणार नाही विसरणार
या दादाला, या ह्दय वाटणार्‍या मनमोहनाला त्या
आठवण मी स्वाती बोराडे अन तनया बोरसे ची करतो
ह्या पहिल्यावहिल्या प्रतिलिपीवरील बहिणी झाल्या सदा दादाचा त्यांनी मला दर्जा दिला,आजही आठवण करतात
मग आल्या त्रिवेणी संगम जीवनात माझ्या तिन नद्या जश्या
एक कल्पनाताई only idea,  एक माझी कोमुताई (नात्याचा कोमल स्पर्श) दुसरी अनुताई माझी (खुप समंजस हळवे मन)
तिन्ही मिळाल्या दादांची काळजी करणार्या..! तिन ह्या आहेत त्रिवेणी संगम.!
मग
मिळाल्या
मेघाताई,
मायेने दादा म्हणणार्या मुक्तछंदात लिहणार्या
वृषालीताई, राजश्रीताई, प्रियाताई , रुहीताई
ह्या गझलसम्राज्ञी बहिणी मिळाल्या.!
कांचनताई, अश्विनीताई, पुष्पाताई, सुप्रियाताई, कमलाताई हनवते,
अनघाताई व दिक्षाताईची आहे बातच खुप निराली
मनात माझ्या वात्सल्य स्नेहाचा पिंगा घाली
निवडक मोतीतुन दादाला प्रेम देणाऱ्या
माझ्या आपल्या बहिणी
तसेच
शेतात काम करणारी
राबराब राबणारी
घाम गाळून
भाकरी
मिळविणारी
अन्न धान्य पिकविणारी
जुही, चंपा,चमेली, मोगरा, गुलाब, केवडा फुलवीणार्या
माझ्या बहिणी
वर्षा जगताप व अनुताई

ज्ञानाताई, निशाताई, रजनीताई ठाकरे,मंजुषाताई अपराजित
मनिषाताई
सदैव दादाची काळजी घेतात.!
जिवलगातील
पुष्पाताई,  ज्योती पवार (,परी), रश्मीजी
यांना मी कसा विसरणार..!
शब्दलेखणीवरील मिताली मोरे,
तसेच सुरेखा सोनवणे, स्नेहा सोनवणे ताई ,सोनाली वडनेरे
यांना मी कसा विसणार

शाहिन शेख ताईलाही मी कसा विसरणार!
मस्त चारोळ्या मी तिच्या वाचणार.!

विशाखा जाधव ताई खुप छान लिहिते
कवितेतून ती छान व्यक्त होते.!

काव्यपुष्पातील
चैतालीताई, अश्विनीताई, रजनीभागवत,
सदा मला कवितेसाठी मार्गदर्शन करणारी
माझी पल्लवीताई चरपे
या सगळ्यांनी आणि बर्‍याच ताई लोक आहेत
ज्यांची नावे  मी विसरलो असेल
त्यांना आजच्या दिवशी
माझा प्रणाम

मोहन सोमलकर
😊😊😊😊😊😊😊
Happy brodher day


गुरुवार, १९ मे, २०२२

वेदना

 


My gallery 

एक दिवस असाही ( लेख)

आपले घर स्वतःचे झोपडी का असेना ,तो आपल्याला सदा राजवाड्यागतच वाटत असतो. त्या घरात थोडी सुखसोयीची कमतरताही असली तरी त्यात आपण रोज सहज तडजोड करित असतो. आणि तडजोड ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

शशांक एक मध्यमवर्गीय व्यक्ती होता. एक मुलगी, बायको आणि तो  ..! एवढेच त्याचे कुटुंब मर्यादित..! तसे त्याचे संयुक्त कुटुंब होते.
एका भावाकडे आईवडील राहायचे व बाकी भाऊ वेगवेगळे राहायचे. पण कार्यक्रम प्रसंगी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहायचे.

शशांक ऑफीस मधुन रोज आला की, आपल्याच दिवाणखान्यात फ्रेश होऊन येऊन बसायचा.आपल्या आवडत्या सोफ्याच्या खुर्चीवर.!
बायको रेवती मग थंडगार पाणी प्यालात घेऊन यायची,त्याने तो घसा ओला करुन सुटकेचा श्वास घ्यायचा.

त्यांची पत्नी आणि मुलगी जीव की प्राण होती. दोन पैकी एक घरी नसली की ,तो उदास व्हायचा...!

म्हणुनच रेवती कधीच शशांकला सोडून माहेरी गेली नाही...!

पण एकदिवस रेवतीच्या वडिलांना मायनर हार्ट अ‍ॅटॅक आला , हा ऑफिसात ,आणि रेवती बिचारी मुलीला घेऊन धावपळीत जी बस मिळेल त्या बसने माहेरी पोहचली..!

शशांक ऑफीसमधून सतत रेवतीसोबत फोन वर होता. पोहचली काय म्हणुन...!  बाबांची तबियत कशी आहे हे विचारासाठी..!

रेवती दोन तासांनी माहेरी पोहचली, बाबांना भेटली ,बिलगुन रडु लागली...! बाबा ठीक होते हसत होते मुलीला पाहुन...!

शशांक बिचारा रात्री ऑफीसमधून आला , फ्रेश झाला व एक ग्लास पिऊन  न जेवता झोपी गेला, कारण त्याला विचारपूस करायला त्याची पत्नी व मुलगी घरी  नव्हती...!

एक दिवस असाही..!

मोहन सोमलकर
नागपुर


मंगळवार, १७ मे, २०२२

झलक ......माधुरी दिक्षित या अभिनेत्रीची

 


चित्रपटसृष्टीत नव्याने पदार्पण करणारी ती चित्रतारका होती. तिचा पहिला चित्रपट होता" अबोध " तो तेवढा चालला नाही. पण त्या नंतरच्या चित्रपटात तिने घवघवीत यश संपादन केले.

अनिल कपुर व माधुरी दीक्षितची जोडी कितीतरी चित्रपटात कायम राहिली. अनिल कपुर व माधुरी दिक्षित स्टारर लिडींग रोल मध्ये खुप तो चित्रपट गाजला. तो चित्रपट होता " तेजाब" रातोरात ,"माधुरी " श्रीदेवीला मागे टाकुन स्टार झाली. तिची ती गाण्यातली स्टेजवर कंबर लटकवत आलेली....! झलक पाहण्यासाठी प्रत्येक शो ला लोकांची गर्दी उसळली होती.

तेजाब चित्रपटातील ते गाणे...... एक,दोन, तीन, चार पाच छे,  सात ,आठ ,नऊ, दस ,ग्यारह, बारा, तेरा ....! तेरा करो गिण गिन के एक बार....! डिंग डांग डिंग  डिंग डांग डिंग डिंग की राजा ....! या गाण्यावर लोक सिनेमागृहात अक्षरश: नोटांची बरसात पडद्यावर करित होते.

या गाण्यामुळे आणि तिच्या अदाकारीमुळे लोक माधुरी दिक्षित चे दिवाने झाले.

मग त्या चित्रपटानंतर तिने मागे वळुन पाहिले नाही. प्रत्येक हिरो सोबत तिला रोल मिळु लागले, तिचे मानधनही वाढले.

त्या काळातील अनिल कपुर,जॅकी श्रॉफ,  मिथुन चक्रवर्ती,  आमिर खान, सॅफी अली खान, सलमान खान,  गोविंदा, शाहरुख खान, संजय दत्त, ऋषीकपुर, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन अशा  अनेक सुपरस्टार्स सोबत तिने बरोबरीचे रोल केले. अनिल कपुर, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ ची जोडी तर कायम टिकुन राहिली.

अनिल कपूर  सोबत, तेजाब, रामलखन,  खेल, जिन्दगी एक जुआ,  इत्यादी अनेक चित्रपटात काम केले. तर जॅकी श्रॉफ सोबत खलनायक, रामलखन व बरचश्या चित्रपटात काम केले. सलमान खान सोबत हम आप के कोन, हम साथ साथ है अशा अनेक चित्रपटात काम केले. मृत्युदंड, संगीत, प्रतिज्ञा  सारख्या व चित्रकार मकबूल फिदा हुसेन ने माधुरी दीक्षित वर प्रभावित होऊन काढलेल्या " गजगामिनी" अशा प्रकारच्या स्त्री प्रधान चित्रपटात तिने ताकदीने आपल्या अदाकारीला लोहा मानुन प्रेक्षकांसमोर स्वतःला प्रस्तुत केले व अजुनही काही टि. व्ही शोज मध्ये जज च्या रुपात येऊन
वयाची पन्नासी गाठल्यावरही आमची माधुरीमॅम दिक्षित प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात आजन्म घर करुन आपली झलक कलाकारीची बसवुन आहे.

माधुरी दीक्षित मॅम चा चेहरा बघुन, तिचे ते लाजणे, हासणे बघुन तर चित्रपट समिक्षक व चित्रपट चाहते तिला दुसरी मधुबालाच म्हणायचे.

हुबेहुब ती मधुबालाच वाटायची. अश्या या सोज्वळ झलक दाखविणार्या महाराष्ट्रीयन अभिनेत्रीला माझा मानाचा मुजरा...!

मोहन सोमलकर




पाऊस

 

My gallery 
गहिवर फुटला मनाला

जसा तापला आहे उन्हाळा 

तीव्र तापलेल्या तेजासमान 

आग ओकतो आहे सुर्य 

किती राखावे मनोधैर्य 

झलक त्या पावसाचा पाहण्यात

आतुरलेले मन माझे ...!

पाण्याच्या सरीसाठी 

वेडाऊन आहे मन माझे..!



मोहन सोमलकर 




शुक्रवार, १३ मे, २०२२

बहिणी

 दोनच माझ्या बहिनी प्रतिलिपीवर 



दोनच माझ्या प्रतिलिपीवरील खर्या बहिणी

मी राहिल सदैव त्यांचा जीवनात ऋणी


झाला मुंबई गेट-टुगेदर कार्यक्रम

खुपच दोघींनी भरभरून माझे स्वागत केले

एक दिक्षा शिवकन्या, दुसरी अनघा मायेचा पाझर त्यांनी प्रेम दिले

आयुष्यात अनमोल मला क्षण दिले..!



दोनच आहे माझ्या बहिणी 

आठवण येते त्यांची अजुनी

मिच नाहीतर आठवण करते त्यांची वहिणी

मुंबईच्या या बहिणीचा आयुष्यभर राहिल मी ऋणी


शिवकन्या दिक्षा खरच ती झाॅसी ची राणी आहे

ठाण्याचा शिरेपेच मुकुटमणी तिचाच आहे

ती बहुमानास आहे पात्र सदा

तिच्या ठायी खुप प्रेम आहे


अनघाताई नुसती वात्सल्याची मुर्ती आहे

तिच्या मनी सगळ्यांसाठी प्रितीची माया आहे

जन्मोजन्मी अश्या बहिणी मिळाव्या 

हिच इच्छा देवाचरणी आहे..!


मुंबई गेट-टुगेदर चा डोंगर या दोघींनी सांभाळला

उर्मी डिसुजा ह्या मैत्रीणीने अनघाचा मान राखला

झिजुनी तिने ,साथ देऊनि तिने 

हा गेट-टुगेदर सफल बनविला...!



अशीच उर्मी, दिक्षाताई, अनघाताई, मानसीमॅम ची मैत्री राहो

दादाला प्रेम मिळत राहो



मोहन सोमलकर

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...