My gallery
एक दिवस असाही ( लेख)
आपले घर स्वतःचे झोपडी का असेना ,तो आपल्याला सदा राजवाड्यागतच वाटत असतो. त्या घरात थोडी सुखसोयीची कमतरताही असली तरी त्यात आपण रोज सहज तडजोड करित असतो. आणि तडजोड ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
शशांक एक मध्यमवर्गीय व्यक्ती होता. एक मुलगी, बायको आणि तो ..! एवढेच त्याचे कुटुंब मर्यादित..! तसे त्याचे संयुक्त कुटुंब होते.
एका भावाकडे आईवडील राहायचे व बाकी भाऊ वेगवेगळे राहायचे. पण कार्यक्रम प्रसंगी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहायचे.
शशांक ऑफीस मधुन रोज आला की, आपल्याच दिवाणखान्यात फ्रेश होऊन येऊन बसायचा.आपल्या आवडत्या सोफ्याच्या खुर्चीवर.!
बायको रेवती मग थंडगार पाणी प्यालात घेऊन यायची,त्याने तो घसा ओला करुन सुटकेचा श्वास घ्यायचा.
त्यांची पत्नी आणि मुलगी जीव की प्राण होती. दोन पैकी एक घरी नसली की ,तो उदास व्हायचा...!
म्हणुनच रेवती कधीच शशांकला सोडून माहेरी गेली नाही...!
पण एकदिवस रेवतीच्या वडिलांना मायनर हार्ट अॅटॅक आला , हा ऑफिसात ,आणि रेवती बिचारी मुलीला घेऊन धावपळीत जी बस मिळेल त्या बसने माहेरी पोहचली..!
शशांक ऑफीसमधून सतत रेवतीसोबत फोन वर होता. पोहचली काय म्हणुन...! बाबांची तबियत कशी आहे हे विचारासाठी..!
रेवती दोन तासांनी माहेरी पोहचली, बाबांना भेटली ,बिलगुन रडु लागली...! बाबा ठीक होते हसत होते मुलीला पाहुन...!
शशांक बिचारा रात्री ऑफीसमधून आला , फ्रेश झाला व एक ग्लास पिऊन न जेवता झोपी गेला, कारण त्याला विचारपूस करायला त्याची पत्नी व मुलगी घरी नव्हती...!
एक दिवस असाही..!
मोहन सोमलकर
नागपुर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.