चित्रपटसृष्टीत नव्याने पदार्पण करणारी ती चित्रतारका होती. तिचा पहिला चित्रपट होता" अबोध " तो तेवढा चालला नाही. पण त्या नंतरच्या चित्रपटात तिने घवघवीत यश संपादन केले.
अनिल कपुर व माधुरी दीक्षितची जोडी कितीतरी चित्रपटात कायम राहिली. अनिल कपुर व माधुरी दिक्षित स्टारर लिडींग रोल मध्ये खुप तो चित्रपट गाजला. तो चित्रपट होता " तेजाब" रातोरात ,"माधुरी " श्रीदेवीला मागे टाकुन स्टार झाली. तिची ती गाण्यातली स्टेजवर कंबर लटकवत आलेली....! झलक पाहण्यासाठी प्रत्येक शो ला लोकांची गर्दी उसळली होती.
तेजाब चित्रपटातील ते गाणे...... एक,दोन, तीन, चार पाच छे, सात ,आठ ,नऊ, दस ,ग्यारह, बारा, तेरा ....! तेरा करो गिण गिन के एक बार....! डिंग डांग डिंग डिंग डांग डिंग डिंग की राजा ....! या गाण्यावर लोक सिनेमागृहात अक्षरश: नोटांची बरसात पडद्यावर करित होते.
या गाण्यामुळे आणि तिच्या अदाकारीमुळे लोक माधुरी दिक्षित चे दिवाने झाले.
मग त्या चित्रपटानंतर तिने मागे वळुन पाहिले नाही. प्रत्येक हिरो सोबत तिला रोल मिळु लागले, तिचे मानधनही वाढले.
त्या काळातील अनिल कपुर,जॅकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती, आमिर खान, सॅफी अली खान, सलमान खान, गोविंदा, शाहरुख खान, संजय दत्त, ऋषीकपुर, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन अशा अनेक सुपरस्टार्स सोबत तिने बरोबरीचे रोल केले. अनिल कपुर, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ ची जोडी तर कायम टिकुन राहिली.
अनिल कपूर सोबत, तेजाब, रामलखन, खेल, जिन्दगी एक जुआ, इत्यादी अनेक चित्रपटात काम केले. तर जॅकी श्रॉफ सोबत खलनायक, रामलखन व बरचश्या चित्रपटात काम केले. सलमान खान सोबत हम आप के कोन, हम साथ साथ है अशा अनेक चित्रपटात काम केले. मृत्युदंड, संगीत, प्रतिज्ञा सारख्या व चित्रकार मकबूल फिदा हुसेन ने माधुरी दीक्षित वर प्रभावित होऊन काढलेल्या " गजगामिनी" अशा प्रकारच्या स्त्री प्रधान चित्रपटात तिने ताकदीने आपल्या अदाकारीला लोहा मानुन प्रेक्षकांसमोर स्वतःला प्रस्तुत केले व अजुनही काही टि. व्ही शोज मध्ये जज च्या रुपात येऊन
वयाची पन्नासी गाठल्यावरही आमची माधुरीमॅम दिक्षित प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात आजन्म घर करुन आपली झलक कलाकारीची बसवुन आहे.
माधुरी दीक्षित मॅम चा चेहरा बघुन, तिचे ते लाजणे, हासणे बघुन तर चित्रपट समिक्षक व चित्रपट चाहते तिला दुसरी मधुबालाच म्हणायचे.
हुबेहुब ती मधुबालाच वाटायची. अश्या या सोज्वळ झलक दाखविणार्या महाराष्ट्रीयन अभिनेत्रीला माझा मानाचा मुजरा...!
मोहन सोमलकर


खूप छान ...आठवण आली तेजाब मधल्या माधुरीची ...डोळ्यासमोर साकारली माधुरी सर...👌👍✍️✍️✍️🍫🍫🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम तुमच्या बहुमोल प्रोत्साहनात्मक समिक्षेबद्दल
हटवा