मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

अथांग सागराचा किनारा

 

From Gallery 

येते का त्या अंथाग सागराजवळ 

परवा एकटाच गेलो होतो 

खुप छान वाटे त्या जवळ येणाऱ्या लाटा 

बसुन त्या किनार्‍यावर रममान झालो होतो


मधेच तुझी आठवण झाली

तुझ्या त्या मिश्किल हसण्याची 

निवांत पणे सायंकाळी सुर्य मावळतीला 

दोघे आपण सोबत असण्याची


होता तो सागरी किनारा शांत 

कित्येक लोक एकांत घालवायला यायचे

जीवनाच्या कोलाहलापासुन दुर 

शांत हातात हात घेऊन खरा आनंद लुटायचे


आता सागराचे त्याच आपण

दोन  न मिळणारे किनारे आहोत...!

पण असेल वेळ थोडा तुला 

आणि वाटत असेल काही तर मी तिथे वाट पाहतो



मोहन सोमलकर 🙏🏼💐

धुंद तोच किनारा

My gallery 

 जिथे कित्येक क्षण घालवायचो

त्या रेतीवर ओल्या पावलांनी चालायचो !
पाण्यात त्या उबदार उभे राहुन
भास्कराची कोवळी तिरप अंगावर घ्यायचो.!



ये पुन्हा त्या किनार्‍यावर सखे.!

धुंद तोच किनारा आहे...!

तिथे तुझ्यानिमाझ्या विरलेल्या 

त्या आठवणी आहे...!


🧡❤❤🧡❤🧡❤🧡

चल हातात हात घेऊन फिरुन

पाण्यात पाय टाकुन बसु

डोक्यात नवे विचार येतिल 

गालात गाल टाकुन हसु...!

🧡❤🧡❤🧡❤🧡❤

मोहन सोमलकर 💓

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

 दिवाळी

महागाई दरवर्षीच जोर पकडत जाते

शेतात अन्नाचा दाणा पिकविणारा कर्जाच्या ओझ्याखाली दबत जाते


गरीब गरिबच होत आहे या देशात

रक्त शोषून घेत आहे भांडवलदार व शोषक समाजसेवकाच्या वेषात


कापुस, सोयाबीन, तुर,ज्वारी, बाजरीला कुठे शेतकऱ्यांला भाव मिळतो.!

बिचारा शेतकरी पाऊस, उन, थंडीत हाडाची काड करुन शेतात राबतो.!


शेतकरी आयुष्यभर राबतो, मात्र अडते ,ठोक व्यापारी त्याच्या भरोश्यावर पोळी आपली शेकतो व वरची मलाई खातो..!



तुरीला भाव येते 5800/- क्विंटल आणि त्याच तुरी पासुन तयार झालेली तुरीची दाळ घ्यावी लागते त्याला 12000 क्विंटल 


मग कशी होईल शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी

कशी साजरी होईल ,त्याच्या परीवाराची आनंदमयी दिवाळी.!


चला या वरषी लक्ष्मीमातेला शेतकर्यासाठी प्राथॅना करुया..!



मोहन सोमलकर🪔💥🪔💥🪔💥🪔🪔💥

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

Editor team

 


एडिटर टिम

तो एकला नाही जो मार्ग क्रमितो

समुह हा काव्यपुष्प सोबत चालतो

सतिश त्याचे नाव ,स्नेहाचा झरा, मुर्तिमंत छबी

मुर्तिमंत त्याची काया,अहोरात्र जागतो,एडिटींग करतो

गणेशवंदना करुनि आराधना बाप्पाची करतो

शब्द शब्द एकरुप करुनी माधुयॅ ती भगिनी संकलित कविता करते

कल्पवृक्ष आबारुपी छायेतून काव्यपुष्प घडतो

काव्यपुष्प दिवाळीअंक घडतो..!



Non another only for editor team

🤗🪔🚩👍🤝✍👏👏👏👐clap for teamwork

Mohan somalkar

परिवार काव्यपुष्पाचा




 my gallery 

 थोडा हळवा, थोडा गोडवा

थोडा राग माझ्या मनी भरला

शब्दात मी माझ्या मांडिला प्रेमाचा गाव

काव्यपुष्प हाच परिवार स्नेहाने इथे जगाव॥


रुळली इथे नाती प्रेमाची 

जीवास इथे मिळे मला समाधान 

शब्दात रुजवितो स्त्री शक्तीस मान

जर चुकलो कुठे तर पकडावे माझे कान


कवितेतून होतो मुक्त 

मी लेखणीचा भक्त 

शब्दात भाव मांडतो 

कधी करतो स्वतःला सक्त 


जननी जन्मभुमीला प्रणाम करतो

जिने दिला जन्म नाव तिचे रोशन करतो

उरी आशा बाळगून झेप आकाशी घेत

नाव मोहन मदनाच्या मुरलीतुनि सदा व्यक्त होतो.!


🪔🚩मोहन सोमलकर 🪔🚩



थोडा हळवा, थोडा गोडवा
थोडा राग माझ्या मनी भरला
शब्दात मी माझ्या मांडिला प्रेमाचा गाव
प्रतिलिपी हाच परिवार स्नेहाने इथे जगाव॥

रुळली इथे नाती प्रेमाची
जीवास इथे मिळे मला समाधान
शब्दात रुजवितो स्त्री शक्तीस मान
जर चुकलो कुठे तर पकडावे माझे कान

कवितेतून होतो मुक्त
मी लेखणीचा भक्त
शब्दात भाव मांडतो
कधी करतो स्वतःला सक्त

जननी जन्मभुमीला प्रणाम करतो
जिने दिला जन्म नाव तिचे रोशन करतो
उरी आशा बाळगून झेप आकाशी घेत
नाव मोहन मदनाच्या मुरलीतुनि सदा व्यक्त होतो.!

🪔🚩मोहन सोमलकर 🪔🚩



बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

कष्टकरी शेतकरी

 कष्टकरी शेतकरी



My gallery 

ओंजळीत तिच्या सुख थोडावेळचं राहतं

शेतात राबुनी तिचे फुलात आयुष्य बहरतं


घाम रोज गाळते, उन्हात झिझते

पाण्याचा घोट ना मिळे ती कासाविस होते


सुख आले थोडे की,ओंजळीतुन घसरते॥

पाऊस थैमान माजवि पिकाचे नुकसान होते


दरवर्षी देवासमोर नतमस्तक होई,साकडे घाली॥

अन्नधान्य पिकुदे, बाजरीची भाकर तुला जेवु घाली॥


देव सुखाची ओंजळ देतो,कष्ट करवितो॥

हातातुन सुख पाण्यासारखे पळवितो॥


🚩मोहन सोमलकर 🚩

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺



मोहन मुरलीवाला गोपाला

 गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला

प्यारे नंदलाला मोहन मुरलीवाला 


गोपाला गोपाला रे,मोहन मुरलीवाला 

वाजवी बासुरी संवगड्याचा करी मेळा 


दही,दुध,लाही,लिंबलोणी,साखरेचा 

करी सवंगड्याशी तो मेळा


गोपाला गोपाला रे मोहन मुरलीवाला ॥

मोहन मुरलीवाला गोपाला गोपाला॥


धावत येई सार्या गवळणी, धावत येई राधा॥

मोहन मुरली वाजवितो, वनी नाचतो मोर फुलवून पिसारा॥


गोपाला गोपाला रे, मोहन मुरलीवाला॥

🚩मोहन सोमलकर 🚩



My gallery 





सुखाचा आगर लेक माझी

 ते अनुभवा लागतं



लेक लाडली माझी लक्ष्मीची व सरस्वतीची पाऊल ॥

चेहर्‍यावर तिच्या हास्याची कळी, माझ्या सुखाची चाहुल ॥


काॅलेजचा तिचा आज पहिला दिवस ॥

रात्री बाराच्या ठोक्यापयॅत अभ्यासात खास


आज ५ला उठुन तयारी काॅलेजाची केली॥

धावपळ किती तिची, चिमणीचा घास मी भरवुन मला सुख देऊन गेली॥


आज तिचे पॅक्टिकल व फिजिकल ऐज्युकेशन आहे॥

गेली लगबगीने तयारी करुन बाप्पा तिच्या पाठीशी आहे॥


मायबापाचा लेक ऐकुलती एक माझी सुखाचा झरा॥

डोळी आनंद साचला, मनी सुखाचा फुटे पाझरा ॥

शिकुन सवरुन मोठी ती होईल ॥

नावलौकिक स्वतःचे आणि घराण्याचे करिल ॥


साईचा तिच्या डोईवर सदा हात राहिल ॥

तिचे सुख मी सदैव माझेच मानिल ॥


लेकलाडली पुण्याई माझी

माझा गवॅ, सवॅस्व माझे



💜मोहन सोमलकर 💜



मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

नागपूरची पताका साहित्य क्षेत्री झळकविली.!

 



My gallery 

💥🍫अभिनंदन रंजुजी उर्फ उर्मिलाजी परुळकर 💥🍫
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

आज साहित्यक्षेत्री या खुप गाजावाजा झाला
अभिनंदनाचा पाऊसच जणु पडला
३००० रचनेचा आकडा तुम्ही पार केला
दिवस आजचा तुमचाच घडला.!

जणु प्रतिलिपी नावाच्या हिमालयातुनी
शब्दगंगा मनामनात प्रवाहित तुम्ही केली
चारोळित भाव मनातले रोजच तुम्ही भरले
अंगणात विविध रंगाची ठिपक्याची रांगोळी भरावी तशी चारोळि तुम्ही केली.!

सदा काव्यात भावना उतरविल्या
काव्यसखी ची उपमा सुशोभित झाली
नागपूरच्या शिरपेचात काव्याचा मुकुटमणी घातला
अभिमानने नागपुरी छाती माझीही मग फुलली!

काव्यपुष्पावर तुम्ही देशविदेशातील व्हुवर, फाॅलोअर मिळविले
साहित्य पर्वणीत तुम्ही नाव रोशन केले
शायरीत गुलजारच्या शब्दाचा पाठलाग केला
आता दिवाळी अंकात शब्दाचे लक्ष्मीबाॅम्ब आणि सुतळी बाॅम्ब फोडावे, असे आकाशवाणीने जाहिर केले.!

अशीच प्रगती तुम्ही करावी
शब्दाची हिमवर्षा अंगणी तुमच्या व्हावी
आम्ही तुमचे प्रशंसक सारे
अमेरिकन डाॅलर व सिंगापूरी दिनार भेटल्यावर आम्हाला चंद्रावर पार्टी द्यावी.!

अभिनंदन रंजुजी अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी.!

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🥬🥬🥬🥬🧀🍟🍟🥞🥞🥚🍝🍜🍣🍤🍤🍢🍢🍢🍢🍢
मोहन सोमलकर
व परिवार
अभिनंदन
उत्सुक
🍓🍓🍓🍓🍓🍓
🍉🍉🍉🍉🍉🍉
🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇
🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓


माझीच तु जानशिन

 

Fm my gallery 

🌿🍁🌺🍁🌺🍁🌺🍁🌺🍁🍁🌿

रेशीमगाठ ब्रम्हदेवाने तुझीनिमाझी जोडली
त्याची महती कधी तुला न होती कळली !
वेडे 🌹तु नसेल प्रेम करत मनोभावे मज
पण मी मात्र तुझ्या ह्दयी आपली प्रित रिती केली!

💮💮💮♦️💮💮♦️💮💮💮💮♦️
तुला काय कळणार त्या मंगळसुत्राच्या मण्यांची संकल्पना
ते बंधन तु तर मोडुन दुर केले होते
गळ्याला त्रास होतो म्हणून काढले होते
हे करतांनी तुझ्या मनाला तरी पटले होते

काय ठेवले तु आपल्या शरिरावर
माझ्या नात्याचे प्रतिक म्हणुन
कसेतरी बोटाला घट्ट पकडुन जोडवे पायात होते.
तेही तु पायाची नस लागते म्हणुन काढुन टाकले
तरी तुला मी राणी माझ्या मनमंदिरी पुजले होते..!

🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀

विलग,अलग तुला मी कधीही आपल्यापासून
तुला प्रिये होऊ देणार नाही मी
तु माझे पहिलेच आणि शेवटले प्रेम आहेस
माझ्या मरणाआधी तुला मृत्युशय्येवर चढु देणार नाही.!

तु माझे शरीर मी तुझा आत्मा आहे.!
मी तुझी गाडी, तु माझे इंधन आहे.!
तु माझी गॅस मी तुझा सिलेंडर आहे.!
तु असशिल ताव्यावरली भाकर मी ठेचा आहे

🌺🥀🌺🥀🌺🥀🌺🥀🌺🌺🥀

तु कितीही दे वेदना,कितीही झगड
मी स्वतःला समजेल फुल तुला दगड
तुला समजेल देव, मला भक्त समजिल
तुझ्या बाहुत डोके ठेवून आलिंगन देईल

🪴🥀💖🌹💗🪴🥀💞🌹🪴🥀💞

      मोहन सोमलकर




सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

दलितांचे कैवारी


 महात्मा फुले राबले॥ खुप कष्ट सोसले॥

त्रासाला नाही भिले॥ कष्ट उपसले॥


दिवसरात्र जागले॥अन्यायाविरुद्ध लढले॥

पुढे सरसावले॥ दिनदलितांसाठी॥


गरिबांचे कैवारी झाले॥ पुण्य मिळाले॥

शिक्षित केले॥ बहुजनास॥


सावित्रीबाईने हाल सोसले॥दुःख भोगले॥

शिक्षित केले॥ दलितास॥


मोहन सोमलकर 



वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक आकलन

 







जगाच्या पाठीवर आपला भारत देश असा एकमेव देश आहे. ज्याला बहुमूल्य अशी संतांची पंरपंरा लाभली आहे. ज्यांनी आपल्या मार्गदर्शक तत्वावर व समाजसेवी नितीमुल्याच्या आधारे मरेपयॅत या समाजाचे उद्बोधन केले. 

व तळागाळातील दिन,दलित,व दुबळ्या लोकांना आधार देण्याचे काम केले. 


       संपुर्ण समाजाला समतेची व एकात्मतेची शिकवण दिली. अशाच संता पैकी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आज त्र्येपनांवी पुण्यतिथी.


       त्या निम्मित्याने हा लेख सादर करत आहो. 


विसाव्या आणि एकविसाव्या शतकाच्या सुवर्णमध्य ज्या ज्ञान सूर्याच्या तेजाने प्रखर होऊन भारतभूमीच्या मृतवत लोकांमध्ये चैतन्य व शक्तीचे, भक्तीच्या स्वरूपातून संजीवन पेरत आले, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मानवतेचे थोर उपासक आणि अध्यात्म क्षेत्रातील विज्ञानवादी क्रांतिकारी संत होते .मानवतेचा संबंध हा मानवाच्या जगण्याच्या मूलाधार आहे. असे राष्ट्रसंत जनतेला सांगायचे आपला परिचय करून देताना राष्ट्रसंतांनी "मानवताही है पंथ मेरा, इन्सानियत हे धर्म मेरा ".   


असाच करून दिला आहे. "इंसानही है देवता जो सत्य के पथ पर गया." असे ते "लहर की बरखा" या ग्रंथात लिहितात. मनुष्याला देवतांच्या उच्च अवस्थेला नेण्यासाठी मानवी मनाला सांगण्याचे काम तुकडोजी महाराजांनी केले. केवळ जण सुधारणेचा संदेश देऊन ते थांबले नाहीत. तर त्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ या अध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या आणि समाज जागृतीचे भान असलेल्या संत चारित्र्यशील राष्ट्रभक्त व मानवतेच्या सेवकांची रचनाबद्ध संघटना स्थापन केली.


"आधी केले मग सांगितले"


या न्यायाने त्यांची ग्रामगीता मानवी सुधार व मानवतेच्या मूल्यांवर आधारित आहे. मानवी वर्तनाचा पाया संस्काराने पक्का झाल्यास एक अहिंसक व मानवता प्रिय सदाचारी बुद्धिवंत माणूस किंवा सुजाण नागरिक घडवता येतो .यावर राष्ट्रसंतांचे समग्र तत्वज्ञान आधारभूत आहे आज देशाला सुजाण व विश्व मानवतेची समज असलेल्या मानवांची गरज आहे .असा न्यायक्षम सज्जन मानवांचा वर्ग म्हणजेच स्वर्ग आहे, यावर राष्ट्रसंतांचा विश्वास आहे हे सार्थ ठरवण्यासाठी त्यांनी सामुदायिक ध्यान व प्रार्थना या अत्यंत सोप्या व वैश्विक उपासना मार्गाची निर्मिती केली.

" है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गासम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो ".ही आर्जव त्यांनी जगदीश्वराला केवळ मानवतेच्या प्रेमातूनच केलेली आहे.


वंचित, दिन ,दुःखी ,कष्टी जीवांना होणारा त्रास राष्ट्रसंतांनी कधीही स्वीकारला नाही. देशाचे हे दुःख जणू त्यांच्या देहाला झालेली वेदना आहेत .असे मानूनच त्यांनी दिन, असाह्य जनतेच्या सेवेला प्रथम प्राधान्य दिले. दिन, दुःखीकष्टी ,पीडित व गरीब जीवांची सेवा हेच महापुण्य असल्याचे ते मानतात .म्हणूनच जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे  आणि ही मानवतेची उपासना व राष्ट्रसेवा आहे .अशी शिकवण राष्ट्रसंतांनी दिली राष्ट्रांच्या सेवेसाठी अखंड झटणारे तुकडोजी महाराज हे खरेखुरे राष्ट्रसंत आहे. परत बंधाऱ्यात अडकलेला देश स्वतंत्र करण्यासाठी आपले स्वागत साधुत्वाची साकोरी बाजूला सारून देशाचा संसार करायचे सामर्थ्य या परमार्थी अवलिया कडे होते .


म्हणूनच देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत या उपाधीने अलंकृत केले. केवळ आणि केवळ मानवता हीच तुकडोजी महाराजांची ओळख आहे. म्हणून त्यांचा महानिर्वाण क्षण व तो प्रयाण दिन सर्व संत स्मृती मानवता दिन .म्हणून पाळला जातो.


हे वर्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे 53 वे पुण्यतिथी वर्ष आहे. या कोरोना  च्या जागतिक संकट काळात आपली मानवतेची बांधिलकी कायम ठेवत अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ द्वारे रक्तदानाचे आवाहन केले आहे. मंडळाच्या देशभर असलेल्या 20000 शाखा या रक्तदान चळवळीत कार्यान्वित होत आहे 


वंदनीय राष्ट्रसंतांनाही मानवता प्रेमी जनतेची स्मृती श्रद्धांजली ठरणार आहे. या मानवतेच्या थोर उपासक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र प्रणाम करुन मी माझे दोन शब्द संपवतो .

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

धन्यवाद 

जय हिंद जय भारत..!


॥ खरा तो एकची आहे धर्म ॥

॥ करा दिनदुबळ्यांची सेवा त्यातच नरदेहाचे मर्म ॥



मोहन सोमलकर 🚩🚩🚩🚩


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩समाप्त🚩🚩🚩




रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

पुरुष दिन

my gallery 
 
जागतीक पुरुष दिन
अस्तित्व मी माझे आरश्यात पाहतो
जरी दु:ख ,वेदना,अडचणींचा डोंगर ठाकला
ना घाबरलो कधी वादळातुनी वाट काढुनी
सारी संकंटे छातीवरी झेलुनी उभा जन्म मी काढला..!
ह्दयी सोसले घाव,झळ त्याची स्वतः सोसली.!
चेहर्‍यावर सदैव स्मितहास्य करुनि
गर्दीत प्रेमाचा गंध दरवळत
ऐकोप्याने परिवारात सुखाची घडी आणली..!
तमा कधी दुखाची नाही बाळगली
जीवाच्या तुकड्यास सुखशांती देण्यास कित्येक रात्र जागुन काढली
आपल्याच लोकांच्या चेहर्‍यावर सुख पाहुन समाधानी झालो अंती.!
मी कष्टाचा जरी वाळवंट
इष्ट, आप्तेष्ट, कुटुंबासाठी दाटुन येईल कधिही कंठ
छातीवरी वार वेदनेचे झेलुनि
सवाॅसाठी उभा राही पुरुषरुपी हा महंत..!
होऊन गेले मर्यादा पुरुषोत्तम राम
विष्णुने नरदेही पॄथ्वीवरी घेतला होता अवतार..!
सार्या यातना भोगल्या त्या देवाने
गृहस्थाश्रमाचे पाळले होते नियम चार.!
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
🚩🤗🚩🤗🙏🚩🙏🚩🤗🙏🚩


शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

शेरोळी

 मागे मागे तुझ्या खुप धावलो

शेवटपर्यंत हातात आली नाही!
तुटी जो डोर किस्मत की मेरी
आसमान मे दुर पंतग कट कर गई मेरी!

मोहन सोमलकर
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩






भुतकाळ

 पहाट कोवळी दिसे॥ किरण सोनेरी हसे॥

अंगणी रांगोळी दिसे॥ मांगल्य सजे नित्य॥


रानोमाळी प्रभात सजे ॥ पक्ष्यांचा गोंगाट हसे

कोकीळेची धुन बरसे॥ कानी स्वर घुमे॥


हवेत सजेलता होती॥ निसर्गरम्यता होती॥

आहाराची चिंता नव्हती॥ गावरान मेवा मिळे


गेले ते दिवस सारे॥ सरले आसमानी तारे॥

संपले थंडीचे वारे॥ जीवनी या ..॥



मोहन सोमलकर 👍🚩



बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

भोळा भाव

 नवीन सुरुवात 


🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷🍀🌷🍀

देवा तुझ्या चरणी आलो। शिष माझे झुकले।

नातेगोते सारे विसरलो । प्राणास ते मुकले ।


आली होती महामारी । नाही अन्नाचा दाणा उरला घरी ।

आसवेच डोळ्यात साचले । मी माझे म्हटले ,जे पुढ्यात वाचले ।


तुच न्यायवंत, तुच माझा भगवंत । अजुन किती पाहशिल अंत ।

सांभाळ या लेकरास । नवी सुरुवात करील, पाठीशी रहा तु भगवंत ।


मोहन सोमलकर 🌷

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀



मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

कोजागीरी

 चंद्र 


चंद्र हासरा लाजरा

भोवताली त्याच्या चांदण्या पिंगाघाली

जणु  मुरलीधर मुरली वाजवी

गोपिका त्याच्या अवती-भवती साद घाली


अवतरले हे प्रेम सारे 

भावनांनी बहरते

रात्रीचा शेला पांघरुनी

जेव्हा चांदणी आकाशी नाचते....


हे नयनरम्य दृश्य मनी साठवा

प्रितीचा भोवरा फिरतो आकाशी

दुधाचा गोडवा मनी साठवा

नाते स्नेहाचे वृध्दींगत करा मनी


चौफेर आहे चांदणे बरसले

प्रीतीचे जणु उडती आकाशी पाखरे

शरदाचं टिपूर चांदणे आज पडेल

सुशोभित होईल ही धरतीआणि वनचरे..!



मोहन सोमलकर 🙏



सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

तोच चंद्रमा नभात...!

From my gallery 

 आता खिडकीतून नव्हे अंगणातून 

आभाळ पाहायची वेळ आली

संपला दसरा झाले चार दिवस 

बघा ना उद्या कोजागिरी आली.!


ती दुनिया आमची निराली होती

मनात भरपूर चांदणे होते

जरी झोळी आमची स्वप्नाची रिकामी होती 

नभात सांजेला नजर आशेची आरुढ होती 


जीवनात नवा जोश,अंगात तरुणाई होती 

डोंगरावर चढुन 

खाली उडी मारण्याची ताकत मनात होती.!


कोजागिरी यायची तेव्हा 

अख्खा वाडा आमचा आनंदाच्या वार्याने सजायचा! 

२५ रु.ची वगॅणी गोळा करुन 

रात्रभर कोजागिरीचा जल्लोष साजरा व्हायचा..!


मोकळ्या त्या अंगणात, आभाळी 

गुलाबी, गार हवेतल्या थंडीत 

गर्द गुलाबी रंगाचा शालु नेसुन 

ती थंडी अंगात संचारायची.!


मग रात्री १२वाजेपयॅत 

मोठ्या गंजात दुध आटवत 

मराठी,हिन्दी गाणे मनात साठवत 

आकाशी मोठ्या पांढराशुभ्र चंद्र यायचा बहरत.!


तेच खरे दिवस होते

खरा जीवनाचा आनंद द्यायचे 

घरच्या माता,भगिनी भुलाबाईचे गाणे म्हणायचे.!

खिरापती मध्ये चने,चिवडा, जिलेबी, रेवड्याच्या गोळ्या मिळायच्या! 



🌹मोहन सोमलकर 🌹



रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

मुस्कान

मुस्कान तेरे चेहरेकी 

और मुझमे जिने की राहत जगाती है..!

तुम किरण हो उजाले की

मुझे रोशनी देती है......!



मोहन सोमलकर! 

 प्रश्न माझ्या मनात खुप निर्माण झाले होते

प्रत्येक प्रश्नाला उत्तरे मिळत नव्हती 

एकाच उत्तराला जवळ घेत होतो

जन्म-मृत्यु च्या अंतरात जीवनरेखा अडकली होती.


मोहन सोमलकर 🌹

आजचा विचार

 जगात सुंदरता खुप आहे 

ती सुंदरता कशात आहे...!

 हे शोधता आले पाहिजे

ती पाहणार्‍याच्या डोळ्यात आहे.!

जीवनगौरव पुरस्कार येवला"चंद्रमास सर

 

From gallery 


प्रतिलिपी एक व्यासपीठ आहे, एक माध्यम आहे, एक कारखाना आहे,साहित्य व साहित्यिक तयार करणारं.

प्रतिलिपी एक दालन आहे नवलेखक, नवकवी, नवकथाकार, लघुनिबंध लेखक तयार करणारं..!

प्रतिलिपीवर अनेक जुने नवे प्रतिभावंत कवी,कवियत्री, लेखक लेखिका आहे. इथले वातावरण एका परिवारासारखे आहे.

रोजच विषय मिळाल्यावर चारशे ते पाचशे साहित्यिक रात्री बारा वाजेपर्यंत लिहितात, आपल्या साहित्याद्वारे दुसर्याचे मनोरंजन करतात.

इथे आपल्या लेखणी द्वारे अभिव्यक्त होऊन आपली अभिव्यक्ती प्रत्येक जण साकार करतात.

      रोजच नवनविन साहित्याची निर्मिती होते.

मी ही इथे ,या व्यासपीठावर दोन वषाॅपासुन लिखाण करित आहे. माझी " स्त्री ची यातना" ही कथा या प्रतिलिपीवर लाॅकडाऊन काळात लिहिली. तिला भरभरुन प्रतिसाद मिळाला. रोज अनेक कथा,कविता ,लेख लिहतच असतो, व मला प्रतिसाद पण मिळते.

आज मी टाॅपर लिस्ट पाहिली तर मला असे जाणवले की, आज प्रथम क्रमांकावर गुरुशिष्याची जोडी मला आढळून आली.

      आता तुम्हाला हा एकच प्रश्न पडला असेल की, गुरु कोण व शिष्य कोण....?

सांगतो, सांगतो ऐका....!!

मी दोन वषाॅपासुन इथे लिहित आहे. मला इथे कित्येक लहान मोठे साहित्यिक गुरुसमानच वाटले,खुप लोक आहेत . आता प्रत्येकाचे नाव घेणे मलातरी कठीण वाटते..!

पण एक व्यक्ती आहे,ज्यांचे नाव मी हक्काने गुरु म्हणुन घेऊ शकतो.

राजा धिराज, ज्ञानी,साहित्यिक, प्रत्येक कविता प्रकाराचे जाणकार श्री. चंद्रकांत येवला"चंद्रमास" सर हे खुप जणांचे प्रतिलिपीवरचे गुरु आहे.




चंद्रकांत सरांनी कविता कश्या लिहायच्या,चारोळी,गजल,गझल, हायकु,द्रोणकाव्य, कांव्याजली,शिरोमणी,प्रज्ञा भाव कविता,शैलकाव्य,स्फुट काव्य, दोनोळी, त्रिवेणी, सायली काव्य, पान काव्य, मोदककाव्य, शंकरपाळी काव्य, इ. कविता प्रकार कसे लिहायचे व त्याचे नियम काय हे समजुन सांगितले,

प्रत्येकांच्या रचना प्रकाराच्या चुका त्यांनी दुरूस्त केल्या. व कवितेबद्दल चे लिखाणाचे ज्ञान आपल्या जवळचे दिले.

ते सवॅ नवसाहित्यकांसाठी मागॅदशॅक,  प्रेरक, व गुरुतुल्य ठरले.

बघा आता गुरुशिष्याच्या जोड्या..!
प्रत्येक ठीकाणी येवला सर हे गुरु
गुरु::::::::::::शिष्य

येवला सर- मोहन सोमलकर
येवला सर- वंदनामॅम
येवला सर-  शाहिन ताई
येवला सर- रंजुजी परुळकर
येवला सर- नेहा- सना ताई

अजुनही प्रतिलिपीवर बरेच लोक असतील ज्यांना सरांनी लिखाणात मागॅदशॅन केले.

आज सर काव्यसंग्रह व जीवन या श्रेणीत प्रथम आले आहेत.

आणि त्यांचे शिष्य  अनुक्रमे

मोहन सोमलकर: अभंग प्रथम
वंदना सोरते मॅम:- गझल प्रथम
रंजुजी परुळकर:- सामाजिक,स्त्री विशेष  प्रथम
शाहिन ताई:-    संपुर्ण, चारोळित प्रथम
सना( नेहाताई):- शायरीत प्रथम

म्हणुन प्रतिलिपी दखल घेवो किंवा न घेवो, मी चंद्रकांत येवला"चंद्रमास " सरांना आज 

🌹🍁🍁🍁🍁🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹जीवनगौरव पुरस्कार 🍁🌹🍁🌹🍁🍁🍁🌹🍁🌹🍁🌹🌹🌹🌹🌹🍁🌹🍁🌹🌹
या पुरस्काराने सन्मानित करतो.

      सध्या कोरोनामुळे त्यांच्या पयॅत पोहचु शकत नाही. पण जेव्हा सरांची भेट होईल.

तेव्हा शाल, श्रीफळ,  एक डायरी, एक पार्क र पेन, व एक गुलदस्ता किंवा गुलाब फुलाने सरांना पुरस्कृत करण्यात येईल.

धन्यवाद
आपला
मोहन सोमलकर ( कवी लेखक)
😊🍁😊🌹🍁😊🌹🍁🙏🍫


शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

दसरा आलाय गणु वैतागला..!

 

From My gallery 

गणु आपल्या पत्नीला वैतागला😏😶😡 तो दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी ही स्तुतीसुमन कविता आठवुन आपले दु:ख हरतो..!😄😄😄


येतो जेव्हा सण दिवाळी दसरा!

आठवतो मज माझा सासरा!!


कशाला बांधली अशी  तुमची पोरगी माझ्या गळ्यात! 

जसे कोण्या वैर्याने मला जाणुन बुजून ढकलले आगीच्या जाळ्यात..!!


जेव्हा येतो हा गोड सण दसरा !

आनंद जिकडे तिकडे सोनं देऊन लुटत असतात! 

मला आठवणीत येतो फक्त माझा सासरा.!!


ती मुकी गाय तरी बिचारी चाटते प्रेमाने वासरा..!

पण मामाजी, तुमच्या मुलीचा मला नाही कवडीचा आसरा..!!


पापपुण्याच्या गोष्टी तुम्ही राहुच द्या! 

सगळेच तुम्ही आजच्या दिवशी विसरा..!!


आज आनंदाचा आहे सण दसरा!!

आपल्या मुलीला आताच तुमच्या सोबत घेऊन जा.!

माझा चेहरा राऊ द्या आजच्या दिवशी हासरा!!😆😆😅 


कोण्या कामाची नाही तुमची पोर!!

माझ्या आड पाॅकेटमधुनी काढे नोटा,ती आहे पक्की चोर..😊😃!!


या या लवकर आताच एखादा घेऊन दोर.!

घेऊन जा आपल्याघरी मनात माझ्या नाचे दुसरी आणण्यासाठी मोर..!!


😄😃😀😀😀😆😅😅😅🤣🤣

ही अवस्था गणुने दसऱ्याच्या दिवशी आपल्या सासर्याला बोलुन दाखविली!


🙏धन्यवाद 🙏

🤣😡🌷मोहन सोमलकर 🌷😡😶



दसरा सण...!

 संस्कृती आपल्या देशाची

आहे आपल्या मातीची 

वेगळीच असते छाप 

प्रत्येक येणाऱ्या सणाची !


भारत पवाॅत दसरा सणाचे 

आहे महत्त्व खुपच अनमोल 

या दिवशी प्रभु श्रीरामाने रावणासोबत युध्द करुन, विजयश्री खेचून आणली त्याचे हे मोल!


आजच्या दिवशी आंब्याच्या पानाचे तोरण

दाराला बांधल्या जाते..!

पवित्र मन,मांगल्याने शस्त्र, अस्त्र,नित्यपयोगी अवजारे धुवुन त्याचे पुजन केल्या जाते.!


संध्याकाळी मांगल्याची सांज 

येते किर्ती, समृध्दी,प्रगती घेऊन दारी.!

प्रत्येक देवस्थानात, मातेच्या चरणी, आपट्याची पाने चढवुनि 

विजयदिवस म्हणुनी विजयादशमी करतो सारे आपण साजरी.!


दसर्याच्या दिवशी शिर्डीस 

येतात भाविक दशॅनास 

दसरा आणि साईबाबांची नाळ जुडली आहे

बाबांचा सदैव जिथे असतो वास..!


दसरा सण आहे मोठा

प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचा नाही तोटा.

दिक्षाभुमीवर दसर्याच्या दिवशी बाबासाहेबांनी बौध्द बांधवांना धम्मप्रवॅतनाची दिक्षा दिली होती.!


दसरा हा दिवस असतो सोनेरी दिवस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रेशीमबाग नागपुर

इथे असते शस्त्र पुजन मोठे.!

भव्य प्रांगणात होई सायंकाळी 

रावण दहन फार मोठे..!




एकुण दसरा या दिवसाचे

लौकिक आहे खुप भारी 

याच दिवशी असत्यावर सत्याची विजय होऊन दिवाळी सणांची इथुनच केली होती तयारी....!




मोहन सोमलकर 💕🎋🌷🙏💥💦🌿

दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा सवाॅना..!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने .!

 धम्मचक्र प्रवतॅन दिनाच्या निमित्याने..!







महासुयॅ महामहिम डाॅ. बाबासाहेब म्हणजे भारत देशाला लाभलेला दुसरा जिता जागता महासुयॅ होता. या महासुयाॅची प्रखर किरणे भारतभूमीला प्रज्वलित करत गेली.


       त्यांच्या कायाॅची महती माझ्यासारखा सामान्य माणूस काय रेखाटणार. पण जिथून मी उभा राहिलो, बी.ए. प्रथम वषाॅत मी वक्तृत्व स्पधॅत जेव्हा भाग घेतला. संपुर्ण कॅरीडोर प्रेक्षकांनी भरला होता. पाय प्रेक्षकांसमोर उभे राहुन थरथरत होते. पण सुयाॅची सकाळची सकारात्मक किरण चेहर्‍यावर पडली आणि मी बाबासाहेबांवर बोलायला सुरुवात केली. विषय होता," सार्वत्रिक जीवनात शिक्षणाचे महत्त्व. "


       " सुयॅउदय झाल्यावर जे मजुर कामावर उपाश्यापोटी पोटाची खळगी भरण्यासाठी घरापासून दुर कामासाठी बायाभाभडे निघतात त्यांना आज शिक्षणाची गरज आहे."

       असे पहिले वाक्य उच्चारताच टाळ्यांचा गडगडाट झाला.आणि माझ्या वाणीत अचानक जोर आला. आत्मबल माझे वाढले , मी समोर बोलत गेलो आणि प्रथम क्रमांक घेऊन सवाॅनी माझी पाट थोपटली. ती माझी साहित्यातली पहिली achivement होती.

          मग मी पुढे-पुढे चालत गेलो मला प्रेरणा मिळत गेली. 

        बाबासाहेबांनी सवॅ समाजाला समता,बंधुत्व व प्रेमाची शिकवण दिली. शिका, संघटित व्हा, व संघषॅ करा हे त्यांचे मुल स्त्रोत होते. सगळ्यात जास्त विषयात पदवी घेणारे ते एकमेव भारतीय होते. 

      त्यांनी आपले संपुर्ण जीवन दिनदलित, पददलित, अशिक्षित लोकांना न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी अ‍पॅण केले.

      त्यांच्या कायाॅची महती फार मोठी आहे.

तो उजेडाचा दिवा, तो एक अन्यायाविरुद्ध लढणारा महासागर, महामानव होता.

     त्यांचे स्मरण फक्त १४ ऑक्टोबर ६ डिसेंबर आणि धम्मचक्र दिनाच्या दिवशीच न करता, त्यांच्या कायाॅची अखंडज्योत सदैव आपल्या जीवनात तेवत राहु द्या.


           बाबासाहेबांना दलित लोक देव का मानतात

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~



बाबासाहेब हे देशातील असे व्यक्ती होते ,ज्यांनी स्वतःच गरिबीत दिवस काढुन रस्त्यावरील विद्युत खांबांच्या उजेडात बसुन अभ्यास करुन उच्च शिक्षण घेतले.


    त्यांनी अथॅशास्त्र, राजशास्त्र,कायदा, गणित या सवॅ विषयात उच्चस्तरीय शिक्षण घेऊन देशासमोर एक मिसाल कायम केली.


ते एक अथॅशास्त्रज्ञ होते, त्यांना राजकारणाचे ज्ञान अवगत होते. ते गणितीय शास्त्र समजत होते.


त्यांनी जीवनात शिका, संघषॅ करा व संघटित व्हा. हे तीन मुलमंत्र पददलित समाजाला दिले. समता, बंधुत्व व अन्याविरुध्द लढा द्या. ही शिकवण बाबासाहेबांनी सवॅ गरीब बांधवांना दिली.


    पिढी दरपिढी देशातील खालच्या जातीवर होत असलेला अन्याय व अत्याचार ती भोळीभाभळी जनता अशिक्षित असल्यामुळेच होत आहे. या गरीबीच्या व अशिक्षिततेच्या चिखलात फसलेल्या दलित बंधुंना बाहेर काढल्याशिवाय यांचा विकास होणार याचा विचार त्या महामानवाने केला. 


त्या सवाॅना संघटित करुन त्यांना शिक्षणाचे , ज्ञानाचे, पुस्तकाचे जीवनात किती महत्व आहे हे पटवून दिले.


त्यांना अज्ञानाच्या दलदलीतुन बाहेर काढले ,म्हणुनच आजच्या घडीला............ कोणताही महार,मांग, आदीवासी, गोंड, धोबी, चांभार ,सुतार,शिल्पकार, गारुडी,मांग हे खालच्या जातीचे लोक खालच्या जातीचे नाहित ,उच्चशिक्षित आहे, उच्चपदावर आहे,सरकारी नौकरीत आहे, डाॅक्टर, वकिल, इंजिनिअर आहे. 


     हे फक्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे. जगातला डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पहिला भारतीय व्यक्ती आहे जो सवॅच विषयात उच्चशिक्षित आहे. 


     आज कोणताही दलित धम्मचक्र प्रवर्तन दिवशी ,६ डिसेंबर, १४ एप्रिल, १४ ऑक्टोबर वा दसऱ्याच्या दिवशी दिक्षाभुमीवर येवो.



माय gallery 


तो बाबासाहेबांची एक फोटो आणि कमीत कमी एक फोटो तरी सोबत नेल्याशिवाय राहत नाही. कारण या देवमाणूसाने बोट दाखवून शिक्षणाची नवी दिशा दलितांना दाखवून नवा मागॅ दाखविला.



म्हणुन या महामानवाला सवॅ दलित देव मानतात. अस्पृश्यतेचा ठप्पा दलितांवरचा काढून बाबासाहेबांनी राज्याची घटना समिती लिहली.




अशा या थोर महामानवाला माझा त्रिवार नमस्कार 🙏🙏🙏🙏




मोहन सोमलकर 🙏🙏🙏🙏🙏

शब्दातली कल्पनाताई

 


आपने ये हुनर सिखा कहासे
शब्द आते है उडके जहासे
शब्दसरिता हो आप
एक शायर हो शायरी का अंदाज हो..!
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
कल्पनाताई तुझे अभिनंदन
आज तु
चारोळी,प्रेम व स्त्री विशेष मध्ये प्रथम येऊन साबित केले की,जास्त लिहणे महत्वाचे नाही. चांगले लिहणे महत्वाचे आहे.

आपले खुप खुप अभिनंदन 💐🌷💐🌷💐🌷🌷🌷🌷🌷🌷🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🎈🎈🎈🎈🎈
🎈🍫मोहन सोमलकर 🍫🌷


मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

नारी का सदैव सन्मान करो.!

 

From gallery 


महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात आणि महाराष्ट्राबाहेर असलेल्या सवॅ देवी ,महादेवी ,सवॅ शक्तीपिठाला माझा नतमस्तक ,दंडवत, शिरसाष्टांग नमस्कार.🙏🌺🙏🌺🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

माहुरची रेणुकामाता,दुर हिमालयावर वसलेली वैष्णव माता, कोल्हापूरची महालक्ष्मीमाता,तुळजापुरची भवानीमाता,कोराडी नागपुरची महालक्ष्मीमाता अशा अगणित पुजनिय ,वंदनीय कुलस्वामीनी आपल्या प्रेरणास्थान व पुजनिय राहिल्या आहे. व राहिलही यात दुमत नाही. 


       पण वास्तविक जीवनात ज्यांनी समाजकारण करुन स्वतःचे आयुष्य समर्पित केले. अशा या थोर विभुती, स्त्रीशक्तीला माझे शतश नमन🌷🙏👍🌷💥


शिक्षणाची गंगा अख्या देशात वाहत ठेवणारी, माता सावित्रीबाई फुले,जिने अशिक्षित स्त्रीयांना,मुलींना व समाजाला आपल्या पुणॅ जीवनात शिक्षणाचा लढा देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. व ती आयुष्यभर अशिक्षितांसाठी लढा देत राहिली.



दुसरी स्त्रीशक्ती मदरटेरेसा


या शक्तीने गरीब,दलित,पिढीत,आजारी लोकांची सेवाकरुन आयुष्य आपले घालविले, भारतरत्न, पद्मभूषण, पदश्री, मॅगेसेसे अवाडॅ ने विभूषित ही नारी देशासाठी समर्पित झाली. आयुष्य आपले संपुर्ण देशासाठी बहाल केले.


तिसरी स्त्रीशक्ती 


विर लढी मदाॅनी वो तो झाॅसी वाली रानी थी, नुसते एकटीने सारी शक्ती आपल्यात एकवटुन स्वातंत्र्य लढ्यात उडी घेऊन वीर मराठा बाजीराव पेशव्यांच्या मदतीने मरेपयॅत इंग्रजांविरुध्द लढा देऊन, देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त केले. व मरेपर्यंत इंग्रजांच्या हाती आली नाही. 


चौथी रमाबाई आंबेडकर 


ह्या स्त्रीशक्तीने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावुन आयुष्यभर रात्र जागुन पददलित लोकांसाठी क्रांती घडवून आणली,


पाचवी स्त्री शक्ती अंतराळाविर शहिद डाॅ. कल्पना चावला


या तरुण अंतराळाविर लेकीने देशाचा तिरंगा अंतराळात आपले प्राण नौछावर करुन फडकविला. देश अशा नारी समोर सदैव नतमस्तक आहे.



अजुनही अणगिणत स्त्रीशक्तीने देशाची धुरा आपल्या खांद्यावर उचलेली आहे.


माॅ जिजाऊने महाराष्ट्राला राजा छत्रपती शिवाजी महाराज दिला. 


अहिल्याबाई होळकर बद्दल माझासारखा सामान्य व्यक्ती काय सांगणार. 


राणी झलकारीने इतिहास गाजविला आपल्या शौयाने,  


फातिमा शेख, इंदिरा गांधी, सरोजनी नायडू,डाॅ. आनंदीबाई जोशी, भिकाई कामा, अशा कित्येक विरांगना आहे, ज्यांची पाने लिहिता लिहता माझी लेखणी थकुन जाईल.



शाहु, फुले,टिळक, सावरकर,  गांधी,भोसले,भगतसिंग, राजगुरु,सोपानदेव,  शास्त्री, सरदार पटेल,आंबेडकर, तुकडोजी महाराज,  गाडगेबाबा, संत ज्ञानेश्वर, तुकोबा,एकनाथ, मुक्ताई,नामदेव महाराज यांच्या देशात 


नारीची विटंबना, नारीवर बलात्कार, नारीचा अपमान होते. आणि आपण दिलखुलास नवरात्र पुजन करतो.


नवरात्र मनात उजागर करा, मनात जगा, नारीचा सन्मान करा, ती घरची असो वा दारची तिला आदराने वागवा 


आदराने वागणुक द्या. तिच्या चांगले साहित्य लिहा. तिला काव्यात, साहित्यात रेखाटा.!




मेरी अस्तित्व की लढाई नारी तेरा सन्मान है..

मै तेरेही कोख से जन्मा एक बालक, 

तु माता,बहन, पुत्री का मेरे लिए एक वरदान है..!


💥🌷💥🌷💥🌷💥👍💥🌷💥🌷

स्त्रीत्वाचा विजय असो..!


मोहन सोमलकर 🙏🌷🌷💥

लेखक:-हर नारी का सन्मान चाहता है🙏👍👍👍🙏👍🙏👍😊🌹



सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

 


पंढरपूर माझी शब्दलेखणी



इथे लाभले संत- महंत शब्दाचिये

शब्दलेखणी जणू वाटे मज पंढरपूर ॥

एक एक शब्द स्नेहाचे गुंतते इथेच 

काय वर्णावी थोरवी शब्दाचा येई पुर॥


मोहन सोमलकर 🌹🙏😊

या चंद्रपुरात गोंडराजाकालीन देवीचे दर्शन करावया.!

 🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩



           🌻 *आनंदी पहाट* 🌻


    *चंद्रपूरच्या महाकाली मंदिरातून*


             *आजचा रंग..पांढरा*

      *आजची नवदुर्गा..स्कंदमाता*


🌹⚜🌸🔆🙏🔆🌸⚜🌹


        *षष्टीच्या दिवशी भक्तां आनंद वर्तला हो*

        *घेउनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो*

        *मनात नित्य नूतन रंग फुलविणाऱ्या नवरात्रातील भक्तांना आनंद देणारा आजचा दिवस. ऋषी.. मुनी.. तपस्वींचा वारसा सांगणाऱ्या भारतात दैवतांमुळे हा देश एकसुत्रात बांधला गेलाय.*

        *प्राताप्रांतात परस्परांविषयी  प्रेम.. बंधुभाव.. आपुलकी, एकात्मता निर्माण झालीय. मग जम्मुकाश्मिरची वैष्णवदेवी असो वा कन्याकुमारी वा मदुराई, सगळे प्रांत भाषेचाही अडसर न येता या दैवतांमुळे हृदयाने जोडला गेलाय.*

        *महाराष्ट्रातही अनेक प्रांतातून भक्त देवीच्या दर्शनास आंबेजोगाई, माहूर.. वणी.. तुळजापूरला.. चंद्रपूरला येतात. चंद्रपूरच्या महाकाली मातेच्या दर्शनाला परराज्यातून येणाऱ्या भक्तांची संख्या तर सर्वाधिक आहे. त्यामध्ये आदिवासींची संख्या तर फारच मोठी असते.*

        *मानवी जीवनात शुभप्रसंगी जी रंगत सनई चौघड्याच्या सुरांनी येते तेवढीच रंगत येते ती संबळ आणि तुणतुण्याच्या सुरांनीही. त्याशिवाय मंगलकार्य संपन्नच होत नाही. ईश्वरकृपेने शुभकार्य निर्विघ्न संपन्न झाले की, कुलदेवतेविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. देवाची आभाळमाया पुढेही आनंदी जीवन वाटचालीसाठी रहावी म्हणून 'जागर गोंधळ' घालतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने तुळजाभवानीचे, रेणूका आईचे आणि खंडेरायाचे मोठ्या प्रमाणात 'गोंधळी' आहेत.*

        *'गोंधळ' हा भारतीय समाज जीवनाचा अविभाज्य घटक आहे. लोकसंगीताची ही मोठी देणगी. हवेहवेसे वाटणारे हे संबळ.. तुणतुणे यांचे सूर, पारंपारिक वेषातील.. खड्या आवाजातील त्या कवड्याच्या माळाधारींचा 'गोंधळ' हा आमचा सांस्कृतिक ठेवा.*

        *मशालीची जळती पोत समोर ठेवून किंवा दिवटी ठेवत गोंधळ घालतात. नवरात्रात देवीच्या उपासनेनंतर या उर्जा देणारे शुभंकर पारंपरिक गोंधळ ऐकणे सुखावणारे. सर्वच देवतांना त्यासाठी घरी येण्याचे आवाहन केले जाते.*


       *‼या देवी सर्वभूतेषु भ्रांन्तिरूपेण संस्थिता‼*

       *‼नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः‼*


        *जी देवी सर्व भूतमातांमध्ये भ्रांन्तिरुपात (आवरणशक्ति) आहे, त्या देवीला मी त्रिवार नमस्कार करतो. 🙏*


🔱🌸🔆🛕🌺🛕🔆🌸🔱


  *_उधे ग अंबे उधे_*

  *_उधे ग अंबे उधे_*


  *_होऊ दे सर्व दिशी मंगळ_*

  *_चढवितो रात्रंदिन संबळ_*

  *_उधे उधे उधे उधे उधे उधे उधे_*


  *_फुलवितो दिवटी दीपकळी_*

  *_आम्ही अंबेचे गोंधळी !_*

  *_आम्ही अंबेचे गोंधळी !_*

  *_उधे ग अंबे उधे !_*

  *_उधे ग अंबे उधे !_*


  *_घरोघरी हिंडतो न्‌ गोंधळ आईचा मांडतो_*

  *_आईचा मांडतो न्‌ गोंधळ देवीचा मांडतो_*

  *_भवानी,भवानी, भवानी_* 

  *_बसली ओठी गळी_*

  *_आम्ही अंबेचे गोंधळी !अंबेचे गोंधळी ! आम्ही अंबेचे गोंधळी !_*

  *_उधे ग अंबे उधे !_*

  *_उधे ग अंबे उधे !_*


  *_सान थोर नेणतो न्‌ आम्ही दैवाशी जाणतो_*

  *_दैवाशी जाणतो आम्ही दैवाशी जाणतो_*

  *_घावली, घावली, घावली मूळमायेची मुळी_*

  *_आम्ही अंबेचे गोंधळी, अंबेचे गोंधळी न आम्ही अंबेचे गोंधळी_*

  *_उधे ग अंबे उधे !_*

  *_उधे ग अंबे उधे !_*


  *_बोला अंबाबाईचा .. उधो !_*

  *_रेणुकादेवीचा .. उधो !_*

  *_एकवीरा आईचा .. उधो !_*

  *_या आदिमायेचा .... उधो !_*

  *_जगदंबेचा .... उधो !_*

  *_महालक्ष्मीचा .... उधो !_*

  *_सप्तशृंगीचा .... उधो !_*

  *_काळुबाईचा .... उधो !_*

  *_तुळजाभवानी आईचा .... उधो !_*


🌺🛕🌸🔱🌻🔱🌸🛕🌺


  *गीत : शाहीर साबळे*              ✍


  *संगीत : अजय-अतूल*            🎹


  *स्वर : अजय गोगावले*            🎤


  *🎼🎶🎼🎶🎼*              🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*


                *११.१०.२०२१*


🌻🛕🔆🌸🌻🌸🔆🛕🌻

   🌷💐🌷  मोहन सोमलकर 💐🌷💐



शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

वेदना

 असो वेदना

नाही हो भय त्याचे 

सहतो मना...!


हात जोडतो

मी माता भवानीला 

तिला नमितो.....!


आशिष लाभे 

महादेविचे मला 

मनी ती शोभे....!


वंदन करी

रोजच मी मातेला

फुंकर मारी...!



मोहन सोमलकर 🍁🙏💥


॥एक संत.. संत जनाबाई ॥

 


Gallery 
जात्यावर दळते ज्वारी,बाजरी ॥

रोजच करुया दसरा,दिवाळी साजरी॥

आनंद मुखी ठेऊ सदा, दु:ख विसरू॥

असे फाटके वस्त्र, शिवुन नेटके ग भरजरी॥



मोहन सोमलकर 



शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

याद तेरी अचानक आई...!

 

Gallery 

🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡

दिलमे आरजु थी, उमंग भी थी....

तु मिलती रहे मुझे ना सही तो ना सही...!


बस एक बार हाल मेरा पुछ लिया करो....!


तुझसे खुब लगाव नही है मगर ,कभी कबार 


तेरी याद जरुर आती है .......!


जिन्दा हु तब तलक, मुझे मेरी सासो मे बसी है........!


ये याद तो दे....... दिया करो.....!




मोहन सोमलकर 🧡😊🧡🧡🧡🧡🎈



श्रध्दा-अंधश्रध्दा दोन बाजु नाण्याच्या.!

ऊ नमो वासुदेवाय नम:


साधारणत: आजपासून २० वषाॅपुरवी ,आणि त्याही आधी समाज एवढा अशिक्षित नव्हता. जेवढा स्वातंत्रपुवॅ काळात होता . पण समाजात असणार्‍या शैक्षणिक वातावरणाची तेवढाच प्रभाव समाजातील अशिक्षित लोकांवर नव्हता. 
    समाजातील अशिक्षित लोक त्यांच्या जीवनात जर काही अघटित घडले ,उदा. मुलांच्या तबियती बिघडणे,घरातील वातावरण सुखासमाधानाचे नसणे, जीवनात समृध्दी नसणे. तेव्हा बुवाबाजीकडे जाऊन आपल्या शंकेचे समाधान शोधत होते.
हे अशिक्षित लोकांचे झाले.

दुसरी बाजु शिक्षीत लोकांची

शिक्षित लोक श्रध्दा अंधश्रध्देचा भेद जाणुन असले तरी, त्यांच्या जीवनात जर अघटित असे बिकट संकंट आले असेल ,उदा. घरात कुणाचे आरोग्य बिघडले असेल आणि डाॅक्टर, वैद्याकडून आराम मिळत नसेल तर कुण्याच्या सांगण्यावरून बुवाबाजी कडे वळत होते. ते फक्त आपल्या घरातील जीवनाबद्दल असलेल्यां प्रेमाखातर..!


इथे मी थोडा थांबुन श्रध्दा-अंधश्रध्दा यातील भेद सांगतो.

श्रध्दा:- श्रध्दा म्हणजे एखाद्या व्यक्तीवर अथवा आपल्या कुलदेवतावर व कोणत्याही देवावर असलेली मनातील मनोभावे पुजावी अशीच भक्तीभावाची श्रध्दा,भावना,आदर ,एकाग्रता,साधना,तपश्चर्या होय.

अंधश्रध्दा:- अंधश्रद्धा म्हणजे शब्दातच अर्थ आहे, जादुटोणा,गंडादोरा,काळीजादु,बुवावाजी,बली यावर फुकटच काही मिळत नसणे व आपले नुकसानच होईल हे माहित असुनही बरेचसे लोक अंधश्रद्धेच्या जाळ्यात पडतात. अशिक्षित तर सोडा पण आजकालचे डाॅक्टर, वकिल पडतात . त्याला अंधश्रद्धा म्हटल्या जाते. 



ह्या दोन्ही बाजु मी प्रगट केल्या .

आता देवाबद्दल ची श्रध्दा सांगतो.


देव ,देवी,ईश्वर,अल्ला,येशु,गुरुनानक हे एकच आहे

अस्तित्व देवाचे
===========

देव निराकार,निरंतर,निर्विकार, सर्वव्यापी,अदृश्य शक्ती आहे. तो या निसर्गात, पानाफुलात,फळात,हवेत, पंचमहाभुतात आहे. त्याचे अस्तित्व या सृष्टीत सवॅत्र आहे .

देवावर आपली श्रध्दा असणे आवश्‍यक आहे,तो नजरेने दिसत नसला तरी रोज चोविस तासात एकदा तरी दाखला देतो आपल्या सोबत असल्याचा.

जीवनात परमेश्वराचे महत्व व अस्तित्व खुप मोठे आहे. 

जसे झाडावर आपोआप कळी येणे,फुल बनणे, फळ येणे, आईच्या उदरात नऊ महिने मासाचा गोळा राहुन त्याचे रुपांतर जीवात ,मनुष्यात होणे, नारळात पाणी आपोआप येणे. 


नशीबात व कर्मात असेल तर फार मोठ्या अपघातात देवामुळेच वाचणे, हे देव अस्तित्वात असण्याचे परिमान आहे. 

आकाश, पॄथ्वी,  वायु, अग्नी व जल हे पंचतत्व सुध्दा मानवजातीला देवस्वरुपी आहे. या पंचतत्वामुळे मानवजतीचे अस्तित्व आहे.
 
म्हणुन देवावर फक्त श्रध्दा,विश्वास, प्रेम ठेवा ,मनोभावे त्याला मनात पुजा !

आकाश,पृथ्वी,अग्नी,वायु,आणि जल हे सुध्दा मानवजातीने देवाच्या ठिकाणीच मानले पाहीजे. यामुळेच मानवजातीचे व सृष्टीचे अस्तित्व

शेवटी आपली हिन्दु संस्कृती विज्ञानाने कारणाने बनलेली आहे.  

आपल्या पूर्वजांनी खुप आधी आध्यात्माद्वारे खुप मोठे मोठे शोध लावले. नंतर मग इंग्रजांनी त्याचे पुरावे दिले.

आपला भारत विविधतेने नटलेला आहे. त्याची जगात मोठी ख्याती आहे.


काल माझी कुणाची मने दुखविण्याचा काहीच उद्देश नव्हता. मी फक्त मत मांडले होते.

मी देवावर विश्वास ठेवणारा आहो, देवपुजक आहो, पुजा केल्याशिवाय बाहेर निघत नाही.

कारण माझ्या बाबांनी मला ती संस्कृती दिली.

आणि या परमेश्वराच्या अस्तित्वामुळेच मी, माझे आईबाबा व माझे बाकी कुटुंब एका फार मोठ्या अपघातातुन मागच्या वर्षीच सुखरुप वाचलो.


टिप:-हा लेख मी एक तास खचॅ करुन लिहिला आहे, निदान पाचसहा लोकांनी तरी वाचुन प्रतिक्रिया द्यावी.

लेख लिहितांनी मी कोणत्याही साहित्याचा आधार घेतला नाही वा काॅपी पेस्ट केले नाही.


मोहन सोमलकर 🌿🍁🙏😊

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

जय भवानी माता !

 आई अंबाबाई तुला त्रिवार नमन 

टेकतो माथा तव चरणी द्रवते माझे मन! 


झाली जरी माझी दिशाभूल 

माफ करशिल समजुन घे तुझे मुल! 

  
From Gallery 

लाविन मी मस्तकी तुझ्या चरणाची धुल !

तुझ्या आशिर्वादाने पेटते आम्हाघरची चुल.!


आशिष सदैव राहु दे तुझे शिष माझे तुझ्यापुढे झुकू दे...!

वाट तुझ्या भक्तीची माझ्या मनातुनी तुझ्या

गजरापयॅत, तुझ्या शक्तीपिठापयॅत चालु दे.!



मोहन सोमलकर 

नमितो माते तुला🙏🙏

👍👍👍👍👍🙏🌺🍁🎋🌿🤬

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

दत्ताभाऊ सर

 आलात समुहात आपण 

आनंद खुप झाला

हर्षाचा जणु तुषारच

हवेत उडाला ।

मोहन सोमलकर 

वादळ

 

Gallery

वादळ म्हणा, तुफान म्हणा

वा म्हणा वायटुळ। 

आले होते कवितेचे, या एक दोन वषाॅत खुपच। 

आसवांचे, आनंदाचे,बहरण्याचे ते दिवसच होते।

ते क्षणच होते।

पण ते वादळ, ते तुफान क्षमविले ते या 

साहित्यिकांनीच। 

या प्रतिभावंतानीच ।।।।

या वादळा मुळेच कोणी परका एकटा 

राहिला नाही।   



मोहन सोमलकर 🌿🍁🙏🎋

नशिब

 ताई तु घाबरु नकोस 

तुझे नशिब खुप बलवत्तर आहे ।

हिम्मत तर हारुच नकोस 

तुझ्या शब्दातच ग अत्तर आहे ।


मोहन सोमलकर 🌿👍☕🍁

शाप(चारोळी)

 शापच आहे मला

रस्ता अडकण्याचा 

चालता चालता

मधेच खाली पडण्याचा!




मोहन सोमलकर 🌹🙏🏼😂



मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

अकारण दुःख ओढवु नका..!(अभंग)

 

Gallery 


संसार करा नेटका॥ जरी असे फाटका॥

नका मारु झटका॥ सहनशिलतेची तुरपायी करा॥


क्रोध नका ठेवू अकारण ॥ शांततेला जा शरण॥

ओढवु नका मरण॥ सुखी जीवनी॥


भोग ते भोगावे॥ आवडीने आयुष्य जगावे॥

जीवन सुखदुःखाचे थवे॥ गुण्यागोविंदाने राहावे॥


नको संपत्ती खुप ॥ नको पुरुणपोळी तुप॥

चटणीभाकरीचे स्वरुप॥ जीवनी आनंद देई


जप हरिनाम माणसा॥ घे जीवनाचा कानोसा

डोळे बंद कर दिवसा॥ आकलन जीवनाचे कर॥


मोहन सोमलकर 🙏😆😊



सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

भय

 भय असते या जगात वावरतांना 

प्रत्येकालाच, नाते मनातील विस्कटण्याचे


भय असते नात्यात दुरावा निर्माण होण्याचे...!


भय असते  संबंध तुटण्याचे.........!

 

हे जीवन कटावे, सुंदर बहरावे, आनंदात सारे राहावे 



मोहन सोमलकर 


सदैव वाटे मनी ,जपुन रहावा कल्पवृक्ष मनात.!



शब्दांची लाट

 किती शब्दरुपी सागर मी 

डोळ्यात सामावून घेतले

त्या लाटा आता आगेकुच करी 

निद्रेतही मी कवितेचे स्वप्न पाहिले


आयुष्यात प्रथमच मला

मिळाला हा शब्दकिनारा

मी एकांतात बसलो ,हसलो

मला भेटला शांत निवारा.!


नभात जश्या लकाकणार्या 

चांदण्या चंद्राच्या अवतीभवती दिसे

हे नयनरम्य दृश्य मनाला 

सुखवून अंगणी खेळतांनी भासे.!

साहित्यातील एक सोनेरी पान द.मा.


 मराठी साहित्यातील द.मा. मिरासदार हे सोनेरी पान होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. दमा हे मराठी साहित्यातील सोनेरी पान होते. कथाकथनात खुप मोठे मिरासदारी चालायची. 



        दमांनी साहित्य वर्तुळात विनोदी ढंगाची साहित्य निर्मिती केली.  त्यांची गाजलेली कथा* भुतांचा जन्म * ही कथा द.मा.चा मराठी साहित्य वर्तुळात ठसा उमटवून गेली. 


        अनेक त्यांच्या कथेवर नाटक रचण्यात आली. " चकाट्या" ही कथा त्यांची प्रसिद्ध आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्ष पद भूषविले होते.

    आपल्या विनोदी लेखन आणि ओघवत्या शैलीने मराठी साहित्य विश्वात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे साहित्यिक द.मा. मिरासदार यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रातील फार मोठी हानी झाली आहे. ग्रामीण जीवनातील विसंगती,इरसालपणाचे दर्शन घडवून तो कथानकाच्या माध्यमातून त्यांनी सातासमुद्रापार पोहोचविला.


पत्रकारिता,शिक्षण क्षेत्र( शिक्षक) व त्यानंतर व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील यांच्या बरोबरीने कथानकाच्या माध्यमातून मराठी साहित्याला त्यांनी नविन दालन मिऴवुन दिले. ग्रामीण जीवनातील पार आणि कट्यावरचा विनोदी खजिना रसिकांसमोर द.मा.  नी उलगडला.

    सूक्ष्म समाजजाण ,खुमासदार वणॅन, श्रध्दा-अंधश्रध्देतून तयार होणारा विनोद त्यांनी नाट्यमय प्रसंगातून मांडला.

     ते पुण्याला राहत असायचे. तशी पुणेनगरी पुण्यनगरी आहे. मराठी साहित्यातील मोठे मोठे साहित्यिक भारताला पुण्यानेच दिले, ना.सी फडके, आचार्य अत्रे,पुल हे पुण्याचेच.!


       वयाच्या ९४ व्या वर्षी दमानी श्वास सोडला. मराठी साहित्याला पोरके करुन, मराठी साहित्य क्षेत्रातील मिरासदारी आता संपली..!


दमांना प्रतिलिपीकडुन भावपूर्ण श्रध्दांजली.!

🌿🍁🌿🍁🙏🍁🌿🍁🌿🍁🌿🍁

       मोहन सोमलकर 🌿🍁



रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

काव्यपुष्पाचे शतक

 या नभी एकच आवाज 

बुलंद होत राहील 

शब्दांचा थवा नभी 

सदैव उडत राहिल.!


गुंफावे काव्यपुष्प 

जुळावे साहित्यप्रेमी 

एकच ध्यास होता 

आबांच्या मनी नेहमी! 

From Blog 


आज स्वप्न ते साकार झाले 

प्रत्येक कवींचे काव्यपुष्पात 

या ब्लाॅग  तयार झाले...!

सगळेच रमले कविता विश्वात.!


आज आनंद द्विगुणित झाला माझा

मी काव्यपुष्पावर आबांच्या आशिर्वादाने 

व सवाॅच्या सहकार्यातून माझे 

कवितेचे शतक आज पुणॅ झाले...!



मोहन सोमलकर 🙏🍁


ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...