जागतिक मराठी भाषा गौरव दिन
माझ्या मराठीचिया आहे जगी मान मोठा
धन्य धन्य शिवराय ,धन्य झाला जो इथे जन्मला..!
मुहूर्तमेढ मराठीचिया रचलीया संत ज्ञानेयाने ..!
तुका झालेसे कळस, निवृती,सोपान,नामदेव,मुक्ताईने दारी लाविली मराठीची तुळस...!
बिजे माझ्या मराठीची रोवली अनेक संतानी॥
पाणी घालुनि अमृतसिंचन केले महंतांनी॥
माझ्या मराठीचिया लई बाणा मोठा॥
भाषा माझी मधुर गोड इतुकी संवादाचा नाही इथे तोटा॥
वेल आकाशी दुर बहिणाबाई,केशवसुत,कुसुमाग्रज,पुलंनी नेला.!
श्वास मराठीत मोठ्या मोठ्यानी घेऊन, शेवटी देहही इथे अर्पिला.!
मराठिचियी थोर साहित्यिकांनी उंचाविली मान ,आणि शान ॥
नसानसात मराठीचा सुगंध भिनविला मराठीचे पिकविले रान॥
अभंग,गीत,भारुड,पोवाडे,कवन,गवळण,गझल ,गाऊनी मराठीचे
उंचाविले स्थान ॥
जे जे झटले मराठी भाषेसाठी,जगले जागले ,त्यांची करा आठवण
मराठीचा रोवला अटकेपार झेंडा,या महान विभुतीची ठेवा जाणं..॥
जसा कळी आणि फुलात सुगंध आपोआप येतो...!
जसा चंदनाचा सुहास मनामनात भिणतो.....!
जसा कस्तुरीसुगंध श्वासात मिसळतो...!
माझी मराठी झाली मोठी स्वर तिचा जगी घुमतो.!
आता नवयुवक, नवयुवती,साहित्यिक, प्रतिभावंत
धुरा तुम्ही मराठीची रे घ्या सांभाळून पुढे..!
पोथी, ग्रंथ, वेद,उपनिषदे , गीता,रामायण, बायबल,कुराणाचे करा जतन॥
मराठीत बोला बोली मराठी, गीत गा, शाळेत मुलांना शिकवा मराठीत!
मराठी आपुली न्या पुढे पुढे....!
मराठीचे स्वर,व्यंजन, उपमा,अल॔कार,लय जतन करावे.!
धन्य धन्य माय मराठी, मुळ मराठी कुळ मराठी....!
मोहन सोमलकर
©️®️
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✍✍✍✍✍✍