मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

कल्पनाताई चे कल्पनाविश्व

 


कल्पनाविश्व


जुंपुनी शब्दाचे अश्व

सारथ्य ती साहित्या करे

शब्दसाठा तिच्या मनी

ती साहित्य क्षेत्र काबिज करे


मनधरणी तिची कोण करील

विनवणी तिची कोण करिल

ती शब्दमेघ साहित्य नभातली

डोईवर प्रतिभाछत्री कोण धरिल


स्वभाव तिचा बाप्पाची देण

कुणाशी तिला नाही देणघेणं

मायेची कास तिच्या अंगी

प्रेमाचं तिच्या फेडावे कसे ऋण


कल्पनाविश्वात मी रममान झालो

शब्दसागरी तिच्या मी न्हालो

धागे ऋणाबंधाचे मनाशी गुंतवित

सुखीसमाधानी मी झालो..!


असावी जुळलेली गतजन्माची नाळ

आठवत नाही आता मज तो काळ !

नाते स्नेहाचे असावे तिच्याशीच 

रक्ताचे असेल पुर्वी, प्रेमाने भरे आभाळ.!!


लढलो झगडलो असेल कधी

त्याचे यतकिंचितही बुरे न वाटे

स्नेह,वात्सल्य, आपुलकी वाढत गेली

अंतःकरणी दोघांच्या जीव प्रेमाचा दाटे.!!


काटा तिला पायात रुतावा

जीव माझाच हळहळावा

वेदना जरी तिला झाली 

भावाच्याच डोळी अश्रु यावा..!


नाते हे रेशीमबंधाचे

माथ्यावरल्या चंदनगंधाचे

मनीगटी जरी रक्षाबंधनी नाही बांधले

जुडले राहिल सदैव ते मनाचे...!!


कल्पवृक्षरुपी कल्पनाताई 

जणु प्रेमळ ममत्व तिच्या ठायी

बाप्पाचा आशिर्वाद सदा तिच्या शिरी

सदा ती हर्षाचेच गीत गाई...! 


लेखणीने तिच्या घ्यावी भरारी

शब्दात प्रतिभा आपली उज्ज्वल करावी

साहित्यातुन लिखाण करुनि

प्रगतीची नव वाट चालावी....!!



शुभआशिष असा तिला शुभदिनी द्यावा

आनंदाचा प्रत्येक क्षण साजरा व्हावा

सौख्याने ,आणि समृध्दीने 

अंगणी तिच्या आनंदी पारिजातक फुलावा..!!



मोहन सोमलकर 

१२ टिप्पण्या:

  1. खूपच सुंदर शब्दात व्यक्त झालात सर...कल्पना ला समजायला जरी वेळ लागला तरी तिला जो समजला तो तिचा फॅन झाला अशीच आहे ती...👌👍✍️✍️✍️🍫🍫🌹👌🌹🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  2. वा वा एकदम जबरदस्त. खूप छान कल्पनाचे आणि तिच्या स्वभावाचे वर्णन केले आहे दादा अघदी अचूक असे.

    उत्तर द्याहटवा
  3. बापरे दादा काय बोलू अगदी निशब्द झाले मी.... किती ते कौतुक आणि किती तो मानसन्मान दिला तुम्ही मला खरोखर अगदी भारावून गेले मी ही रचना वाचून आणि ही केवळ रचनाच नाही तर यात एका भावाची माया आहे, भरभरून आशीर्वाद आहेत आणि एक जाणीव आहे एका पवित्र नात्याची नाजुक धाग्याची आणि हे सर्व मिळायला नशीब लागतं जे मला लाभलं 🤗🤗🤗 धन्य झाले आज दादा तुमच्या सारख्या भावाला मिळवून मी 🙏🙏🙏
    खरच खूपच सुंदर, सुरेख आणि अगदी अप्रतिमच रचना लिहिली दादा 👍👍👍👍✍️✍️✍️✍️👌👌👌👌👌🙏🙏🤗🤗🤗🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच सुंदर लिहिलंय मोहनजी 🙏👌🏼👌🏼👌🏼
    कल्पना आहेच अशी गुणी आणि प्रतिभा संपन्न😎👏👏🙌🙌

    उत्तर द्याहटवा
  5. Atishay sunder शब्दात कल्पनाचे विश्व रंगविले सर तुम्ही खूपच सुंदर ती आहे तशीच साकार केले तुम्ही 👌👌👌

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...