![]() |
| My gallery |
अनोखी मैत्री) साहित्य- स्पंदनी
FRIENDSHIP with viva ,mava,& kajava
(मैत्री ....... विवा, मवा, काजवा, माधवा)
जिथे जाता तिथे मला
झुळझुळ वाहणारा मैत्रीचा झरा हवा.!
बालपणापासून मैत्रीसाठी जगलो
मैत्रीत वाढलो ,जोश मैत्रीचा भेटला नवा.!
आलो साहित्य स्पंदनी या मैत्रीच्या शब्द सागरी
स्नेह,आपुलकी,जिव्हाळ्याच्या भरुन घेतल्या मी घागरी
मैत्रीची मनात मी त्या मुर्ती बसविली हर प्रहरी
वारा मैत्रीचा वाहत असतो दिशातुन चारी...!
प्रत्येक कवितेतून शब्द भावनिक साकार करतो मवा
गझल,गीतातून, कवितेतून प्रगट होऊनी हसवितो काजवा
शेतात घाम गाळतो,राबतो तो कवितेतून व्यक्त होतो तो विवा
ही त्रिमूर्ती मज भेटली ,साहित्यरुपी मेजवानीच भेटे माधवा.!
आनंदुन मी जातो ,वाचतो या तिघांच्या कविता
वाटे नेहमीच जीवनात अश्या मित्रांचा सहवास हवाहवा.!
कधी स्वप्नातही त्यांच्या कविता आठवुन पहाव्या
जोश असा , मैत्रीचा मिळतो सदैव मला नवानवा..!
टिप:- माधवा म्हणजे मी , माझे टोपननाव माधव आहे
मोहन सोमलकर 🌷🌷🌷🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
[30/07, 9:35 pm] Mohan Somalkar: मोहन सर,उर्फ माधव सर,
हे खालील शब्द तुमच्यासाठी,
आपल्या मैत्रीसाठी...
(एकेरी उल्लेखाबद्दल क्षमस्व..🙏)
*माधवा रे माधवा*
झालास तू खास मित्र,
जरी असे समूहात नवा..
माधवा रे माधवा...
आपलंसं करण्याची,
कला तुझी छान देवा..
माधवा रे माधवा...
विवा,मवा,काजवा,
सर्वांनाच तू हवा..
माधवा रे माधवा...
टिपतो छान तूझ्या,
शब्दांत ती धुंद हवा..
माधवा रे माधवा...
स्वभाव तुझा असा,
वाटावा सर्वांनाच हेवा..
माधवा रे माधवा...
तुझ्यासारखा एकतरी,
मित्र जीवनात मात्र हवा..
माधवा रे माधवा...
वाटतोस समूहात तू,
नेहमीच शब्दांचा खवा..
माधवा रे माधवा...
येईल भेटण्यास तुला,
घेऊन थोडा रानमेवा..
माधवा रे माधवा...
तुझ्या मैत्रीचा अभिलाशी,
असेल नेहमीच काजवा..
माधवा रे माधवा...
©
✍️ काजवा
(डॉ.रवींद्र जावके)
छ.संभाजीनगर.
जावके सर,तुम्ही रानमेवा आणाल तेव्हा आणाल पण माझ्यावर आज कविता करुन तुम्ही मला मैत्रीचा फारमोठा मेवा दिला🤝🤝🤝🤝😌👍🏻💐💐💐💐💐💐धन्यवाद
मोहन सोमलकर नागपुर


