मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

मनातील वेदना

 

My gallery 

जाऊन सांगा तिला सगळे
तुझ्याविना घडत नाही काही वेगळे
पोटच्या पोराला बेवारस सोडुन गेली
मोठा छान दहा वर्षांचा झाला,सोडले होते त्याला नागळे

लोक म्हणतात स्त्री तशी नसते ,पण माझा मित्र आहे, त्याची पत्नी पोटच्या पोराला सोडुन गेली ती आलीच नाही, खुप विनवण्या केल्या. तिचे हात पाय जोडले खूप विनवण्या केल्या. तिला निदान मुलासाठी तरी ये पोटच्या गोळ्याला अशी टाकून जाऊ नको,
तो तुझ्या हाडामासाचा गोळा आहे. त्याच्याशिवाय तुला कसं राहता येईल  आणि तुझं जीवन समोर कसे जाईल.व सफल कस होईल याचा विचार कर .आणि या विचारानेच तू त्याला छातीशी लाव., बिलगव !आणि परत सासरि ये .
माहेरी तुझा किती दिवस निभेकार लागणार आहे. नाही नवऱ्याचा विचार ,पण कमीत कमी आपल्या मुलाचा विचार तरी तू कर.....! माझा मित्र....... चार, पाच, दहा तिच्या कडे जाऊन आला. सासूबाईला विनवणी केली. त्याच्या मेहुण्याला विनवणी केली. परंतु त्यांनी म्हटले
.

की आम्ही मुलीला पाठवणार नाही. त्याने एकट्यात तिला समजाविले, मी वाटल्यास वेगळा राहतो. भाड्याने दुसरी खोली घेऊन,..... परंतु तू माझ्या नाही तर मुलाच्या सुखासाठी नागपुरला चल.. पण ती काहीएक ऐकण्याच्या तयारीत नव्हती . दिवसा मागुन दिवस गेले, वर्ष सरले मुलगा मोठा होत गेला. आई पेक्षा आजीच्या कुशीत झोपत गेला. आजी म्हणजे त्याला आई वाटू लागली.

सगळे लाड, सगळेच खेळ, सगळे दिवस, सगळी रात्र...... बाप आपल्या मुलासाठी जागू लागला. होते पाहिजे नव्हते ते तो आपल्या मुलासाठी करू लागला  तो आपल्या शिवबा साठी जिजाई झाला .तो आपल्या श्याम साठी श्यामची आई झाला, तो आपल्या कान्ह्यासाठी, यशोदा झाला, देवकी झाला तो आपल्या पोटच्याच्या गोळ्या साठी सगळं काही झाला , सगळं काही विसरून चुकला तो, तो आपल्या पत्नीला सुद्धा विसरून गेला. आणि एकच ध्येय, एकच उद्दिष्ट मनात साकार करून,

फक्त आणि फक्त आपल्या मुलासाठी तू जगू लागला . आम्ही किती आम्ही मित्रमंडळींनी, कितीदा त्याला दहा वेळा म्हटले असेल सुनील दुसरे लग्न करून या मुलाच्या सुखासाठी, मुलाच्या पालनपोषणासाठी .

परंतु सुनिलने काही ऐकलं नाही. आणि दहा वर्ष होईपर्यंत त्याने आपल्या मुलासाठी दुसरे लग्न केले नाही .
त्याचा एकच विचार होता की, मी दुसरे लग्न तर करून घेईल.  परंतु माझ्या मुलाला लहानपणापासून आईची माया मिळाली नाही तर आईची माया देण्याइतपत आई मिळेल काय . त्याच्या सख्ख्या आईनेच त्याची ती माया हिरावून घेतली,तर दुसरी कोणी ती माया देईल काय.?

आज तो मुलगा आणि बाप सर्व सुखी परिवार आहे. आणि दोन वर्ष झाले त्याने त्याच्या भावाच्या साळी सोबत दुसरे लग्न केले .

सुखी समाधानी ती चार लोक  पूढिल आपले आयुष्य आनंदित व्यतीत करत आहे .त्याच्या भावाच्या साळीला सुद्धा तिच्या नवऱ्याने असे सोडून दिले होते ,आणि तिला तिच्या नवऱ्याकडून एक मुलगी सुद्धा झाली होती.
दोन दिशा देवाने या नियतीने एकत्र केल्या. माझ्या मित्राने त्या पाच वर्षांच्या एक मुलगी असलेल्या आईला स्वीकारले . आणि त्या माऊलीने सुध्दा माझ्या मित्राच्या मुलाला मनातुन स्वीकारले. व आपली ममता देऊ लागली.

पुन्हा एक वचन मित्राने त्या नवपत्नीला दिले की, आपल्याला मुलगीही आहे आणि मुलगा... आता आपल्यापासून तिसरे अपत्य होऊ द्यायचे नाही, ही आपण काळजी घेऊ व , या दोघा  मुलांवरच आपले प्रेम संपुर्ण अर्पण करु . ती मंजुर झाली.

आज ते चार जण सुखी कुटुंब नांदत आहे.

तो पहिल्या पत्नीची आता आठवण पण काढत नाही.!

मोहन सोमलकर 🙏🙏


२६ टिप्पण्या:

  1. सत्य घटना आहे..!
    विषय नाजूक आहे..!
    आधी झाले ते होयला नको होते.
    आणि जिवनाची adjustment करणं
    हे शहाणपण सुचलं...!
    पण कोणावरही कशी वेळ येऊ नये असं मला वाटतं...!🙏
    आबा
    🙏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अगदीच बरोबर आबा,व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीला मात करणे शिकले पाहिजे

      हटवा
  2. खूप काही शिकण्यासारखं आहे या लेखातून...👍✍️👌🙏👏👏

    उत्तर द्याहटवा
  3. खूप खूप सुंदर आणि अप्रतिम लिखाण केले दादा 👍👍👍✍️✍️✍️👌👌👌🙏

    उत्तर द्याहटवा
  4. खुप खुप धन्यवाद कल्पनाताई 👍👍👍👍👍👍👍👍💐🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  5. आज खुप दिवसांनी काही तरी शब्द कवींना वाचायला मिळाल आहे.
    हल्ली सध्या शब्द कवी कुठे अडकले होते ,पण असो आज विषय खुप सुंदर
    व सत्यशोधक असा विषयावर मार्मिकता वाचली व वाचून आनंद ही झाला
    असे लेख दैनंदिन लेखकानत प्रकाशित करून नवीन समाज पिढीला शिकाला मीळेल . तसे तुमचे लेख,कविता खुप सुंदर आहेत.ते प्रकाशित लवकर तुम्ही कराल अशी आशा वक्त करतो. लेखन साहित्या साठी तुम्हाला शब्द कवीच्या खुप खुप शुभेच्छा✍️💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  6. ताणाल तर तुटले अशी नात्यांची अवस्था करू नये. खूप सुंदर लेख लिहला सर अप्रतिम 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  7. खूप छान लिहिले आहे ,त्यांचे आयुष्य मार्गी लागले, सुख पुन्हा आयुष्यात आले खूप छान झाले
    👌👌👌👌👌✍️✍️👍

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...