॥मुली तु भांग्यवंत हो,यशवंत हो
नवनवीन किर्तीमान स्थापित कर.॥
अवघ्या सहा वर्षाची असताना ती पहिल्यांदा पाण्यात उतरली हळूहळू स्विमींगमध्ये रुची वाढत गेली पदका मागून पदके जिंकत गेली आणि थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आज तिच्याकडे तब्बल दोनशेच्या वर पदके आहे.
एका स्पर्धेत सर्वाधिक सहा पदके जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम तिने करून दाखविला.
नागपूरचे भूषण ठरलेली ही जलतरणपटू आहे ऋतुजा तळेगावकर..! वीस वर्षीय ऋतुजा ठरवुन स्पोर्ट्स मध्ये आली नाही. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये नागपुरच्या, रघुजी नगर मधील कामगार कल्याण केंद्रावर समर कॅम्प मध्ये आली असता तिला बाजूच्या स्विमिंग पूल मध्ये मुले मुली शिकत असल्याचे दिसले.
हा खेळ आवडल्याने तिने आईकडे हट्ट धरला. ऋतुजा च्या इच्छेचा मान राखत आईने तिला स्विमिंग मध्ये टाकले .आणि तिथूनच खऱ्या अर्थाने दिला मॅरेथॉन प्रवास सुरू झाला अनुभवी प्रशिक्षक संजय बाटवे पाटील यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या ऋतुजा ने अल्पावधीतच आपली गुणवत्ता सिद्ध केली शालेय व महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याचा सुरु झालेला सिलसिला आजपर्यंत कायम आहे .जवळपास बारा वर्षाच्या कारकिर्दीत ऋतुजा आणि विविध स्पर्धांमध्ये 100 सुवर्णपदकासह दोनशेच्या पदके व ट्राफिज जिंकले आहे. दोन वर्षापूर्वी जालंधर( पंजाब )येथे झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत मिळवली तीन सुवर्णा सह जिंकेलेली विक्रमी 6 पदके तिची राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम कामगिरी ठरली. राष्ट्रीय तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात आजवरचा हा विक्रम आहे. उल्लेखनीय म्हणजे देशभरातील 68 विद्यापीठांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत ऋतुजा आणि दुसरी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळवला आहे .ऋतुजा चा प्रेरणादायी प्रवास एवढ्यावरच थांबला नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने दोनदा झेप घेतली. 2018 मध्ये इजराइल मध्ये झालेल्या वर्ल्ड जूनियर चॅम्पियनशिप व त्यानंतर 2019 मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई ओपन वाटर चॅम्पियनशिपमध्ये तिने देशाचे प्रतिनिधित्व केले .डॉक्टर आंबेडकर कॉलेजमध्ये बीकॉम ची विद्यार्थिनी असलेल्या ऋतुजा ला भविष्यात आशियाई किंवा संधी मिळाल्यास ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकवला आहे.
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणे सोपी गोष्ट नाही याची तिला जाणीव आहे .मात्र स्वप्नपूर्तीसाठी मेहनतीची तिची पूर्ण तयारी आहे .तर प्रयत्नांची पराकाष्टा असेल तर कोणतेही जग जिंकता येते. आकाशात भरारी मारता येते, हे तिचे स्वप्न पूर्ण व्हावे. असे प्रत्येक नागपूरकरांना वाटत आहे. तिच्या यशामागे तिची आई तिचे कुटुंब सर्वस्वी पाठिंबा देत आहे. आणि आम्ही नागपूरकर सुद्धा तिच्या यशाच्या मागे कौतुकाने पाठ थोपटत आहोत .
अशीच ती सदैव भरारी मारत राहो, आणि नागपूरचे व भारत देशाचे नाव उज्वल करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.!
"ऋतुजा ला अगदी पहिल्या दिवसापासून मी पाहत आलोय. तिच्यात भरपुर टॅलेंट आहे. बारा वषाॅत दोनशेच्या वर पदके जिंकून तिने हे सिध्दही करुन दाखविले आहे. तिची सिनियर गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असुन, अशीच मेहनत आणि सातत्यपूर्ण कामगिरी राहिल्यास नक्कीच तिचे स्वप्न पुणॅ होईल.
एक प्रशिक्षक... श्री. संजयजी बाटवे सर
========================
श्रीयुत संजयजी बाटवे सरांबद्दल काय सांगायचे ,ते स्वतःच अष्टपैलु व्यक्तीमत्व आहे. ते प्रशिक्षक म्हणुन या क्षेत्रात गेल्या कित्येक वर्षांपासून जगविख्यात आहे. त्यांच्या या यशाच्या मागे त्यांची सहचारिणी व माझी शालेय मैत्रीण सौ. कुंदा संजयजी बाटवे हिचा व दोन मुलांचा सहवास आहे.
संजयजी बाटवे सरांची आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षक म्हणून ख्याती आहे.
रोजच त्यांच्या कार्याबद्दल महती सांगणारे लेख नागपुर व महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात प्रकाशित होतात.
रोजच कुटूंबाच्या दुर राहुन मुलांना स्विमिंगसाठी राज्यस्तरीय, देशव्यापी,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण देणारे संजयजीला स्वतः कितीतरी मॅडल, प्रमाणपत्र शासनाकडून मिळाला आहे.
त्यांचा हा प्रवास असाच अविरत चालु रहावा व ते देशाला उत्कृष्ट दर्जा चे स्विमर देत राहो. हिच ईश्वर चरणी प्राथॅना.
🙏🙏🙏🙏🌿🎊🎊🎊
संजय बाटवे...!🌱🌱🌱
(ऋतुजाचे प्रशिक्षक व माझ्या मैत्रीणीचे यजमान )🌺🌺🌺

मोहन सोमलकर 🌺🌺

खुप खुप अभिनंदन ����������
उत्तर द्याहटवाधन्यवाद गणेश दादा
हटवाखूप खूप शुभेच्छा 💐💐💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद सचिन
हटवाऋतूजा... अभिमान वाटावा अशी कामगिरी, अभिनंदन!🌹👏🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवाधन्यवाद जी सर🙏
हटवाखूप छान 👌🏻👌🏻we are proud of you rutuja 💐👏👏🍫🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद रंजूताई
हटवाऋतुजाचे अभिनंदन🌹
उत्तर द्याहटवाआणखीन यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.🌹
खूप छान लेख लिहिला आहे सर...👌
आबा 🙏
धन्यवाद आबा 🙏🙏🙏🙏🌿🌺
हटवाखूच छान लेख... ऋतुजा ला पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा...👌👍✍️🍫🌹💐💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद मानसीजी
हटवाखूपच छान 👌👌💐💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद कांचनताई🙏🌿🌺🌺
उत्तर द्याहटवाखूप छान लेख ऋतूजा ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाधन्यवाद दुर्गा 🙏🌺🌺🌺🌺🌿🍫🍫🍫🍫
हटवा👌👌👌👌👌खूप छान लेख,ऋतुजाचे खूप खूप अभिनंदन.🌹🌹
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅम
हटवाऋतुजाचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद ताई 🌺👍🙏
हटवा