मराठी साहित्यातील द.मा. मिरासदार हे सोनेरी पान होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. दमा हे मराठी साहित्यातील सोनेरी पान होते. कथाकथनात खुप मोठे मिरासदारी चालायची.
दमांनी साहित्य वर्तुळात विनोदी ढंगाची साहित्य निर्मिती केली. त्यांची गाजलेली कथा* भुतांचा जन्म * ही कथा द.मा.चा मराठी साहित्य वर्तुळात ठसा उमटवून गेली.
अनेक त्यांच्या कथेवर नाटक रचण्यात आली. " चकाट्या" ही कथा त्यांची प्रसिद्ध आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्ष पद भूषविले होते.
आपल्या विनोदी लेखन आणि ओघवत्या शैलीने मराठी साहित्य विश्वात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे साहित्यिक द.मा. मिरासदार यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रातील फार मोठी हानी झाली आहे. ग्रामीण जीवनातील विसंगती,इरसालपणाचे दर्शन घडवून तो कथानकाच्या माध्यमातून त्यांनी सातासमुद्रापार पोहोचविला.
पत्रकारिता,शिक्षण क्षेत्र( शिक्षक) व त्यानंतर व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील यांच्या बरोबरीने कथानकाच्या माध्यमातून मराठी साहित्याला त्यांनी नविन दालन मिऴवुन दिले. ग्रामीण जीवनातील पार आणि कट्यावरचा विनोदी खजिना रसिकांसमोर द.मा. नी उलगडला.
सूक्ष्म समाजजाण ,खुमासदार वणॅन, श्रध्दा-अंधश्रध्देतून तयार होणारा विनोद त्यांनी नाट्यमय प्रसंगातून मांडला.
ते पुण्याला राहत असायचे. तशी पुणेनगरी पुण्यनगरी आहे. मराठी साहित्यातील मोठे मोठे साहित्यिक भारताला पुण्यानेच दिले, ना.सी फडके, आचार्य अत्रे,पुल हे पुण्याचेच.!
वयाच्या ९४ व्या वर्षी दमानी श्वास सोडला. मराठी साहित्याला पोरके करुन, मराठी साहित्य क्षेत्रातील मिरासदारी आता संपली..!
दमांना प्रतिलिपीकडुन भावपूर्ण श्रध्दांजली.!
🌿🍁🌿🍁🙏🍁🌿🍁🌿🍁🌿🍁
मोहन सोमलकर 🌿🍁

