| My gallery |
जानु 💝तुझ्या नसल्याने निस्तेज वाटे
ति आपल्या अंगणातली बाग.!
पहाटे पहाटे उठल्यावर
तुझ्याच त्या गोड स्वप्नाने येई मला जाग !
तु नव्हती या दोन चार दिवसात तर
बहरुन आलेल्या त्या तुळसीला आला होता राग.!
फुले ती आपल्या छोट्याश्या बागेतील
गेली होती बहरलेली पटकन कोमूजुन!
हळुच मग कानात मला विचारायची
कारे आमची मालकिन गावाहुन आली नाही अजुन!
आज तु आलिया जानु माहेराहून घरला जशी
अंगणात पाऊल ठेवले जसे तु, गालात तुळस हसली कशी.!
तुषारच आनंदाचे अंगणी उडावे जसे.!
फिशपाॅट मधले मासे पाण्यात उडायला लागले तसे..!
घराचा तो कोपरा कोपरा तुझ्या येण्याने बहरला!
श्वास जसा तुझा या घरात आहे जसा भिनला !
वाटे जावे घरी लगबगीने लवकर
ओढ लागे मनी तुझी ,करिल जवळ कधी घर!
जसा आलो मी घरी दारात पाय ठेवले
तुझा फुलावानी फुललेला चेहरा पाहुनि मन हसले.!
वाटले मनी सारे काम सोडूनी बसावे तुझ्या जवळ
आजच सारे हितगुज करावे तुझ्याशी मनाने एकवटले बळ!
कळले मला जिच्या नसल्याने कोपरा कोपरा व्हावा सुना.!
मी तर मग तुझाच आहे सखा,मग मी कसा विसरु तुझ्या प्रितीच्या पाऊलखुणा!
मलाही आता बोलुदे तुझ्याशी
फुलासारखे मग बहरुदे बसु दे थोडे तुझ्यापाशी..!
🌹🥀🌹🪰🌹🪱🥀🌹🥀🪱
मोहन सोमलकर