 |
| My gallery |
त्यांच्यातला मी पुन्हा पाहिला..!
बालपणी असतो सुखाचा झरा वाहत
हातात हात मैत्रीणीचा असतो
आनंदाचे क्षण सदा असते
जीवनामध्ये बहरत..!
दिवस ते असते अभ्यासाचे
मौजमजेचे असते
आणि असते गीत नवे गाण्याचे
धागे ह्दयी मैत्रीचे जुडण्याचे असते..
असेच एकदा मग
बालपण सरुन जाते
मोठ्या होऊन मैत्रीणी
संसारात रमुन जाते.!
मुले होतात मोठे
संसाराचा गाडा, पुढे पुढे जातो
मग मैत्रीणी सोबत घालविला दिवस
कधी काळी आठवणीत येतो.!
होतात कधी फोनवर गोष्टी
संसाराची कधी,मुलांची
कधी यजमानांची
असते मग सांगोष्टी.!
जरी ती असते सुखी संसारी
आनंदाचा झरा जरी
वाहते दारी
बालपणीच्या मैत्रीणी आठविते
एकदा तरी...!
दिवस तो सोनियाचा येतो
मैत्रिणीचा मेळावा
एका ठिकाणी रममान होतो
सुखदुःखाच्या गोष्टी होते
मौजमजा मनाची मैत्रीणी सोबत होते.!
तुमची मैत्री चिरकाल टिकावी
अशा मैत्रीला माझा सलाम
मोहन सोमलकर
🙏®️©️🙏
🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫