मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

कार्तिकी एकादशी ॥

 

My gallery 

आषाढी कार्तिकी ॥ भक्तजन करी वारी॥
पताका ती दारी॥ सदा दिसे॥१॥

आहे आज एकादशी ॥ पंढरी जाऊ कशी ॥
मन कुटुंबापाशी ॥ हिच माझी काशी ॥२॥

हात जोडतो इथुनि॥ विठ्ठला स्मरतो मनी॥
रंगतो त्याच्या भजनी ॥ सदा मी॥३॥

कार्तिकी एकादशी॥ राहु आज उपाशी ॥
दिवा लाऊ देवापाशी ॥ गाऊ विठलाला॥४॥

मोहन सोमलकर

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

बालपणाच्या मैत्रीणी

 

My gallery 

त्यांच्यातला मी पुन्हा पाहिला..!


बालपणी असतो सुखाचा झरा वाहत
हातात हात मैत्रीणीचा असतो
आनंदाचे क्षण सदा असते
जीवनामध्ये बहरत..!

दिवस ते असते अभ्यासाचे
मौजमजेचे असते
आणि असते गीत नवे गाण्याचे
धागे ह्दयी मैत्रीचे जुडण्याचे असते..

असेच एकदा मग
बालपण सरुन जाते
मोठ्या होऊन मैत्रीणी
संसारात रमुन जाते.!

मुले होतात मोठे
संसाराचा गाडा, पुढे पुढे जातो
मग मैत्रीणी सोबत घालविला दिवस
कधी काळी आठवणीत येतो.!

होतात कधी फोनवर गोष्टी
संसाराची कधी,मुलांची
कधी यजमानांची
असते मग सांगोष्टी.!

जरी ती असते सुखी संसारी
आनंदाचा झरा जरी
वाहते दारी
बालपणीच्या मैत्रीणी आठविते
एकदा तरी...!

दिवस तो सोनियाचा येतो
मैत्रिणीचा मेळावा
एका ठिकाणी रममान होतो
सुखदुःखाच्या गोष्टी होते
मौजमजा मनाची मैत्रीणी सोबत होते.!

तुमची मैत्री चिरकाल टिकावी
अशा मैत्रीला माझा सलाम

मोहन सोमलकर
🙏®️©️🙏
🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫


ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...