मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

शिक्षणदिन

 शिक्षक दिन 

एकच होती लेखणी

एकच पाटी असायची 

गिरवुनी क,ख,ग,घ

ओढ लावे बाई शिकायची! 

बाई नसे ती मज 

आईच वाटत होती

सोडुन आई दारात

बाईच कवेत घेत होती.!

बापु- बेटा करुनि 

बाराखडी, आकडे ओळख शिकवायची

मधल्या सुट्टीत मग 

उपमा ,रवा खाऊ घालायची! 

एकदा शाळेत नाव टाकले

परतनी पालक ना यायचे

शाळेची चौखट कधी ना

मग ते पाहायचे..!

पाच रु. पासुन तर

पाचशे रु. च्या फी वर

आम्ही सारे शाळा शिकलो 

शाळेच्या त्या बाई व सरांपासुन 

जीवनाचे गणित शिकलो.!

कसले काय दप्तर होते

वह्या आणि पुस्तके नशीबाचे 

सारे खेळ होते.!

बसायला बेंच नव्हते

खाली फाटलेल्या चटईचे राज्य होते

वाचुनिया" श्यामची आई"

सानेगुरुजीला जाणलो 

आईचे प्रेम आम्ही 

आमच्या बाईतही पाहत राहिलो. 

आजारी कधी पडता

होमवर्क सारा घरी मिळायचा

काऊन नाही आला माझा 

विद्यार्थी म्हणून मास्तर माझा घरी यायचा.!

शिक्षकांप्रति आदर होता 

दरारा बिना मारल्याने होता

वर्गात आले सर मग 

चिडचुप सारा वर्ग होता.!

शाळा आमची ती

दुसरे आमचे घरच वाटे

परिक्षा वार्षिक होता

काढतांनी शाळेतुन पाय

अंतःकरण मग दाटे.!

आता मात्र शिक्षण प्रणाली बदलली

शिक्षण झाले अवघड आणि महाग 

आताच्या शिक्षक व शिक्षिकांना 

विद्यार्थ्यांना शिकविता शिकविता येतो वैताग 

घर आणि शाळा सांभळता 

शिक्षक बिचारे वैतागले

स्पर्धेच्या या युगात 

शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे बारा आहे वाजले.!

तरी बिचारे आजचे शिक्षक व विद्यार्थी 

करे शिक्षणासाठी तारेवरची कसरत.!

सकाळपासून संध्याकाळपर्यंत 

अभ्यासाचा त्यांचा पाढा नाही सरत.!

शिक्षणप्रणाली व शिक्षणसंस्था व्यापार व स्पर्धा झाली आहे.यात मरण विद्यार्थ्यांचे झाले आहे..!

शिक्षकदिनाच्या आधुनिक शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा

मोहन सोमलकर 🙏🏻🙏🏻🙏🏻💐👏🏻

मंगळवार, २ ऑगस्ट, २०२२

नागोबा आले होते दर्शनास्तव

जिथे आहे आमची कृषी उत्पन्न बाजार समिती

कितीतरी एकरचा तो आहे एक जंगलाचा पट्टा

नागपुरची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे

आशियातील दुसर्या नंबरची बाजारपेठ 

इथे कांदा,बटाटा,हळद,मिर्ची, लसूण, अद्रक,वाळली मिर्ची 

गेहु,तांदूळ,कनकी,ज्वारी,बाजरी,मका,उडद,मसुर,मुंग,चना,तुर

होतो व्यापार खुप, टनाने होते मालाची आवक भरपूर 

पण ऐकेकाळी ही जमिनी होती शेतीची वा जंगलाची

संपत्ती होती,वस्ती होती कितीतरी नागाची व सापांची

जुन्या इमारतीत व्यापार चालु होता,नविन बांधकामासाठी

खणन चालु होते.!

डोळ्यादेखत मी पाहिले ,मोठ्या फणीवाले लांबच लांब नाग निघतांना पाहिले.!

पावसाळा सुरु झाला की, तिथे निघतात नेहमीच छोटेमोठे साप

सगळेच पाहुन अवाक होऊन म्हणतात मग बाप रे बाप..!

अशा कित्येक सांपानी इथे बाजारपेठेसाठी आहुती दिली

कृ. उ. बा.स. ने सापांची वस्तीच हडपली..!

आजही मोठे मोठे साप निघतात जमिनितुन बाहेर.!

जुने लोक म्हणे ,बाबांनो त्यांचेच वस्तीस्थान हे आहे सापांचे माहेर!

एकदा तर मी खुप अचंबित झालो ,माझी घाबरगुंडी उडाली

एक फणीवर ३६ चा आकडा असलेला डोम्या नाग माझ्या गाडीत येऊन बसला..!

आमच्या शाॅप मध्ये काम करणारा एक हमाल म्हणे भाऊ तो आत्ताच या चाकातुन धसला..!

हे ऐकुनच पंढरी माझी घाबरली

लोक जमा झाले, म्हणे गाडीवर नागाने सवारी केली

वाजवा डमरु, शंखनाद करा, आग नका पेटवु गाडीला हालवा.!

मी भितभित किक मारुन गाडी चालु करुन खुप रेस केली

नाग निघता निघेना ,भितीने अंदर दडुन बसला

माझा त्याला बाहेर काढण्याच्या आटापिटा पाहुन गालात हसला.!

सगळेच शर्ती चे प्रयत्न असफल झाले होते 

कोण जाणे ,कोणता मागच्या जन्माचा बदला नागराज घेत होते.!

शेवटी हतबल मी झालो, गाडी तिथेच सोडायला तयार झालो

कापुर,अगरबत्ती लावुन नागराजाला प्रस्थान करावे म्हणून वंदन करु लागलो.!

नागराज महाशय शंभर जमलेल्या लोकांना पडले होते भारी

काढण्याची त्यांना बाहेर खुप जणांनी शकल लावुन केली तयारी.!

परिक्षाच जणु ते माझी पाहत होते

दिवस डुबला आता सांज आली ७ वाजले होते.!

नागराज बसले होते गुंडाळी मारुन पेट्रोलच्या टंकीवर.!

जसा शोलेत धर्मेद्र चढला होता पाण्याच्या टाकीवर !

पुन्हा मी नागराजाला म्हटले," बाबा काय मागणी आहे तुझी

सोड जाऊ दे, गाडी घे लागेल तर ,जातो पत्नी वाट पाहते माझी.!

अख्या बाजारपेठेत बोंबाबोंब झाली

नागराजाच्या दर्शनास्तव गर्दी उसळली.!

मग माझ्या डोक्यात कल्पना आली

सर्प मित्र बोलविण्याची आयडिया केली.!

ताबडतोब केला फोन सर्प मित्राला..!

तो म्हणे भाऊ पेट्रोल लागते यायला.!

मी म्हटले," घेण॔ भाऊ का घेशीन पैसेच घेशीन तु

जान तर नाही घेशीन यन बापा लवकर ,लावु नको किंतु परंतु.!

आले धावत दोन सर्प मित्र 

जसे वाटावे तेच होते सर्पाचे मित्र! 

नागराजाला त्यांनी पाहिले टंकीवर 

टॉर्च मारला डोळ्यावर,ठोकपीट पेचकसने केले गाडीवर

नागाला वाटले आले आपले दोस्त 

जाऊन बसला आता तो हेडलाईट च्या वायराच्या जाळ्यात मस्त

सर्प राजाने हेडलाईट चे नट उघडले

ढाचा बाहेर काढून नागाराजाला चमट्यात पकडले.!

सर्प मित्र म्हणे भाऊ तुम्ही खुप वाचले हा आहे असली नाग.!

तुम्ही आम्हाले बोलवलं काढाले याले ,भरं झालं आली तुम्हाले जाग

भरणीत प्लास्टिकच्या नागाला बंद केले

सगळ्यांनी नागराजाला हात जोडले

सर्प मित्रांना दिली २५१ रु. दक्षिणा

म्हटलं भाऊ पुन्हा काम पडलं तर लवकरच येजा.!

तोपर्यंत आम्ही भोगत बसु जिथे आहे आमची कृषी उत्पन्न बाजार समिती

तोपर्यंत आम्ही भोगत बसु सजा...!

वास्तव दर्शन नागाचे...!

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

मोहन सोमलकर 🙏🙏🙏🙏🌿

सजा...!

वास्तव दर्शन नागाचे...!

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

मोहन सोमलकर 🙏🙏🙏🙏🌿

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...