तू सोबत असशील तर...
एक जन्म जात बच्चू होते
त्याच्या आईच्या मांडीवर
कानटोपर्यात डोके त्याचे
आई त्याची बसली गाडीवर
बिनधास्त होते बिचारे
सवय त्याला आईच्याच मांडीची !
मग कशाला हवी त्याला
भिती काही होण्याची..!!
राहावले नाही माझे मन
तान्हुल्याचे इवलसे पाहुनिया गाल..!
मी त्या तान्हुल्याचे आईला म्हटले नको करु याचे हाल.!
जरी घेतले मांडीवर ताई
तान्ह्याच्या चेहर्यावर पदर
साडीचा आडवा धर..!
कित्येक प्रदुषणात्मक विषीली हवा रस्त्यावर आहे
तान्हानुल्याचा तु विचार तर कर.!
तान्हानुल्याला कळते पण तुला कळत नाही..!
तो म्हणतो, तु सोबत आहे आई, तर मी बिनधास्त आहे
तुझ्या जुडलेल्या प्रेमरुपी नाळेनेच तर मला जिवंत ठेवले आहे...!
रस्त्याच्या हवेने अलगत
त्या तान्हुल्याला निद्रेच्या हवाली केले.!
रस्त्यावरल्या प्रदुषणातून
चांदण्यात फिरायला नेले.!
तेव्हाच मी मग समाधानी झालो.!
म्हटले, नको शिवु देऊ हवा ही त्याच्या गालावर
तान्हा निद्रिस्त तुझ्या भरोश्यावरती जरा पदर त्याच्या मुखावर धर.!
त्याला तु आपल्या जवळ धर..!
मोहन सोमलकर 🙏🏼
WOW...!!
उत्तर द्याहटवाखूपच छान मोहनजीऽ
अप्रतिम...!!
👌👌👌👌👌👌👌👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
धन्यवाद जी👍👍👍
उत्तर द्याहटवामस्तच 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा