मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

एक स्वप्नच लेखकाचं

 



आदरणीय प्रतिलिपी माई,
महोदया,
स.न.वि.वि.
               महोदया, मी मोहन सोमलकर कवी, लेखक, नागपुर.  तसा मी १९९७ पासुन लिहित आहो. मला काॅलेज मध्ये असतांना पासुन  शीघ्र कवित्व प्राप्त झाले. मी अनेकांच्या नावावरती कविता त्यावेळेस लिहल्या होत्या. नाॅनस्टाप कविता ,शायरी मी करायचो, मी नागपुरात " धनवटे नॅशनल काॅलेज " च्या हाॅल मध्ये मोठ्या जनसमुदायासमोर "माझी मैत्रिचं नातं ही विनोदी वर्‍हाडी कविता सादर केली होती. पहिल्यांदाच सादर करत असल्यामुळेच माझे हात कापत होते. पण मी हिम्मत हारली नाही. पुर्ण कविता सादर केली. कविता एवढी सुंदर होती की, प्रचंड मला प्रतिसाद मिळुन मला टाळ्यांचा गडगडाट मिळाला. तिच माझी प्रेरणा ठरली. पुढे मी काॅलेजचे प्रतिनिधित्व करत तीन व्यक्ती " यवतमाळात, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने आयोजित केलेल्या, साहित्य सम्मेलनात सहभागी झालो व तिथे मंगेश पाडगांवकर सर, विठ्ठल वाघ सर, सुधाकर गायधनी सर .... हे सगळे भारताचे विख्यात कवी . यांच्यासमोर कविता सादर केली.

तिथे अनेक राज्यातील लोक कथा, कविता, शायरी सादर करायला आले होते. ते तीन दिवस साहित्यिक वातावरण पाहुन प्रचंड जनसमुदाय पाहुन सगळेच परतीच्या वेळेस भाऊक झाले होते.
       माझे मित्र भोजराज साठवणे, प्रदीप मोटघरे, कवि कलाम यांची प्रेरणा मला कविता लिखाणात मिळाली.

     मग आता मी वीस वषाॅनंतर प्रतिलिपी हे व्यासपीठ लाॅकडाऊनपासुन जाईन केले इथे मला खुप मित्र,  माझ्या बहिणी, वरिष्ठ लोकांनी माझ्या लिखाणाला खुप प्रतिसाद दिला. मला भरभरुन प्रेम दिलं.

       पण आता कुटूंब व नोकरीच्या व्यापापाई मी जास्त लिखाण करु शकत नाही.
      आणि आता प्रतिलिपीवर विषयही बरोबर दिल्या जात नाही.
      माझे प्रतिलिपीवर एकच स्वप्न आहे, ते म्हणजे एकदा तरी, संपुर्ण विभागात नाहीतर चारोळित प्रथम यावे. खुप दिवसांपासुन मी तसा प्रयत्न करित आहे. पण साध्य होत नाही.

ज्यादिवशी मी प्रथम येईल,तो दिवस माझ्या जीवनातला अनमोल राहिल.

        मग मी प्रतिलिपी सोडुन देईल.
तोपर्यंत मी लिखाणावर भर देईल.

    मला प्रतिलिपीवर जे प्रेम मिळाले, ते मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आबासर, येवला सर, आणि इतरही खुप लोक आहेत. ज्यांनी लिखाणात मला मोलाचे मार्गदर्शन केले.

     त्या सर्वाना व प्रतिलिपीला मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही.

धन्यवाद
आपला लेखक
मोहन सोमलकर
नागपुर 🙏🙏🙏🙏🍁
==========================
Copyright ©️


१० टिप्पण्या:

  1. मोहनजी खूप छान लिहलय.तुम्ही अष्टपैलू व्यक्तित्व
    आहात मी तुम्हाला सलाम करते आणि तुम्ही
    एक दिवस संपूर्ण मध्ये टॉप 1 वर येणारच
    आणि मी तेव्हा तुमच्यावर लिहिणार🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खुप सुंदर मनोगत सर..पण प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर लिखाण थांबवु नका...लिहीत रहा, शुभेच्छा...💐💐💐🍫🍫🍫👍👍👍

    उत्तर द्याहटवा
  3. सर टॉप वर येऊन सोडायचे नाही तर तो टॉप कायम ठेवायचा आणि एक दिवस तरी तुमचे स्वप्न खरचं पूर्ण होणार आणि व्हावे हीच शुभेच्छा..खूप सुंदर लिहिता तुम्ही .. पुढे ही असेच लिहित राहवे या मंचावर हीच अपेक्षा आहे..🙏🙏🙏🙏💐💐💐💐
    छेडीला तो सुर नवा लेखणीचा
    संकल्प केला टॉप गाठण्याचा
    बहरतील शब्दरूपी फुलं लेखणीतून
    नाही होऊ देणार चुराडा स्वप्नांचा

    उत्तर द्याहटवा
  4. खूप सुंदर भावना व्यक्त केल्या आहे सर. 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  5. खरंच मोहन दादा तुमचं हे स्वप्न पुर्ण होवो ही माझी मनापासुन शुभेच्छा 👍👍👍👍

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...