मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

मन काय असते ..?

 🌺 

*मन म्हणजे काय हो.?*

*त्याला कोणी पाहिलं नाही,*

*कसं असते ते माहीत नाही,*

*पण त्याला खूप मान्सनमान असतो.*

*कधी ते लिक्विड असतं,*

*"मन भरलं नाही"*

*असं म्हणतो आपण,*

*कधी ते सॉलिड असतं,*

*मनावर खूप ओझं आहे,*

*कधी ते घर होतं,*

*मेरे मन में रहने वाली,*

*कधी ते तहानलेल असतं,*

*मेरा मन तेरा प्यासा,*

*कोणी त्याला मोरा ची उपमा देतं,*

*मन मोराचा कसा पिसारा फुलला !!*

*असं हे मन आयुष्य भर,*

*आपल्याला झूलवत ठेवतं,*

*कधी स्वतःच्या मनाने तर,*

*कधी दुसऱ्याच्या मनाप्रमाणे,*

*आपण वागत असतो,*

*हे "मन" कधीच स्थिर का बरं नसतं.?*

*ते कधी प्रेयसीच्या तोंडातून,*

*मंदिर रूप धारण करतं,*

*आणि ती म्हणते...*

*"मन में तुझे बिठाके,*

*काही जण असतात की,*

*त्याच्या "मनात"काही रहात नाही,*

*तर काही "मन कवडे" असतात.*

*मन दिसत तर नाही.*

*पण त्याने ठरवले तर ते हरवून टाकतं.*

*तर कधी शक्ती नसताना जिंकून ही देतं.*

*मनात आणलं तर काहीही होऊ शकतं,*

*जरी त्याला कोणी पाहिलेले नाही,*

*तरी ते जर चांगलं असलं,*

*तर आपण आनंदी राहतो.*

*दुसऱ्याचं भलं करतो म्हणुन,*

*म्हंटलं जातं, "मन चंगा तो...*

*कधी हे खूप डेंजर असतं,*

*स्वतःकडे राग तिरस्कार साठवून ठेवतं,*

*आणि "मनातील" राग दुसऱ्याचे नुकसान करतं.*

*याचा वेग मोजण्याचं यंत्र अजून,*

*अस्तित्वात आलेलं नाही,*

*तरी लोकं म्हणतात,*

*"मनाचा ब्रेक,उत्तम ब्रेक,*

*"मन" दिसत नसलं तरी,*

*तेच आपणाला घेऊन फिरत असतं,*

*कधी घरी,कधी डोंगरदऱ्यांत,*

*कधी आकाशात,*

*पण ते निर्मळ असतं,*

*पारदर्शक  असतं.*

*म्हणुन च आपण म्हणू शकतो.*

*"मोरा मन दर्पण कहलाये."*

*अशा या न  दिसणाऱ्या,*

*पण सर्वस्व असणाऱ्या,*

*"मनाला" काबूत ठेवण्याचा,*

*अनेकजण प्रयत्न करतात.*

*पण "मनाप्रमाणे" जगता आलं नाही,*

*तर त्याला काही अर्थ आहे का.?*

*मग "मनसोक्त" जगा ! !*

*आणि त्यासाठी...*

*मनापासून शुभेच्छा...!!*                     *आपला दिवस आनंदात जावो!!*


                 🙏🏻🌹🙏🏻

*श्री. मोहन अवधुतराव सोमलकर! 




६ टिप्पण्या:

  1. अप्रतिम खूप छान...!
    सुंदरच रचना केली आहे..!!
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच सुंदर लिखाण केले दादा मनाविषयी खरोखर मनच खरं आयुष्य जगवत असतं माणसाला आणि माणूसही जणू मनाचा गुलामच असतो मन जस म्हणेल तसंच माणूस करतो आणि जसं म्हणेल तसेच माणूस आयुष्य जगत असतो मन आनंदी असेल तर माणूस आनंदी राहतो आणि मनच जर उदास असेल तर माणूसही उदासवाणा होऊन जातो
    खूप नाना प्रकारचे खेळ मनच माणसाची खेळतो. पण तरीही मन हे छानच असतं खूप सुंदर मला विषयीचे भावना व्यक्त केल्या दादा अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍✍️✍️✍️✍️✍️✍️✍️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍫🍫🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...