मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

प्रेमाचा चहा



प्रेमाचा चहा☕☕

उद्या रविवार आला
चेहरा माझा आनंदला
आजच कामाची यादी केली
एकच घोट चहाचा घेतला.!!

या सारे या चला
गप्पा गोष्टी करु चला
रोजच अवतरतो कवितेत
आज प्रेमाचा चहा घेऊ चला.!!

मोठ्या आवडीने मी चहा बनविला
साखर म्हणुनी तुमच्या कवितेची
गोडी त्या चहात मी टाकली
आपुलकी ती चहात दाटली..!!

तुम्हचे माझे नाते जुडले
आयुष्याचे क्षण मी यादीत मांडले
एकच गोड फुरकी घेऊनि
सुखाचे क्षण मी चेहर्‍यावरी जाणले.!!

नको जाऊ हा गोतावळा सोडुनि
एकमेकात मने हो रुळली
जशी चहात साखर मिसळते
नाते आपुली आता जुडली..!!

सुखदुःखाची मनी यादी केली
चहाचा कप हाती घेऊनि
सारे मज आठवतात रोज
मी तुमची नाती सजवली मनी..!

घ्या हा आपुलकीचा चहा जरा
मुखी कप लावुनि आनंदाची गोडी चाखा
आयुष्यात सदैव आठवण राहील
एक एक इथे मोलाचे,प्रत्येकाचा मान राखा !

सुप्रभात
गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.!

☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕
मोहन सोमलकर 🌺🌺🌺🌺




२० टिप्पण्या:

  1. सुप्रभात दादा... 🙏🏼☕
    खुपच सुंदर... 👌👌
    तुमची कविता वाचून सकाळच्या चहाची अजून लज्जत वाढली....

    उत्तर द्याहटवा
  2. खुप खुप धन्यवाद सचिन, सुप्रभात ☕☕☕☕🙏

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर सकाळ झाली तुमच्या कवितेने

    उत्तर द्याहटवा
  4. आजचा चहा हा खरा चहा वाटला दादा. जो कवितारुपी तुम्ही चहा आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलाय त्यासाठी खरोखर खूप खूप धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏🙏 आणि खूप सुंदर सुरेख अप्रतिम शब्द तुम्ही चहा सोबत आपल्या भावना व्यक्त केल्यात अप्रतिमच 👌👌👌👌👌👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐⭐👍👍👍👍✍️✍️✍️✍️💐💐💐💐💐🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  5. तुमच्या रचनेने चहाची गोडी वाढविली सर
    खुप सुंदर

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...