मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

लाल बहादूर शास्त्री एक दृष्टिक्षेप


 हिन्दी चित्रपट सृष्टीतील भारतकुमार म्हणजेच" मनोजकुमार " ने" जय जवान व जय किसान " हा नारा लावुन" उपकार " चित्रपट बनवला.  तसेच भारताचे पुवॅ प्रधानमंत्री स्व. लालबहादूर शास्त्री यांनी सुद्धा "जयजवान आणि जयकिसान" हा नारा लावला. त्यांना प्रेरित होऊन ही कविता  गीतासारखी वाचावी...!


"जय जवान जय किसान "

________🌾🌿👷_____


काळी आई ! ओ काळी आई!!

तुझ्या काळजातुनि तिफन चाले

काळीज माझे हाले....

काळी आई!ओ काळी आई..!!


तुझ्याच माथ्यावरुनि उगवे सुयाॅचा टिळा

सुई सुई आवाज करुनि वाहे वारा हा खुळा!!


मातेला रक्षया उभा सैनिक रात्रंदिन देई पहारा

गोळ्या झेलुनि छातीवरी सोसल्या शत्रुचामारा


तिफन चालते मातीतुनि धन्य झाली ती माता

काळ्या आईचे कजॅ फेडुनि उंच झाला माथा


फुटले पाय पडल्या भेगा सांडले त्याचे रक्त

भेगावरती माती लाविली जणु माईचा भक्त


जन्मदात्री आई बोलली कुस माझी अजुनि

फुलु दे.. पुन्हा  उदरातुनि किसान जन्मु दे.

या लक्ष्मी जन्मुदे ..!! 


भाकर भेटली, भाजी भेटली, कडधान्ये भेटले

काळ्या मातीत मेघ बरसुनि लक्ष्मीच्या गळ्यातले माझ्या मोती भेटले...!!

तरीही या काळ्या मातीला मी दुर लोटले....!!


🌳🌿🌾🍃🍁🌹🌸🍀🌱🌵🌴🌳

काळीज फाटते रक्त आटते सनकतो माथा

पहिल्या थॆंबात बी टाकले तरी पिक ना उरे आता. .!!


लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त पुन्हा प्रकाशित ही कविता🙏🙏🙏शास्त्रीजींना अभिवादन करुया...!



मोहन सोमलकर 🙏🙏🙏🌺🌺🌺



५ टिप्पण्या:

  1. अप्रतिम रचना खूपचं सुंदर लिहिले आहे
    जय जवान जय किसान

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...