मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

दोन ध्रुव काव्यपुष्पाचे 🧲🎀🧲

My gallery 

 प्रतिलिपीवर आणि काव्यपुष्पावर मला शांत शितल मनाचे दो सजातीय धृव भेटले. ..

🧲कविता बघा...!🧲

सचिन विश्रामजी कांबळे

🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

आक्रोश या नियतीचा तो रेखाटतो

गातो गीत जीवनाचे 

सत्याची जाण तो कवितेत उतरवितो

सल तो मनाची कवितेत रेखाटतो


वाचतो मी त्याची कविता

गांभीर्य त्याच्या लेखणीचे जाणतो 

आईची प्रतिमा सदैव 

तो लेखणीत उमटवितो! 


कवितेत त्याच्या नजरेतून बघावे 

काहीतरी दुःख त्याला असावे 

पण सदा तो हास्यात संचारतो 

साहित्याची जाण खुप त्याला

सुंदर रचना रोज प्रसृत करतो


स्वभावगुण त्याचा मला आवडला

प्रश्न मला नेहमी पडला 

एवढा सुंदर मोहक शब्दसाठा 

सचिन तु रे कुठून आणला!.!


व्हावी त्याची उत्तरोत्तर अशीच प्रगती 

कधी ना खुंटावी त्याची गती 

शब्दात रेखाटली मी त्याची महती 

तो व्हावा साहित्याचा अधिपती !!


📍🧲📍🧲📍🧲📍🧲📍🧲🧲📍

सतिश खरे {मुर्तिमंत}   

शिल्पकार तो शिल्प घडवितो 

दगडातून कधी ,लाकडातुनी 

कलाकृती जीवनाची घडवितो

ऐकले मी असे की

कोणताही कलाकार हा शांत असतो.!!


शांत भाव त्याच्या मनी थांबला 

तो दुसर्‍यासाठी धावला

देव जणु तो मला पावला 

शब्दात रेखाटल्याविना नाही राहावला! 


कलाकृतीचा शिल्पकार जणु 

शिल्पी असा घडवितो 

कलाच जणु आपली साकारतो

दोन कलेचा तो आहे धनी 

कवी व शिल्पकार आहे तो


अशा या दोन मुर्ती 

कशी वर्णवु नाही मी तयाची किर्ती 

बहु प्रसिध्दी मिळावी लेखणीस तयांच्या 

कौतुकास सज्ज वरती आकाश खाली धर्ती!



🎀🕹🎀🕹🎀🕹🎀🕹🎀🕹

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

मोहन सोमलकर 



 


८ टिप्पण्या:

  1. कित्ती छान लिहिलंय सचिन आणि सतीश विषयी 👏👏
    Both are great 💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान... दोघेही आपापल्या जागी प्रतिभावंत आहेत..👍👌✍️🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  3. Sir खुपच सुंदर काय बोलू मी निःशब्द भाव झाले नेहमीच तुम्ही मला सरपाईज देता. खूप छान वाटले.

    उत्तर द्याहटवा
  4. काय बोलू सर ....निःशब्द केलं आपल्या रचनेनी...शब्द नाहीत माझ्या कडे बोलायला... इतकं सुंदर काव्य रचले आम्हा दोघांवर...नेहमीच आपण मला प्रोत्साहन देत असता...इतकं प्रेम इतकी आपुलकी ...आदर आहे मला या सर्वाचा...अगदी बारकाईने निरीक्षण केले आहे माझ्या रचनांचे...जे मला या कवितेतील एका काव्यावरून जाणवले...आईची प्रतिमा सदैव तो लेखणीत उमटवतो
    वाचून खूप छान वाटले...कारण सगळं आईमुळेच आहे...खूप खूप आभार सर आपल्या मनात आपल्या काव्यात मला जागा दिलीत हे मी कधीच विसरणार नांही 🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  5. खुप खुप छान काॅमेट दिली सचिन तु, अप्रतिम सुंदर

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...