होते ते बालपण
खेळता ,बागडता
जगत होतो जीवन !
आनंदाचा बहर होतो अंगणी
रोजच वाद व्हायचे भाऊबंधात
पण हसत ,खेळत राहायचो
मनात कटुता आणायच्या नसायचो फंदात!
चार भावंडे आणि एक बहिण
जशी पाच बोटेच आईबापाची
काळजी ते,आणि आम्ही त्यांची
करुन धुंद होती जगायची!
जणु चिमणी पाखरे आम्ही
एकाच त्या कल्पतरु वरी बसायची
याची त्याची गंमत करत
एकाच अंथुरणी निजायची.!
किती बखाण करु
त्या जगलेल्या सुंदर आयुष्याचे
ते पर्व संपले ,सर्व मोठे झाले
ते पुस्तक जतन केले मी जीवनाचे.!
बहिण छोटीशी माझी होती
छोट्या वेण्या टाकुन, आई रेबिन बांधुन द्यायची
लई लाडाची होती ती सर्वाची
वाद तिच्याशी घालण्यात किती मजा यायची
बंधु मोठा तो वडीलधारी
वाद कोणी त्याच्याशी नाही घालायचे!
होता जरी शिस्तबद्ध जगणारा
तरी त्याच्याविना कधीना करमायचे!
आता ते सोनायाचे दिवस गेले
वाद मिटले ते बालपणीचे,हरवले..!
आनंदाचे पक्षी कुठे उडाले
जबाबदारीच्या ओझ्याखाली ते दबत गेले.!
मोहन सोमलकर
&
परिवार
🙏🙏🙏🙏🙏😊🙏🙏
सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवाअप्रतिम लिहिलंय मोहन दा 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाधन्यवाद दा
हटवाव्वाऽ..!
उत्तर द्याहटवाखूपच छान 👌
आबा..!
🙏
खुप छान 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाअप्रतिम रचना केली दादा👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवासुंदर अप्रतिम
उत्तर द्याहटवाधन्यवाद सतिश
हटवा