तिळगुळ......एक चिंतन
तिळाच्या भेटिला गुळ यायचा
तिचा साजशृंगार मकरसंक्रांतीत दिसायचा
सारे सण आम्ही साजरे करायचो
वर्षाचा शेवटही आनंदात व्हायचा..!
सुखदुःखाचे नाते जीवनात
उनसावली सारखे वाटे
कोणा परक्यालाही वेदना झाल्या तरी
अंतःकरण अश्रुनेच आपलेच दाटे..!
आले कसे हे महामारीचे सावट
कोणी रचला असेल बरे हा कट
कोणी कोणासाठी नाही करत वटवट
आपल्याच घरी बसा ही जगण्याची उरली अट.!
आनंदाच्या सरी कधी बरे येईल
हसतमुखाने,आणि निर्भयतेने कधी आयुष्य जगु
आपलेच आयुष्य आपण कधीपर्यंत
देवाला असे आमिष दाखवुन कितीदा मागु..!
नाही कुठे जाता येत, नाही कुठे फिरता येत
एक एक दिवस सरुन वर्ष पुढे चालले
कोणते सण ,कोणते महोत्सव आहेत
सारेच कसे भारताची संस्कृतीत विसरत चालले.!
तीळात मिसळतो गुळ मग येतो खाण्यात गोडवा
अहो, पोळ्याचा,होळीचा,दिवाळीचा विसरलो पाडवा
आता ऑक्सिजन कमी पडत आहे....!
आतातरी जागे व्हा आया,बहिणीनो, बापांनो ,भावांनो पाणी अडवा.!
मोहन सोमलकर 🙏😊👍
खूप सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाखुपच छान लिहीलंत मोहन दा 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाधन्यवाद गणेश दादा
उत्तर द्याहटवामस्तच. खूप छान लिहलंत 👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लिहिलंय 👌👌👌💐💐💐💐
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👍👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवासुंदरच रचना 👌👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर
उत्तर द्याहटवाखूप छान संदेश👌👌
उत्तर द्याहटवा