धन्य धन्य त्या माता
जयजयकार त्यांचाही करा या भुवरी
वीर जवान ऐसे त्यांनी जन्म घातले.!
रुधीर त्या क्रांतिकारांचे मायभु साठी अर्पिले.!
भारतमातेला आपली खरी आई मानुनी
स्वराज्याला मानला आपला पिता
राजगुरु,सुखदेव आणि भगतसिंग देशासाठी जन्मले
एक एक क्षण आपला देशासाठी अर्पिला ऐका त्यांची गाथा!
लोक साजरी करत होते दिवाळी
विर पुत्र खेळत होते रक्ताची होळी
लोक बसले होते सुखरुप आपल्या घरी
शुरविर क्रांतीकारी झेलत होते छातीवरी गोळी.!
आज याद करा तयांची कुर्बानी
आईने तयांच्या त्याग मातृत्वाचा केला
पोटचा गोळा आपुल्या
देशावर नौछावर केला..!
धन्य धन्य त्या माता
त्यांच्याही देशाने सन्मान करावा
राजगुरु, सुखदेव व भगतसिंगासारखे थोर पुत्र दिले
रक्त जयांचे मायभूसाठी सांडले, त्यांचा जयघोष करावा!
लावा जयहिंद चे नारे
शहिदांना त्या, विभुतींना त्या द्या आदरांजली
सदा माथ्यावरी कफन बांधुन निघायचे जे
अशा थोर वीरपुत्रांना अर्पित करा सुमनांची अंजली.!
जबतक सुरज चाॅद रहेगा.!
राजगुरु,भगतसिंग, सुखदेव, खुदीराम बोस, मदनलाल धिंग्रा, बटुकेश्वर दत्त,चंद्रशेखर आझाद तेरा नाम रहेगा...!
🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩
मोहन सोमलकर
🙏🙏🙏जयहिंद 🙏🙏🙏

जय हिंद खूपच सुंदर अप्रतिम लेख
उत्तर द्याहटवाखूप छान कविता
उत्तर द्याहटवाखूपच छान 👌
उत्तर द्याहटवाबलिदान शहिदांचे वाया नाही गेले
आदरांजली अर्पण
🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा
🙏
अप्रतिम लेख 👌👌👌
उत्तर द्याहटवा