आजीने माझ्या नातवंडाचे बालपण खुप जपले. नातु, पणतुंचे बालपण जपले, अशा आवडत्या व्यक्तीवर मी स्त्रीची यातना ही प्रतिलिपीवर ३५ भागाची कथा लिहिली .
आता ही कविता तिच्यावर□□□□□□
आजी•••••••••।
हाताचा झोपाळा बनवुन झुलवायची
जुनी लोकगिते गाऊन झोपवायची
खांद्यावरी आपल्या ती निजवायची
कधीच नाही ती या कामात कंटाळा करायची
हृदयात तिच्या नातवंडाप्रती स्नेह दरवाळयचा
कधीच नाही ती मनाने व तनाने थकली
घास आम्हास भरविल्या विना नाही ती झोपली
सदा तिची धावपळ आमच्याप्रती असायची
कधी कडेवरी,कधी खांद्यावरी घेऊन
भर मुसळधार पाऊसात स्वतः ओली होऊन
आम्हाला पदरात झाकुन आणायची.!
उन्हात ती तापायची,पायात वाहने नसायची
मोठी झाली नातवंडे ,तरी बिचारी कुठे
शांततेने झोपायची
ती तर सतत चिंताच करायची..!
आता ,आजी नव्वदी पार करुन खाटेच्या स्वाधीन झाली..!
मेहनत, कष्ट करणारी माझी आजी
चटणी भाकर खाणारी
रोजच दहा किलोमीटर पायी चालणारी
पाय लुगड्यात अडकुन रात्री पडली
ती आता बेडवरचीच कायमची झाली..!
आता कोण तिच्याशी बोलणार
कोण तिला खेळवणार
तिच्याशी कोण गप्पा गोष्टी करणार
सवॅच आहे कामात बिझी
पण बिचारी ती अजुनही थकली नाही
कणखर आहे बोलण्यात , सुदृढ आहे विचारात
ती तरी वाकणार नाही..!
आहे आवडती ती......,!
म्हणते मी अशीच मरणार..!
पायाचे आॅपरेशन नाही करणार..!
मोहन सोमलकर
🙏🙏🙏🙏🙏
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.