मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शुक्रवार, १० जून, २०२२

आतुरता पावसाची

 


तापला जरी उन्हाळा

दिवसभर उन्हात घाम गाळत होती

रखरखत्या उन्हातही ती मेहनतीने अंग झिझवत 

पाठिला तान्हुन्याला बांधुन विटा उचलत होती !


दिवसभर आमच्याही अंगाहुन उन निघुन जाये 

जबरदस्ती नाही प्रेम हर ऋतुवर प्रेम आनंदाने केले

उन्हात अंग तापवुन खुप 

खिशात दोन पैसे आम्ही कष्टाने जमा केले.!


दिवसभर दमुन आलो की घरी

अंगणातल्या त्या चिंचेच्या,वडाच्या, कडुलिंबाची छाया

सुखाऊन गार गार ती हवा 

वाटे जणु आहेच आमच्या आईची माया.!


खुप होती प्रत्येकाच्या अंगणी मोठमोठी झाडे

बसायचे ओसरीवर सायंकाळी सारे लहान मोठे

असायच्या बाया भाभड्या अन पोरे सोरे 

गोष्टी माथा चालायच्या  गार वार्यासाठी होती वृक्ष डौलदार मोठे.


गेला तो काळ आता

तोडल्या गेली ती वयस्क झाडे 

सिमेंट काँक्रिट ची जंगले जिथे तिथे दिसे 

श्वास गुदमरल्या जाई आता वाटे वेडेपिसे 


तो काळ दुसरा होता

हा काळ दुसरा आहे


मोहन सोमलकर

२ टिप्पण्या:

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...