मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शनिवार, ५ जुलै, २०२५

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझे माहेर पंढरी चला पंढरीला।। विठ्ठलाला पाहु॥ भक्तीभाव वाहु॥ पांडुरंगा॥१॥ आषाढी कार्तिकी॥ भक्त होई गोळा॥ रम्य तो सोहळा॥ पंढरीत ॥२॥ चंद्रभागे तीरी॥ भेटे वारकरी॥ किती टाळकरी॥ दिसे तिथे॥३॥ वैष्णवांचा मेळा॥ आगळा वेगळा॥ सुखावला डोळा॥ पाहुनिया॥४॥ युगे अठ्ठावीस ॥ उभे विटेवरी॥ कर कटावरी॥ पांडुरंग ॥५॥ तुळशीचा हार॥ गळ्यात शोभतो॥ विठ्ठल हासतो॥ भक्तापुढे॥६॥ हाती टाळ विणा ॥ मुखात अभंग॥ भजनात दंग॥ वारकरी॥७॥ हर एक वर्षी ॥ पंढरीला जावे॥ मुख ते बघावे॥ श्रीहरीचे॥॥८॥ पाहुनिया सारे॥ वाटे मोहनाला॥ जावे दर्शनाला॥ पंढरीला॥९॥ ||रामकृष्ण हरी|| मोहन सोमलकर नागपूर 🙏

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

लळा जिव्हाळा(हायकू काव्य)

 

लळा


लळा जिव्हाळा 

लाविला दहा वेळा 

जीव ओतिला! 


मन जुळले 

प्रेम मला कळले 

मनी फुलले! 


जशी फुलावी

देठावर ती कळी 

छान पाकळी! 


तशी प्रितीची 

फुले ती बहरली 

मनी रुजली..!


मोहन सोमलकर नागपूर

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

आली आली गौराई

 आली आली गौराई

सोनपावलांनी आली घरा!

माय गॅलरी

पुजनाची करा घाई

सुशोभित करा परिसर सारा!


हाती चुडा, पायी तोडा 

नाकी मोत्याची नथ 

पैजणांचा नाद कानी 

जेष्ठ गौरीचा अंगणी रथ!


आली महालक्ष्मी भक्ताघरी

सडा,रांगोळी घालू ,करु रोषणाई 

उत्साह नवा पावित्राच्याघेऊन

प्रकटली मंगलदिनी गौराई!


जेष्ठ गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मोहन सोमलकर नागपूर 🙏🌷

मंगळवार, ११ जुलै, २०२३

हायकू रचना पोटाची भूक

 

गॅलरी

पोटची भुक 

काय होती ग चुक 

सांगना माझी.!


कठपुतली 

तारेवरची झाली 

उभी राहिली.!


खेळ दाखवी 

जगाला जीवनाचा 

वेळ ही यावी.!


नित्यक्रम हा

माझा मग चालतो

जीव धोक्यात! 


हायकु रचना


मोहन सोमलकर नागपुर

रविवार, ९ जुलै, २०२३

हायकु काव्य

 जीवन सुंदर आहे(हायकू)


जीवन छान 

करुया त्याचा मान 

आनंदी राहु!




सुखाची सर

जीवनात बहर

आणुया चला.!


उघडा दार

आपुल्या ह्या मनाचे!

गाऊया सुर.!


सुखाची छत्री 

अंगावर धरुया 

आनंदी यात्री.!


मोहन सोमलकर नागपुर 

शनिवार, ८ जुलै, २०२३

निरजा काव्य( स्पर्श तुझा)

 


निरजा काव्य 

विषय:- स्पर्श तुझा


आज होईल ओलेचिंब 

स्पर्शून थेंबाना 

पाऊस 

रस्त्यावर 

चालु सतत 

पडत आहे थेंब 


मोहन सोमलकर नागपुर

शनिवार, ३ जून, २०२३

वटसावित्री पुजा

 


संसारीक जबाबदारीचं लेणं 

माथ्यावर लेवून 

कुटूंबासाठी महादेवाला 

नित्य सुखाचे मागणे मागते!

येते ती परक्या घरुन पण

कुटूंबासाठी आयुष्यभर जगते!

आवडीनिवडी घरच्या सगळ्यांच्या जपते!


पती कसाही असो.!

तिचे आयुष्यभर छळ करणारा असो.!

पतिव्रता आयुष्यभर राहुन 

आयुष्यभर पतीसाठी महादेवाला त्याच्यासाठी

सुख,समृद्धी मागण्याची काम करते.

अखंड सौभाग्य लाभावे म्हणून दरवर्षीच 

वटपौर्णिमेला 

वटवृक्षाची पुजा करुन 

पतीसाठी ती उपवास ठेवते.

खरच स्त्रीसारखी पुजक कोणी नाही

म्हणून तिला देवीचा अवतार 

व जननी म्हटल्या जाते.!


वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा.!


मोहन सोमलकर नागपुर

बुधवार, ३१ मे, २०२३

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती

 
My gallary

शब्दशिल्प समुह आयोजित 
#-पुण्यश्लोक 'अहिल्याबाई -होळकर -जयंती -उपक्रम 
दिनांक:- ३१\०५\२३
वार:- बुधवार 
 
पराक्रमी घराण्यात जन्मली
शुरविर घराण्याची सुन झाली
इतिहास करतो प्रणाम या मातेला
अखंड भारतवर्षात अशी वंदनीय स्त्री जन्मली!
माहेराचे नाव राखले
कर्तृत्वाने मोठी झाली..!
चला आज साजरी करुया २९८ वी जयंती
माता अहिल्याबाई या भुमीला लाभली!
चला गुणगौरव करुया
लेखणीतुन मानवंदना देऊया!
इंदुर घराण्याची धुरा पुढे नेली
अशा वीरांगनेला प्रणाम करुया!
धार्मिक धरोवर त्यांनी जतन केली
संपूर्ण भारत भ्रमणात मंदिरे बांधली!
सन्मान सनातन धर्माचा केला
इतिहासात देवी अहिल्याबाई होळकर अजरामर झाली!
अहिल्याबाई होळकरांच्या नावावर 
किती साहित्य निर्मिती झाली.!
कर्तबगार देवीचे चरित्र रेखाटून
लेखणी लेखकांची पुण्यवान झाली..!
मोहन सोमलकर नागपुर 

बुधवार, २९ मार्च, २०२३

वर्तमानपत्र

 अलक ( वर्तमानपत्र)

My gallary


जशी दिवसाची सुरवात वर्तमानपत्र वाचल्याने होत होती.

तशीच त्याची  दिवसाची सुरुवात वर्तमानपत्र वाटण्याने रोज व्हायची.

त्याच्या हाताने वर्तमानपत्र हाती पडुन वाचण्याची सवय चाळीतील प्रत्येकालाच लागली होती. आज मात्र वर्तमानपत्र आले नाही.

पण तो  या जगात आज राहिला नाही. याची बातमी सगळ्यांनाच कळली. मनाला हुरहुर लागणारी ती बातमी होती.


अलककार:- मोहन सोमलकर नागपुर

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

धैरवीर

 


धैर्य टिकुन ठेवणे

नसते येर्यागबाड्याचे काम
धैर्याने संकटाला सामोरे जाई
त्या धैर्यवंताला करावा साष्टांग प्रणाम!

मोहन सोमलकर नागपुर 🌷🌷🌷

मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

कातरवेळ

 कातरवेळ 


My galary 

संपली होती दुपार 

सांज नभी प्रकटली 

आकाशी उडती पाखरे

रांग पाखराची मोहक वाटली!


धुळ उडवित गाई निघाल्या

आल्या गोठ्यात खुंट्यावरी 

गजबजून अंगणात त्या 

उभ्या राहिल्या सांज प्रहरी 


पोरे पाठीवरी पुस्तकाचे ओझे 

घेऊन घराकडे वळले 

रमतगमत सारे मस्ती करत 

मधुर किलबिलाट करित आले. 


देवालयात वाजती घंटा 

प्रार्थनेत आबालवृद्ध तल्लीन झाले

घरी परतले बिचारे शेतकरी 

लोटाभर पाणी पिऊन बसले! 


मोहन सोमलकर नागपुर

रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

वाढदिवस ( अमनी,अबिर,अमायरा)

 वाढदिवस 

My gallary


झाला अमनी, अमायरा, अबिरच्या नावाचा उद्घोष 

द्याव्यात सर्वानी तिघांना शुभेच्छा 

कवितुन रिता करावा आपला शब्दकोष! 


हे तिन रंजुजीचे नातवंड 

खुप हुशार तेवढेच आहे बंड 

इंग्लिश मधे पोपटासारखे बोलुन 

हसवि लोकांना, आयुष्य मिळावे उदंड 


आशेचे दिप दारी उजळले 

 परुळकर कुटुंबात त्रिदेव आले

उदय झाला होता नुसता आनंदाचा

प्रितिची फुले सुहास रंजकतेचा घेऊन उगवले! 


अमेय- आशा भाग्योदय रेषा

उजळली होती त्यांची! 

मनिषा पुर्ण झाली होती

कळी अंगणी फुलली होती हास्याची !


तीन पुत्र जन्म घेण्याचा

हा दुर्दम्य योग कसा चालुन आला

त्या विधात्यानेही योग्य वेळेस 

जल्लोषाचा ऋतु योग्य ठिकाणी फुलविला!



वाढदिवसानिमित्त अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा


मोहन सोमलकर नागपुर 🍫🍫🍫🎂🎂🎂🎂

बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

अभंग ( आई)

 


जन्मदात्री आई॥  जगात आणले॥

पाऊल ठेविले॥ जन्मुनमी॥१॥


नाळ नात्यातील ॥ तुझी जुळलेली॥

तु कधी कळली ॥ पाडसाला॥२॥


वात्सल्य जिव्हाळा॥ तुझा कळकळा॥

सोसला उन्हाळा॥ आईतुच ॥३॥


डोळ्यात दिसावे॥ प्रेमाचे बघावे॥

मायाळु देखावे ॥ आईतुझ्या ॥४॥


कधी ना रागवे ॥ मनात जागवे॥

शिखर गाठावे॥ तुझ्यामुळे॥५॥


श्वासांचा सहारा॥ रात्रीचा पहारा॥

प्रितीचा फवारा ॥ तुझा होता॥६॥


रागावले तुला॥ शांतच राहिली॥

मौनपणे दिली॥ कबुली तु॥७॥


मोहन सोमलकर नागपुर

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

सरली दिवाळी


 झाली दिवाळी 

सरला सारा फराळ 

पाच दिवसाची दिवाळी 

एक महिनाभर वाटे गेला तो काळ! 


आता तुम्हास मी काय सांगु 

फक्त एक दिवस असते दिवाळी 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ती वाटे

पैश्याच्या या खेळात माणुस पडतो बळी! 


आपल्या इच्छांना दुर ठेवावे लागते

कुटुंबाच्या स्वप्नासाठी झोपावे लागते 

इच्छापूर्ती त्यांची करावे वेळोवेळी 

आपली स्वप्ने तुडवावे लागते पायदळी! 


सण हा ऐक्याचा 

आहे नात्यात रुजण्याचा 

नाते मनामनात जपावे प्रत्येक  वेळी 

जसे जपतो आपण फुलाची पाकळी! 


मोहन सोमलकर नागपुरझाली दिवाळी 

सरला सारा फराळ 

पाच दिवसाची दिवाळी 

एक महिनाभर वाटे गेला तो काळ! 


आता तुम्हास मी काय सांगु 

फक्त एक दिवस असते दिवाळी 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ती वाटे

पैश्याच्या या खेळात माणुस पडतो बळी! 


आपल्या इच्छांना दुर ठेवावे लागते

कुटुंबाच्या स्वप्नासाठी झोपावे लागते 

इच्छापूर्ती त्यांची करावे वेळोवेळी 

आपली स्वप्ने तुडवावे लागते पायदळी! 


सण हा ऐक्याचा 

आहे नात्यात रुजण्याचा 

नाते मनामनात जपावे प्रत्येक वेळी 

जसे जपतो आपण फुलाची पाकळी! 


मोहन सोमलकर नागपुर

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

शितल वारे


 हवेत आता गारवा पसरलाय 

थंडी आता डोकावून मान वर करत आहे.!

या थंडगार वातावरण पहाटेचे शितल वारे

अजुन मनाला थंडगार करित आहे...!


मोहन सोमलकर 

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०२२

पहाट


 पहाट कोवळ्या किरणांनी प्रकटली

आनंदाचे शितल वारे वाहु लागले

लक्ष्मीची पाऊले कालच अंगणी उमटली

सारेच कसे आनंदाने नाचु लागले..!


मोहन सोमलकर 

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०२२

शुभ दिपावली🪔🪔🪔

 


तेजाचा दिपक लावु घरी

महालक्ष्मीला वंदन चला करु या

ओवाळून पंचारती 

नैवेद्य समाधाने गोडधोड पक्वानाचा 

दाखवु चला..!


मोहन सोमलकर 🪔🪔🙏


रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

जीवन दर्शन


  •  जन्म मानवाचा॥ मानतो आभार॥
  • झाले उपकार ॥ तुझे देवा॥१॥

  • आईच्या मी पोटी॥ घेतला तो श्वास ॥
  • भेटला तो वास॥ जीवनात ॥२॥

  • बालपण गेले॥ पाळण्यात खेळे॥
  • आजीकडे वळे॥ नजर ती॥३॥

  • लाडात वाढलो॥ आयुष्यी घडलो॥
  • शिक्षण शिकलो॥ संस्काराचे॥४॥

  • आईच शिकवी ॥ जीवन अध्याय ॥
  • जीवन स्वाध्याय ॥ युवा असे ॥५॥

  • पार पंचविशी ॥ होती मी केली॥
  • तिच कामी आली॥ शिकवण ॥६॥

  • बाबा ते धोरणी ॥ कडक शिश्तीचे ॥

  • करे नियमाचे ॥ पालन ते ॥७॥


  • जीवन अध्याय ॥ जीवन उपाय ॥
  • असते ते काय ॥ शिकविले॥८॥

  • मोहन सोमलकर नागपुर 


अभंग ( जीवनाचा अध्याय)


लाडात वाढलो॥ आयुष्यी घडलो॥
शिक्षण शिकलो॥ संस्काराचे॥४॥

आईच शिकवी ॥ जीवन अध्याय ॥
जीवन स्वाध्याय ॥ युवा असे ॥५॥

पार पंचविशी ॥ होती मी केली॥
तिच कामी आली॥ शिकवण ॥६॥

बाबा ते धोरणी ॥ कडक शिश्तीचे ॥
करे नियमाचे ॥ पालन ते ॥७॥

जीवन अध्याय ॥ जीवन उपाय ॥
असते ते काय ॥ शिकविले॥८॥

मोहन सोमलकर नागपुर 

सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

शिक्षणदिन

 शिक्षक दिन 



एकच होती लेखणी

एकच पाटी असायची 

गिरवुनी क,ख,ग,घ

ओढ लावे बाई शिकायची! 


बाई नसे ती मज 

आईच वाटत होती

सोडुन आई दारात

बाईच कवेत घेत होती.!


बापु- बेटा करुनि 

बाराखडी, आकडे ओळख शिकवायची

मधल्या सुट्टीत मग 

उपमा ,रवा खाऊ घालायची! 


एकदा शाळेत नाव टाकले

परतनी पालक ना यायचे

शाळेची चौखट कधी ना

मग ते पाहायचे..!


पाच रु. पासुन तर

पाचशे रु. च्या फी वर

आम्ही सारे शाळा शिकलो 

शाळेच्या त्या बाई व सरांपासुन 

जीवनाचे गणित शिकलो.!


कसले काय दप्तर होते

वह्या आणि पुस्तके नशीबाचे 

सारे खेळ होते.!

बसायला बेंच नव्हते

खाली फाटलेल्या चटईचे राज्य होते


वाचुनिया" श्यामची आई"

सानेगुरुजीला जाणलो 

आईचे प्रेम आम्ही 

आमच्या बाईतही पाहत राहिलो. 


आजारी कधी पडता

होमवर्क सारा घरी मिळायचा

काऊन नाही आला माझा 

विद्यार्थी म्हणून मास्तर माझा घरी यायचा.!


शिक्षकांप्रति आदर होता 

दरारा बिना मारल्याने होता

वर्गात आले सर मग 

चिडचुप सारा वर्ग होता.!


शाळा आमची ती

दुसरे आमचे घरच वाटे

परिक्षा वार्षिक होता

काढतांनी शाळेतुन पाय

अंतःकरण मग दाटे.!


आता मात्र शिक्षण प्रणाली बदलली

शिक्षण झाले अवघड आणि महाग 

आताच्या शिक्षक व शिक्षिकांना 

विद्यार्थ्यांना शिकविता शिकविता येतो वैताग 


घर आणि शाळा सांभळता 

शिक्षक बिचारे वैतागले

स्पर्धेच्या या युगात 

शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे बारा आहे वाजले.!


तरी बिचारे आजचे शिक्षक व विद्यार्थी 

करे शिक्षणासाठी तारेवरची कसरत.!

सकाळपासून संध्याकाळपर्यंत 

अभ्यासाचा त्यांचा पाढा नाही सरत.!



शिक्षणप्रणाली व शिक्षणसंस्था व्यापार व स्पर्धा झाली आहे.यात मरण विद्यार्थ्यांचे झाले आहे..!



शिक्षकदिनाच्या आधुनिक शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा


मोहन सोमलकर 🙏🏻🙏🏻🙏🏻💐👏🏻

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...