मोहन सोमलकर
शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१
चारोळितुन
मैत्रीचं नातं
![]() |
| Friendship |
मैत्रीचे नाते हे जगावेगळे नाते असते. मैत्रीला कोणतीच सिमा नाही. नाही कोणत्या मर्यादा. .......कुणाच्या मनावर अधिराज्य करायचे आहे तर मैत्री हेच एकमेव नात असते....
मैत्री कुणासोबतही करता येते .असे म्हणण्यापेक्षा होऊन जाते अचानक ती मैत्री. एकमेकांना एकमेकांची मन वाचता आली की मैत्री होते.... नात्याची लोक जीवनात साथ निभवणार नाही ते सच्चे मित्र निभवतात.
घासातला घास देणारे, अडचणी च्या वेळेस मदत करणारे ते मित्रच असतात. आयुष्यात लहानपणी मित्रांसोबत घालवलेल्या दिवसाची व त्या क्षणांची आपण कधीच आठवण विसरु शकत नाही. ..
" दोस्ती वही होती है जिसमे कोई मतलब नही होता ."
असे अनेक माझे मित्र आहेत . शाळेतील मित्र, कॉलेजातील मित्र.. ज्यांनी मला या आयुष्यात मोठे केले. माझी साथ कधीच सोडली नाही. रक्ताच्या नात्यापेक्षा कितीतरी मोठे नाते त्यांनी माझ्याशी निभावले.
आज मला माझे जुने मित्र कितीतरी वर्षानंतर भेटले. हे मी माझे भाग्य समजतो.
किती मैत्री च नातं माझ्या साठी महत्त्वपुणॅ आहे. ते पुढिल कवितेतून बघा........
मैत्रीच नातं
माह्या बी मनी बसलं
आये लेकाचं मैत्री च नातं
जसं चमके माॅन्यामंदी
तलवारीचं पात...!
दोन ह्दयी जवळी जेव्हा येतं
म्या म्हणतो," लेकहो!तुमच का जातं..!
तिच्या ह्दयात म्या बी
खोललं आपल्या पिरतीचं खातं
आनं आता सांगा मले तुमचं का जातं..!!
मा बा... म्हणे....
आपलंच ओठ आणं आपलंच आहे दातं
आनं माह्या पोरानं पिरीयम केलत...
लेकहो...!तुमच्या बापाचं काय जातं..!!
काय सांगु मी ह्या मैत्रीच नातं
किती मैतत्र माझे हाईत
माझं हुदयच सांगेल तुम्हाले आतं
तेही लेकाचं मैत्रीचच गीत गातं...!!
जसं फिरे गंगुतेली निच जातं
जसं फिरे गंगुतेली निच जातं
तसचं माह्या या पाच फुटी दहा इंची
देहाचं आहे संमद्याशी मैत्रीचं नातं...!
ना नातं ना गोतं !फक्त मैत्रीच नातं...मानतो मी मोठं....
मानतो मी मोठं...!!
=================🙏🙏==============
आशा करतो सवाॅना आवडेल.
मोहन सोमलकर 👍🙏🙏
ads3
सातपुडा साहित्य मंच..
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
-
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...
-
महात्मा फुले राबले॥ खुप कष्ट सोसले॥ त्रासाला नाही भिले॥ कष्ट उपसले॥ दिवसरात्र जागले॥अन्यायाविरुद्ध लढले॥ पुढे सरसावले॥ दिनदलितांसाठी॥ गरिबा...
-
My gallery वाट कष्टाची चालुनि मेहनतीची कास धरुनि आम्ही श्वास इमानाने घेतो रात्रदिवस राबुनिया भाकर कष्टाची खातो.! नको हवी महाल माडी नको ...
