मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

बोल माणसातलं हरवले आहे

 वेळ आहे का बोलायला


कधी नसतो वेळ बोलायला 

जेवढा तंत्रज्ञानाचा विकास

आयुष्य गुरफटत जाते भोवती

जीवन सवाॅचे झाले भकास 


पूर्वीचे जीवन खळखळता झरा होता 

सुखदुःखात मनुष्य उभा होता

एकमेकांप्रती सलोखा होता 

प्रत्येक जण ह्दयी गोतावळा सांभाळत होता.!


आता माणुसच माणसाचा वैरी झाला.!

एकमेकातला संवाद संपला

जिथे तिथे माणुस मोबाईल मध्ये हरवला.!

नात्यात दुरावा वाढतच गेला.!


सगळेच शाॅटकटच्या मागे धावु लागले

खरे आयुष्य जगणे विसरू लागले

बोलणे एकमेकांशी टाळु लागले 

मोबाईल मध्ये तोंड खुपसुन राहु लागले.!


लग्नात,समारंभात पंक्ती उठायच्या.!

थट्टा मस्करी करित पंक्ती वाढायच्या.!

श्लोक जेवणाच्या सुरुवातीला 

मस्तपैकी मुखाने मैफिली वदवायच्या.!

चेहरे फुलावाणी बहरायच्या.!



गेली ती गमंत जमंत 

गेली सारी थट्टा मस्करी 

पारावरची मैफिल गतकाळात विलिन झाली 

ती पिढीच आता लुप्त झाली..!


 संवादाचे झाले modernisation! 

 भाऊच भावाशी बोलत नाही 

Friend request पाठवुन तो next generation चे पाळतो सारे नियम.!


पिता वयोवृद्ध ते झाले

मुलासोबत संवाद साधायला आतुरलेले 

ताटावर बसल्यावर एका हाती टि.व्हीचा रिमोट 

दुसर्‍या हाती मोबाईल धरले


बाप बिचारा केविलवाणा झाला 

बोल मनातला हरपुन गेला

जन्म दिला ज्या मुलाला 

तो विज्ञानयुगी व्यस्त झाला..!




मोहन सोमलकर 🙏🏼🙏🏼🙏🏼💐



माणुस माणसाला विसरत चालला..!


॥ जलपरीची जलक्रिडा क्षेत्रात गगनभरारी

 


॥मुली तु भांग्यवंत हो,यशवंत हो
नवनवीन किर्तीमान स्थापित कर.॥

अवघ्या सहा वर्षाची असताना ती पहिल्यांदा पाण्यात उतरली हळूहळू स्विमींगमध्ये रुची वाढत गेली पदका मागून पदके जिंकत गेली आणि थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आज तिच्याकडे तब्बल दोनशेच्या वर पदके आहे.

एका स्पर्धेत सर्वाधिक सहा पदके जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम तिने करून दाखविला.

नागपूरचे भूषण ठरलेली ही जलतरणपटू आहे ऋतुजा तळेगावकर..! वीस वर्षीय ऋतुजा ठरवुन स्पोर्ट्स मध्ये आली नाही. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये नागपुरच्या, रघुजी नगर मधील कामगार कल्याण केंद्रावर समर कॅम्प मध्ये आली असता तिला बाजूच्या स्विमिंग पूल मध्ये मुले मुली शिकत असल्याचे दिसले.

हा खेळ आवडल्याने तिने आईकडे हट्ट धरला. ऋतुजा च्या इच्छेचा मान राखत आईने तिला स्विमिंग मध्ये टाकले .आणि तिथूनच खऱ्या अर्थाने दिला मॅरेथॉन प्रवास सुरू झाला अनुभवी प्रशिक्षक संजय बाटवे पाटील यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या ऋतुजा ने अल्पावधीतच आपली गुणवत्ता सिद्ध केली शालेय व महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याचा सुरु झालेला सिलसिला आजपर्यंत कायम आहे .जवळपास बारा वर्षाच्या कारकिर्दीत ऋतुजा आणि विविध स्पर्धांमध्ये 100 सुवर्णपदकासह दोनशेच्या पदके व ट्राफिज जिंकले आहे. दोन वर्षापूर्वी जालंधर( पंजाब )येथे झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत मिळवली तीन सुवर्णा सह जिंकेलेली विक्रमी 6 पदके  तिची राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम कामगिरी ठरली. राष्ट्रीय तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात आजवरचा हा विक्रम आहे. उल्लेखनीय म्हणजे देशभरातील 68 विद्यापीठांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत ऋतुजा आणि दुसरी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळवला आहे .ऋतुजा चा प्रेरणादायी प्रवास एवढ्यावरच थांबला नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने दोनदा झेप घेतली. 2018 मध्ये इजराइल मध्ये झालेल्या वर्ल्ड जूनियर चॅम्पियनशिप व त्यानंतर 2019 मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई ओपन वाटर चॅम्पियनशिपमध्ये तिने देशाचे प्रतिनिधित्व केले .डॉक्टर आंबेडकर कॉलेजमध्ये बीकॉम ची विद्यार्थिनी असलेल्या ऋतुजा ला भविष्यात आशियाई किंवा संधी मिळाल्यास ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकवला आहे.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणे सोपी गोष्ट नाही याची तिला जाणीव आहे .मात्र स्वप्नपूर्तीसाठी मेहनतीची तिची पूर्ण तयारी आहे .तर प्रयत्नांची पराकाष्टा असेल तर कोणतेही जग जिंकता येते. आकाशात भरारी मारता येते, हे तिचे स्वप्न पूर्ण व्हावे. असे प्रत्येक नागपूरकरांना  वाटत आहे. तिच्या यशामागे तिची आई तिचे कुटुंब सर्वस्वी पाठिंबा देत आहे. आणि आम्ही नागपूरकर सुद्धा तिच्या यशाच्या मागे कौतुकाने पाठ थोपटत आहोत .

अशीच ती सदैव भरारी मारत राहो, आणि नागपूरचे व भारत देशाचे नाव उज्वल करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.!

"ऋतुजा ला अगदी पहिल्या दिवसापासून मी पाहत आलोय. तिच्यात भरपुर टॅलेंट आहे. बारा वषाॅत दोनशेच्या वर पदके जिंकून तिने हे सिध्दही करुन दाखविले आहे. तिची सिनियर गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असुन, अशीच मेहनत आणि सातत्यपूर्ण कामगिरी राहिल्यास नक्कीच तिचे स्वप्न पुणॅ होईल.

एक प्रशिक्षक... श्री. संजयजी बाटवे सर
========================
श्रीयुत संजयजी बाटवे सरांबद्दल काय सांगायचे ,ते स्वतःच अष्टपैलु व्यक्तीमत्व आहे. ते प्रशिक्षक म्हणुन या क्षेत्रात गेल्या कित्येक वर्षांपासून जगविख्यात आहे. त्यांच्या या यशाच्या मागे त्यांची सहचारिणी  व माझी शालेय मैत्रीण  सौ. कुंदा संजयजी बाटवे हिचा व दोन मुलांचा सहवास आहे.

      संजयजी बाटवे सरांची आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षक म्हणून ख्याती आहे.
रोजच त्यांच्या कार्याबद्दल महती सांगणारे लेख नागपुर व महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात प्रकाशित होतात.
       रोजच कुटूंबाच्या दुर राहुन मुलांना स्विमिंगसाठी राज्यस्तरीय,  देशव्यापी,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण देणारे संजयजीला स्वतः कितीतरी मॅडल, प्रमाणपत्र शासनाकडून मिळाला आहे.
     त्यांचा हा प्रवास असाच अविरत चालु रहावा  व ते देशाला उत्कृष्ट दर्जा चे स्विमर देत राहो. हिच ईश्वर चरणी प्राथॅना.
🙏🙏🙏🙏🌿🎊🎊🎊

संजय बाटवे...!🌱🌱🌱
(ऋतुजाचे प्रशिक्षक व माझ्या मैत्रीणीचे यजमान )🌺🌺🌺




मोहन सोमलकर 🌺🌺


ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...