मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

महात्मा गांधी जयंती

फोटो गॅलरी


नसानसात 

अजरामर माझ्या देशात 

श्वास देशाचा तो झाला

सत्य आणि अहिंसेच्या 

जोरावर तो लढला 

देशासाठी केला मीठाचा 

त्याने सत्याग्रह 

बापु तुम्हीच देशासाठी 

तरुणांचे युगप्रवर्तक झालात 

इंग्रजांना देश सोडण्याचा केला आग्रह.!

आम्ही तुमचे पाईक झालो..!

तुमच्या विचारांना नतमस्तक झालो..!



गांधी जयंतीच्या देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा.!


मोहन सोमलकर 🙏👍😊


प्रेमाचा चहा



प्रेमाचा चहा☕☕

उद्या रविवार आला
चेहरा माझा आनंदला
आजच कामाची यादी केली
एकच घोट चहाचा घेतला.!!

या सारे या चला
गप्पा गोष्टी करु चला
रोजच अवतरतो कवितेत
आज प्रेमाचा चहा घेऊ चला.!!

मोठ्या आवडीने मी चहा बनविला
साखर म्हणुनी तुमच्या कवितेची
गोडी त्या चहात मी टाकली
आपुलकी ती चहात दाटली..!!

तुम्हचे माझे नाते जुडले
आयुष्याचे क्षण मी यादीत मांडले
एकच गोड फुरकी घेऊनि
सुखाचे क्षण मी चेहर्‍यावरी जाणले.!!

नको जाऊ हा गोतावळा सोडुनि
एकमेकात मने हो रुळली
जशी चहात साखर मिसळते
नाते आपुली आता जुडली..!!

सुखदुःखाची मनी यादी केली
चहाचा कप हाती घेऊनि
सारे मज आठवतात रोज
मी तुमची नाती सजवली मनी..!

घ्या हा आपुलकीचा चहा जरा
मुखी कप लावुनि आनंदाची गोडी चाखा
आयुष्यात सदैव आठवण राहील
एक एक इथे मोलाचे,प्रत्येकाचा मान राखा !

सुप्रभात
गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.!

☕☕☕☕☕☕☕☕☕☕☕
मोहन सोमलकर 🌺🌺🌺🌺




ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...