![]() |
| From photo gallery |
जीवनात धावपळ रोजचीच ठरलेली
छोट्याश्या सुखासाठी मेहनत प्रत्येक जीवास लागलेली..!
एशोआराम जीवनाच्या संध्याकाळी भेटावे.!
सहजीवन आनंदी जावे..!
याकरता असते जीवनात धावपळ व पळापळ.!
पण खुप न धावता जीवनाचा खरा आनंद लुटावा..!
मोहन सोमलकर 🍁🌺🌺
"जय जवान जय किसान "
________🌾🌿👷_____
काळी आई ! ओ काळी आई!!
तुझ्या काळजातुनि तिफन चाले
काळीज माझे हाले....
काळी आई!ओ काळी आई..!!
तुझ्याच माथ्यावरुनि उगवे सुयाॅचा टिळा
सुई सुई आवाज करुनि वाहे वारा हा खुळा!!
मातेला रक्षया उभा सैनिक रात्रंदिन देई पहारा
गोळ्या झेलुनि छातीवरी सोसल्या शत्रुचामारा
तिफन चालते मातीतुनि धन्य झाली ती माता
काळ्या आईचे कजॅ फेडुनि उंच झाला माथा
फुटले पाय पडल्या भेगा सांडले त्याचे रक्त
भेगावरती माती लाविली जणु माईचा भक्त
जन्मदात्री आई बोलली कुस माझी अजुनि
फुलु दे.. पुन्हा उदरातुनि किसान जन्मु दे.
या लक्ष्मी जन्मुदे ..!!
भाकर भेटली, भाजी भेटली, कडधान्ये भेटले
काळ्या मातीत मेघ बरसुनि लक्ष्मीच्या गळ्यातले माझ्या मोती भेटले...!!
तरीही या काळ्या मातीला मी दुर लोटले....!!
🌳🌿🌾🍃🍁🌹🌸🍀🌱🌵🌴🌳
काळीज फाटते रक्त आटते सनकतो माथा
पहिल्या थॆंबात बी टाकले तरी पिक ना उरे आता. .!!
लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त पुन्हा प्रकाशित ही कविता🙏🙏🙏शास्त्रीजींना अभिवादन करुया...!
मोहन सोमलकर 🙏🙏🙏🌺🌺🌺
>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...