मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

अपेक्षेचा डोंगर उपेक्षित आहे

From my gallery 

अपेक्षांचा डोंगर जरी

 दुर्गम असला तरी

मेहनतीची कास धरुन 

अपेक्षेचा डोंगर चढता येतो.!

अपेक्षा असते ऊरी सर्वांच्याच दुसर्‍याकडुन.!

संकट काळी करावी कोणी मदत..!

वा सुख दुःखात द्यावी साथ..!

असते मनात भरपूर अपेक्षा...!

पण या उपेक्षित जगात 

ही अपेक्षा एखाद्याचीच होते पुरी.!

नाहीतर अपेक्षेची निभवावी लागते दुरी.!


मोहन सोमलकर 🦅🦅🦅🦅🦅🕊



जीवन रहस्य



----जीवन रहस्य------------------


*मीच फक्त चांगला आहे* 

*बाकी सगळे वाईट* 

*तुम्हीच सांगा ही भूमिका* 

*Wrong आहे का Right ?*


*स्वतःला " हिरो " ठरवतांना*

*दुसऱ्याला " व्हिलन " करू नको* 

*विनाकारण गाऱ्हाणे करत* 

*इकडून तिकडे फिरू नको* 


*पुढच्या क्षणी काय घडणार*

*कुठे कुणाला माहीत असतं* 

*विकेट कशी , कधी पडणार* 

*कुणालाही ठाऊक नसतं*


*अपॉइंटमेंट घेऊन कधी*

*यमराज घरी येतो का ?*

*गयावया केली म्हणून*

*कुणाला सोडून देतो का ?*


*यमा,तुझ्या रेड्यावर मी*

*डबलसीट बसणार नाही* 

*ठीक आहे बसू नकोस* 

*असं कधीच असणार नाही* 


*मनात असो किंवा नसो*

*यमाच्या मागे बसावंच लागतं*

*श्रीराम जयराम म्हणत म्हणत* 

*मसनवाट्यात जावंच लागतं* 


*चोवीस तासाच्या आत तुला*

*रॉकेल टाकून फुकुन देतील*

*कवटी फुटो न फुटो*

*घरी लवकर पळून जातील*


*मूर्ख माणसा,त्याच्यामुळे* 

*प्रत्येक क्षण जगून घे*

*सखी सोबत पावसा मध्ये* 

*चिंब चिंब भिजून घे*


*घर घर ,काम काम*

*चोवीस तास तेच ते* 

*इतकं सोनं , तितके पैसे*

*वेड्या माणसा सोडून दे*


*घाण्याच्या बैला जागा हो* 

*थोडी तरी मजा कर* 

*हिरव्या हिरव्या झाडा सोबत* 

*कधी तरी दोस्ती कर* 


*दशम्या , धपाटे , पिठलं ,भाकरी*

*जे जमेल ते घे*

*लसणाच्या ठेच्या सोबत*

*शेंगदाणे अन कांदा घे*


*घरात बसून कुढण्या पेक्षा* 

*टेकडी किंवा डोंगर चढ* 

*नयनरम्य निसर्गाच्या* 

*गळ्या मध्ये जाऊन पड*


*गंभीर चेहरा केला म्हणून* 

*समस्या कधी सुटतात का ?*

*कुठलीच मजा न करता* 

*येड्या,डोळे मिटतात का ?*


*चल उठ बॅग भर* 

*फुकट गाऱ्हाणे करू नको* 

*विनाकारण रोज रोज*

*थोडं थोडं मरू नको*

———————————-

🙏🏻🙏🏻मोहन सोमलकर 🌺🍁


ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...