म महान कायदेपंडित तुम्ही या जगाचेहा हालअपेष्टा केल्या सहन तुम्ही देशा साठी
मा मायभूमीच्या हितासाठी आयुष्यभर लढले
न नम्रतेने सगळ्या जगात हक्काने वावरले तुम्ही
व वणवा जागृकतेचा मनामनात पेटविला बाबा तु.
बा बांधिलकी हा गुण तुमच्या नसानसात होता बाबा
बा बाबा तुम्ही दिनदलिताचे झाले ,कैवारी गोरगरीबाचे
सा साथ दिनदलितांना देऊन शिक्षणाचा मार्ग दाखविला !
हे हे कार्य सगळ्यास नाही जमले , हे कार्य तुम्हीच केले
ब बर्याच गोष्टींवर तुम्ही न्यायाची बाजु मांडली होती !
आं आंबेडकर नावाची प्रकाशज्योत सार्या देशाला मिळाली.
बे बेड्या त्या अशिक्षिततेच्या, गुलामगिरीच्या नष्ट केल्या.
ड डगमगले नाही कधी त्या इंग्रजांना पाहुन ,लढत राहिले
क कतॅव्य पार पाडित देशाचा विकास केला , माहामानवाने
र रचला इतिहास अद्भुत, अदभुत, ,सलाम या महमानवास.
भारतरत्न, कायदेपंडित, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकारण अभ्यासू,दलितांचा कैवारी,वंदनिय डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६ व्या महापरीनिवाॅण दिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏
🌐जय डाॅ.भिमराव बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏🌐
मोहन सोमलकर