मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

फुलाची गळती ,काट्याची फळती

 

काटा पायात रुतला तर चालेल

मनात काटा नका ठेऊ


काट्याची सल ह्दयावरी नका कोरु

हर्षाचे तुषार जीवनात उडवा..!


जीवन मानवाचे एकदा मिळाले

सार्थकी या जीवनाला लावा 

मनी गुलाब स्नेहाचे फुलु द्या 

मोहक नात्याची गुंफण मनी रुजवा


गुलाब लाल फांदीवरी फुलतो

टवटवीत त्यांची सुदंरता पाहुन 

रुतला जरी काटा बोटास 

वेदना घेतो आपण शमवुन.!


कुणाचे तरी श्वास तुम्ही

रुतलेला पायातला काटा दुर करा

सुड मनातला काटा काढुन काढु नका

काटा दुःखाचा बोचेल असे विचार नका करा..!


सुंदर दिसणार्‍या कळ्या,पाकळ्या,पाने फुले गळे

आठवण तयांचीही करत रहा.!

ते आधारस्तंभ असती आनंदाचे 

न्याय त्याच्याशीही करत रहा...!






मोहन सोमलकर 


मनातलं वादळ(असह्य)


 

मनातलं वादळ(असह्य )



माझ्या  मनात हा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो.जेव्हा जेव्हा मी या समाजाच माझ्या  दृष्टीकोनातून आकलन करित असतो की, का? पिढी दर पिढी  स्त्री चा रुढी, परंपरा ,रितीरिवाज व वासना पोटी...... नुसता वापर होत असतो.
         का? तिच्या वर असे अन्याय,  अत्याचार होत असते.
का?ती रुढी परंपरेच्या  बेडी मध्ये लटकली जाते.
        या निमाॅण होणाऱ्या मनातील वादळाला मी किती दिवस असा सहन करत राहु. किती दिवस मी शमवत बसु.......याचे उत्तर  मला मिळणार  का..?

             आयुष्य भर मी माझ्या डोळ्यासमोर एका बंदीनीला पहात होतो. लक्ष्मीची पाऊले घेऊन ती त्याच्या सोबत घरात आली होती. ती अखंड आयुष्य लक्ष्मीच बनुन राहीली. पण त्याला नारायण होता आले नाही.  पहीले एक वषॅ सौख्य्याचे आणि समॄध्दी व प्रेमाचे गेले. पहीली मुलगी झाली......! त्यानंतर मुलगाही झाला. पण त्रास देणे त्या माऊलीला त्या राक्षसाचे सुरु झाले. शिकलेली होती ती, नर्सिग चे ट्रेनिंग केले होते. पण एक भारतीय स्त्री होती. आपल्या नवर्‍याचा जाच सहन करणारी एक बंदीनी होती. रोज सकाळी तो टिफीन घेऊन  कतॅव्यावर जायचा. तिकडून येता येता पोटात दारु ढोकुन राक्षस बनुन यायचा.
       असेच आयुष्य  रोजचे जगत गेला. कंटाळून कंटाळून तिही त्याच्याशी ते आयुष्य जगत गेली. मुले थोडी मोठी झाली . असेल मुलगी ७ वषाॅची आणि  मुलगा चार वर्षांचा एक दिवस मित्रांसोबत खुप दारु पिला. आणि कुत्रा त्याला चावला.दारुचे व कुत्र्याच्या चावण्याचे जहर झाले आणि  जीवनाचा सारा बोझा टाकुन तो हे तिचे आणि त्याचे जग सोडुन गेला.
       माऊली दोन पोटच्या बछड्याला घेऊन एकाकी झाली. कबंरेला पकडुन माझ्या आसंव्याच्या ओघाने दु:ख आपले स्त्रवतच राहीली.
      जीवनाचा गाडा ती आता एकटी खेचत होती. लक्ष्मीची पाऊले बाहेरच्या जगात पडली. मुलामुलींचे पालनपोषण होते, शिक्षण होते. दोन चिमुकल्यांसाठी ती आयुष्य भर रणरागिनी झाली आयुष्यात मुलांना एवढे लाड केले की,आयुष्याआरामाची जिन्दगी देऊन स्वत.  एका बंदिनीचे जीवन जगली. दिवसभर बाहेर काम करायची (अनुकंपावर नवर्याची ड्युटी माझ्या  वडीलांनी मिळुन दिली होती.)आणि घरी आली की , घरचे काम...!. मुले मोठी झाली होती. त्यांना पैशाची ना कधी झळ ना दुखाची कळकळ तिने कधी पोहचु दिली नाही. मुलगी शिकुन सवरुन डिग्री मिळवुन  लग्नाच्या मंडपात उभी राहीली. नशिबाने निरव्यसनी राजकुमार जबलपूरचा राहणारा. उच्चन्यायलयात ग्रंथपाल होता मुलगा  देखणा निरव्यसनी मिळाला.
       माऊली सुखावली मुलगी सुखावली. आयुष्यात पुन्हा डोळे तिचे तुडुंब हसु लागले.पण त्या हसण्यावर पुन्हा काळाने विरजन पाडले.
       मुलगा तिचा दारूच्या व्यसनी लागला.
काही दिवस असेच गेले त्याचेही लग्न झाले. त्याला मुलगा चांगला राहिला. मुलगा तीन वर्षांचा झाला . माऊलीचा मुलगा मात्र  पाण्यासारखा दारु पिऊ लागला. माऊलीचा पैसा होता हवेत उडवु लागला.
       एक दिवस माऊली नौकरीतुन निवॄत झाली. पाय तिचे थकले होते. डोके आणि  मन मुलाने थकवले. कष्टाची भाकर मिळवता मिळवता पार ती चंदनासमान झिजली होती. पोटच्या गोळ्याला जपण्यासाठी व आधार देण्यासाठी जीवन तिचे असेच संपले. पोटचा गोळा मात्र दारूच्या घोटात आयुष्य संपवायला लागला होता. तरुण रक्त होत. जोश होता बाहुबलात वादळालाही शमवण्याची ताकत त्याच्या मनगटात होती. पण नियतीने हे काय केले. त्याच्या हातात विषाचा प्याला घट्ट केला. जो व्हावा आधार तिच्या पायाखाली आपल्या  अंगाचे कातड काटा न रुतावा म्हणुन बिछवावा तर.......तिचा जीव तोडू लागला तो पैश्यासाठी तिच्या अंगावर हात टाकु लागला.
मनात माझ्या  खुप वादळ पेटले हे पाहुन. ...!!
        जिने त्या वंशाच्या  दिव्या साठी नऊ महिन्याचा काळ नऊ वषाॅगत सोसला....आपल्या  पोटाचा तिने बनविला होता घोसला...!तोच तिच्या जीवावर उठला.
           असा दिवा असण्यापेक्षा तिने अंधारच बरा असा विचार केला. तिचे होत असलेले हाल बघवेना ते पाहुनच मनात वादळ पेटत होते.
        खुप त्याला आम्ही  समजविले. प्रेमाने, रागावुन , दोन चपका गालावर मारुन कधी चिडुन कधी लहान असुनही त्याला हात जोडुन. ..🙏🙏🙏 पण तो मानेना. माऊलीला त्रास देणे त्याचे चालुच होते. पैसे नाही दिले तर मारणेही चालुच होते. होते नव्हते सवॅच लाड ती वंश्याच्या दिव्याचे पुरे करत गेली. त्याच्या दिलेल्या यातनाची जखम मनावर झेलतच गेली. सवाॅच्या मनात तिच्या प्रती खुप मोठे वादळ पेटले.
      एक दिवस सुधारगृहात त्याला टाकण्यासाठी  आम्ही  फोन केला. गाडी आली. चार माणसे पकडुन  त्याला गाडित टाकणार.....तेवढ्यात माऊली आणि त्याची बायको  आडवी झाली. माऊली म्हणे," कितीही त्रास दिला तरी तो, माझा पोटचा गोळा आहे, माझ्या नजरेसमोरच राहु द्या त्याला. त्याचे तिथे हाल होईल. मला रोज त्याला भेटता येणार नाही.
        ..अशातच झोपलेला तो पटकन उठुन संधी साधुन घरातुन पळुन गेला. सुधारगृह वाले रिकाम्या हातानी परत गेले. येण्याजाण्याचा खचॅ त्यांना द्यावा लागला.
        पुत्र कुपुत्र होऊ शकतो. पण माता कुमाता होऊ शकत नाही.  ती त्याच्या सहन करत राहाते मनात तिच्या  वादळ पेटुनही......पुत्र मोहापायी ते क्षमुन जाते...............

     धन्य ती माता धन्य तिचे मातॄत्व...!!!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
          मोहन सोमलकर 

©️®️ copyright @msomalkar


ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...