My gallery
आजपासून " महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परिक्षा सुरु झाल्या. सगळ्याच विद्यार्थ्यांना या परिक्षेत सुयश लाभो. व सर्व विद्यार्थी ही जीवनाची पहिली पायरी यशस्वी रित्या ओलांडून पुढे जावे ,हिच मनोकामना.!
मुलांनो घेतली तुम्ही मेहनत
अभ्यासाचे धडे डोक्यात गिरवले
रात्रदिवस त्रास घेऊनी
अभ्यासक्रम पुर्ण केले..,!
आईवडीलांचे नाव उज्वल करा
कुटुंबाचे ,गुरुजनांचे होऊन नाव रोशन
डोळ्यात आनंदाचे अश्रु येईल दाटुन
मन जाईल आनंदुन
व्यर्थ ना जावी तुमची मेहनत
दाद द्यावी लागेल ,दिसली तुमची हिम्मत
देव पहातो परिक्षा जरी
त्याचीच असते रेहमत.!
नका डगमगून जाऊ
मेहनतीची कास धरा.!
शांत चित्ताने पेपर सोडवा
झेंडा यशस्वी जीवनाचा हाती धरा..!
मुलांनी खुप मेहनत घेऊन अभ्यास केला, त्यांना आधार द्या,त्यांना शांत मनाने बल द्या, त्यांचे मनोधैर्य वाढवा, पालक हो त्यांच्या डोक्यावरुन व पाठीवरून हात फिरवा.
धन्यवाद 😊🙏
मोहन सोमलकर