मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

आबा, क्रिएटिव्ह माइंड

 आबा



झिझले चंदनासमान 

कोणते द्यावे प्रमान

परीसस्पर्श तुमचा देऊनि

लोखंडाचे तुम्ही सोने केले, तुम्ही महान

My gallery 


किती करुया तुमचे गुणगान 

आबा तुम्ही महान 

उन्हात झिझुनी

उन झेलुनी

सावली दिली तुम्ही वटवृक्षा समान


किती करावे तुमचे गुणगान 

काव्यपुष्पाचे जनक तुम्ही

कोणतीच तुमच्यात नाही कमी

जग जिंकण्याची दिली तुम्ही हमी


क्रिएटिव्ह माइंड

तुम्ही सनशाईन

कामात प्रत्येक फाईन

थोरवी मुखातून मी गाईन


तुम्ही सुर्या समान

प्रकाशले

किरण उजेडाचे दिले

मृगतृष्णा तुम्ही भागविली

नवी उमेद तुम्ही जागविली

तटस्थ बुरुज तुम्ही काव्यपुष्पाचे


 Copyright 

©️®️


मोहन सोमलकर 🍁🍁🍁🍁♻️🍁♻️🍁

रविवार, ३ एप्रिल, २०२२

माझा अभिमान देशाचे श्वानपथक

 

My gallery 

ते श्वानपथक मानवापेक्षाही असे बुध्दीवान
चांगल्या चांगल्या गुप्तचोरांचे वाजविले पानदान

श्वासाने आपुल्या माणसाला ओळखी
कोण खरा कोण खोटा कोणाच्या मनी आहे अडी.!

सगळे पैतत्रे तो परक्याचे जाणुन होता
इमान राखून मालकाचे पोळी त्याची खाऊन होता..!

इमान राखले घरच्या श्वानाने दारात मालक बनुनी बसे
आपला घरचा कोणी आला डोळ्यात डोळा घालुन हसे

चोर अगर वा लुटारुने घरात केला प्रवेश
तो तटरक्षक, अंगरक्षक म्हणुनि जागला..!

मला खुप अभिमान त्या प्रत्येक श्वानजातीचा
ज्याने वार आपल्या अंगावरी झेलुनी श्वानजातीला जागला.!

कित्येक शुर श्वानाची मी ऐकली थोर गाथा..!
भारताचा तिरंगाही लहरवला आसमानी चमकविला देशाचा माथा.!

मोहन सोमलकर


ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...