मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

शनिवार, १६ एप्रिल, २०२२

हनुमान जयंती

 


रामभक्त सक्त॥ जय हनुमान ॥

काय अनुमान ॥ त्यांचे करु॥


शक्तीचे देवता॥ नमन करावे॥

पुजन करावे॥ रोजरोज ॥


असे पाठिशी ते॥ आशिर्वाद मिळे॥

हनुमान ते कळे॥ चालिसातुनि॥


लक्ष्मण मुर्छित ॥ सर्वच संपले॥

आकाशी उडाले॥ बुटी आनी ॥


आणी संजिवनी॥ जय बजरंगी॥

बल तया अंगी॥ मोठे आहे॥


चराचरात ते॥ अजुनही आहे॥

श्रध्देने ते पाहे॥ भक्तास ते॥


सितेला शोधाया ॥ भरली उडान॥

नभी पलायन ॥ केले त्यांनी॥


खरे रामभक्त ॥ सळसळे रक्त॥

 पवनपुत्र सक्त॥ शत्रुसाठी॥


रोज नाम घेतो॥ म्हणतो चालिसा॥

मी अधुरा जसा॥ हनुमाना॥


हनुमाना विना॥ जीव नाही माझा॥

भक्त मीच तुझा॥ मी मोहन ॥


जयहनुमान ॥ जयश्रीराम॥

शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

चि. तुषार व चि.सौ. कां. दिव्याताई चा लग्नसोहळा

 


तुषार म्हणजे आनंदाचा कारंजा

उडत होता आनंदात व सुखात

तो मैफिल सजवायचा सदा

कधी न आला मनात कोणाप्रति अविचार


साधाभोळा तो शेतकर्याचा मुलगा

निर्मळ वाणी तयाची आहे 

तो हितसंबंध जपत आहे सदा

स्वभाव त्याचा सुंदर आहे..!


कधीही कुणास मदत करतो

मैत्रीचे नाते तो निभावत असतो

जपतो तो प्रत्येकाची मने

कारवा मैत्रीचा पुढे नेत असतो.!


आज तुषारचा वाढदिवस 

आनंद व सुखाची त्याच्या अंगणी पर्वणी 

हा लेखक कवी सदा व्यक्त व्हावा साहित्यातुन 

लेखणी आहे त्याची लई गुणी.!


वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.!

🍧🍧🍧🍧🍦🍦🍦🍦🍫🍫🍫🍫🍫🍫🍧🍧



आज १५एप्रिल तुषारचे लग्न अभिनंदन 

🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫


सजला शामियाना ॥ फुलमाळ, तोरण आंब्याचे लाविले॥

मित्र,इष्ट, आप्तेष्ट आले॥ मंदियाळी आनंदाची॥


वधुमंडपी उभे वधुवर ॥ सजले सुशोभित झाले सारे जन॥

वाजती सनई चौघडे,मयुर नाचे वन॥ सोहळा सजे रम्य॥


दिव्याताई दिव्यत्व चेहर्‍यावरी॥ घेऊनी आली॥

लक्ष्मीची पाऊले घरी टेकली ॥ जीवनी तुषाराच्या॥


ती जीवनसाथी, जीवनसंघिनी दादाची॥ मंगलमय दिनी मंगलक्षणी ॥

गेले सारे आनंदुनी॥ सोहळा पाहुनी रम्य॥


साथ सदैव जीवनात ऐकमेकाची राहो॥ हातात हात राहो॥

आनंदी मन राहो॥ सदा दोहोचे॥


डोयीवरी पडतील अक्षता॥ सनई चौघडे वाजतिल॥

मंगलमय मंगलाष्टके गुंजतिल ॥ रम्य सोहळा पार पडेल॥



खुप खुप आशिर्वाद 

चि.  तुषार व चि. सौ. का. दिव्यास

🚩🚩🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍦🍫🍦🍫🍨✡🥩🚩🚩🚩



मोहन सोमलकर व परिवार

❇❇❇©️®️❇❇

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...