तुषार म्हणजे आनंदाचा कारंजा
उडत होता आनंदात व सुखात
तो मैफिल सजवायचा सदा
कधी न आला मनात कोणाप्रति अविचार
साधाभोळा तो शेतकर्याचा मुलगा
निर्मळ वाणी तयाची आहे
तो हितसंबंध जपत आहे सदा
स्वभाव त्याचा सुंदर आहे..!
कधीही कुणास मदत करतो
मैत्रीचे नाते तो निभावत असतो
जपतो तो प्रत्येकाची मने
कारवा मैत्रीचा पुढे नेत असतो.!
आज तुषारचा वाढदिवस
आनंद व सुखाची त्याच्या अंगणी पर्वणी
हा लेखक कवी सदा व्यक्त व्हावा साहित्यातुन
लेखणी आहे त्याची लई गुणी.!
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.!
🍧🍧🍧🍧🍦🍦🍦🍦🍫🍫🍫🍫🍫🍫🍧🍧
आज १५एप्रिल तुषारचे लग्न अभिनंदन
🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
सजला शामियाना ॥ फुलमाळ, तोरण आंब्याचे लाविले॥
मित्र,इष्ट, आप्तेष्ट आले॥ मंदियाळी आनंदाची॥
वधुमंडपी उभे वधुवर ॥ सजले सुशोभित झाले सारे जन॥
वाजती सनई चौघडे,मयुर नाचे वन॥ सोहळा सजे रम्य॥
दिव्याताई दिव्यत्व चेहर्यावरी॥ घेऊनी आली॥
लक्ष्मीची पाऊले घरी टेकली ॥ जीवनी तुषाराच्या॥
ती जीवनसाथी, जीवनसंघिनी दादाची॥ मंगलमय दिनी मंगलक्षणी ॥
गेले सारे आनंदुनी॥ सोहळा पाहुनी रम्य॥
साथ सदैव जीवनात ऐकमेकाची राहो॥ हातात हात राहो॥
आनंदी मन राहो॥ सदा दोहोचे॥
डोयीवरी पडतील अक्षता॥ सनई चौघडे वाजतिल॥
मंगलमय मंगलाष्टके गुंजतिल ॥ रम्य सोहळा पार पडेल॥
खुप खुप आशिर्वाद
चि. तुषार व चि. सौ. का. दिव्यास
🚩🚩🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍦🍫🍦🍫🍨✡🥩🚩🚩🚩
मोहन सोमलकर व परिवार
❇❇❇©️®️❇❇

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.