मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

बुधवार, २७ जुलै, २०२२

गणेश वंदन

 साहित्य स्पंदन आयोजित उपक्रम 

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

अभंग 🚩गणेशनमन🌷🌷🌷




 गणेशा नमन ॥ तुझं मी करितो॥

प्रभाती गुंफतो॥ काव्यमोती॥१॥


आशिष द्यावेत ॥ तुम्ही एकदंता॥

आराघ्य देवता ॥ गणाधीशा॥२॥


आदी तुम्ही आहे॥ तुम्हीच हो अंत॥

पहिली पसंत॥ सुख कर्ता ॥३॥


पार्वती नंदन॥ शिवनंदन तु॥

आद्यपुजक तु ॥ हे गणेशा॥ ४॥


 जय अष्टविनायक, विघ्नविनाशक गणेशाय नम:

मोहन सोमलकर, सुप्रभात 🌷🙏⚘


मंगळवार, २६ जुलै, २०२२

जय महाबली बजरंगबली

 पवनसुत( अभंगरचना)


My gallery 

हे पवनसुता ॥ श्रीरामदुता॥

तुच शक्तीदाता ॥ बजरंगी॥


हे अंजनीसुता॥ किती रामभक्ती॥

तुझ्या अंगी शक्ती॥ धन्यदेवा॥


शक्तीचा देवता॥ दुख दुर कर्ता ॥

तुच करविता॥ हनुमाना॥


बल बुध्दी दाता॥ तु रक्षणकर्ता ॥

मार्ग दाखविता॥ हनुमंता॥


ऐकावी ती गाथा॥ सितेला शोधाया॥

निघाला उडाया॥ वायु मार्गी ॥


किती ते समुद्र ॥ पार तु करुनि॥

सितेला शोधुनी॥ तु लाविले॥


मुखी नाम राम॥ करे जयजय ॥

तुझी भक्ती काय॥ सर्व जगी॥


 तु परमभक्त॥ राम जानकीचा॥

ह्दयात तयांचा॥ मान ठेवे॥


रामजानकीच्या ॥ चरणी राहुनी॥

महती गाऊनी॥ केली भक्ती॥



जय जय श्रीराम 🌿🌷

जय जय बजरंगी🙏🙏🙏🙏✍🌿🌷

मोहन सोमलकर 



ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...