मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

आधारस्तंभ

 


My gallery 

आजीने माझ्या नातवंडाचे बालपण खुप जपले

नातु,पणतुंचे बालपण जपले ,अशा आवडत्या व्यक्तीवर मी स्त्रीची यातना ही प्रतिलिपीवर ३५ भागाची कथा लिहिली .

आता ही कविता तिच्यावर□□□□□□


आजी•••••••••।


हाताचा झोपाळा बनवुन झुलवायची

जुनी लोकगिते गाऊन झोपवायची

खांद्यावरी आपल्या ती निजवायची

कधीच नाही ती या कामात कंटाळा करायची


पाझर मनी सदा तिच्या प्रेमाचा फुटायचा

हृदयात तिच्या नातवंडाप्रती स्नेह दरवाळयचा

कधीच नाही ती मनाने व तनाने थकली

घास आम्हास भरविल्या विना नाही ती झोपली


सदा तिची धावपळ आमच्याप्रती असायची

कधी कडेवरी,कधी खांद्यावरी घेऊन

भर मुसळधार पाऊसात स्वतः ओली होऊन

आम्हाला पदरात झाकुन आणायची.!


उन्हात ती तापायची,पायात वाहने नसायची

मोठी झाली नातवंडे ,तरी बिचारी कुठे

शांततेने झोपायची

ती तर सतत चिंताच करायची..!


आता ,आजी नव्वदी पार करुन खाटेच्या स्वाधीन झाली..!

मेहनत, कष्ट करणारी माझी आजी

चटणी भाकर खाणारी

रोजच दहा किलोमीटर पायी चालणारी

पाय लुगड्यात अडकुन रात्री पडली

ती आता बेडवरचीच कायमची झाली..!


आता कोण तिच्याशी बोलणार

कोण तिला खेळवणार

तिच्याशी कोण गप्पा गोष्टी करणार

सवॅच आहे कामात बिझी

पण बिचारी ती अजुनही थकली नाही

कणखर आहे  बोलण्यात , सुदृढ आहे विचारात

ती तरी वाकणार नाही..!

आहे आवडती ती......,!

म्हणते  मी अशीच मरणार..!

पायाचे आॅपरेशन नाही करणार..!


मोहन सोमलकर

🙏🙏🙏🙏🙏



जीवन

 ❤️🌹💚

            

*!! तरी पण- - -* 

*मी अजूनही -*

 *- मस्त आहे !!*

          

*! मस्त आहे,जरुर वाचा !*


💚 *वय झाले पण अजून उत्साह - मस्ती तसी गेलीच

My gallery 

नाही.* 

*विचार धावतात सैरभैर, पण शरीर साथ देत नाही.*

*कळत आहे,* 

*पण वळत नाही.* 

*कुणावर विश्वास ठेवायचा तेच मात्र आता* -- -

*समजत नाही.*

*कारण माणसं दिसतात, तशी मुळीच नसतात.* 

*हे आता चांगलंच*

 *समजलं आहे.* 

*तरी पण मी मस्त आहे.* ....


काय होतय सांगता येत नाही. 

दुखतात गुढगे पण सांगायचे नाही.

कुणाकडे जाता येत नाही. 

सावकाश चालायचे हेच आता उरले. 

*तरी पण मी मस्त आहे* ....


थकले शरीर जरी 

नजर अजून शाबूत आहे.

थकल्या जीवाला 

थोडी उभारी देत आहे.

*तरी पण मी मस्त आहे*....


दात पोखरून टोप्या घातल्यात.

तेंव्हा कुठे दातदुःखी थांबली. 

कुस्करून खाल्ले ,

तेव्हां पचायला लागले. 

*तरी पण मी मस्त आहे*....


वाचायला घेतले तर जरा धुरकटच दिसते. 

*चष्मा लावला तर पाणी सुटते.* 

डोळे पुसत वाचण्यापेक्षा 

न वाचलेले परवडते. 

*तरी पण मी मस्त आहे*....


लिहायला घेतले तर हात कापतात.

शब्दांवरच्या रेषा सरळ कुठे येतात ??. 

साधी स्वाक्षरी पण धड येत नाही. 

चेक मात्र अजून परत येत नाहीत. बॅंकेत जाण्याचा त्रास होतो तसा, पण पर्याय नाही. 

*तरी पण मी मस्त आहे.*....


काळे-निळे मोजे उलटून सुलटून पहातो, 

तरीसुद्धा कधीतरी रंग धोका देतो. 

उलटा बनियन कधीतरीच असतो, 

तरी बरे तो आत झाकला जातो. 

*तरी पण मी मस्त आहे.*....


कानात हुंकार वाजत असतात. 

शब्द अस्पष्ट ऐकू येतात. 

अनुभवाने समजून घेतो. 

आणि मगच उत्तर देतो. 

 *तरी पण मी मस्त आहे.*....


वाचायला घेतले तरी लक्ष लागत नाही. 

वाचलेले तसे लक्षात 

येते. पण काहीतरी नवीन लिहून काढावे असेही वाटते. मात्र तसा मुड अजूनही येत नाही. कारण संगीताची - गाण्यांची आवडच संपूर्ण वेळ घेते. 

*तरी पण मी मस्त आहे.-* 


मित्रां-शिवाय कुणाला मी काही सांगत नाही. 

समदुःखाची कथा बाकीच्यांना पटणारही नाही. 

*तरी पण मी मस्त आहे.*....


*बरेच आयुष्य जगून घेतले.,* 

*पहिले काहीशा दुखाःत,*

 *तर बाकी सुखात* 

*आणि तेही अगदी पॉश.* 

*कारण बराच काळ होतो* 

*ना आॉफीसात मी बॉस.*


*अजून -बरेच- आयुष्य* *बाकी आहे. मात्र शरिराचे* *नट-बोलटींग तसे ढिले होत चालले आहेत. तरी पण उरलेले दिवस, वर्षे सुखात जावेत* 

*येवढीच इच्छा बाकी आहे.* 

*तरी पण अजूनही मी मस्त आहे.*....- - 


संसाराचे सारे पाश 

आता पूर्ण सोडायचे आहेत.

*उरलेली पुंजी संपे पर्यंत*

आनंदी जगायचे आहे.

*तरी पण मी मस्त आहे.*....


आपल्याच धुंदीत पण 

प्रामाणिकपणे जगलो आहे. 

पाहिजे ते मिळवले आहे.

उपभोगून आयुष्य, सारे

गात्रे शिथिल होत चालली आहेत.

*तरी पण मी मस्त आहे.*....


आयुष्यात काहींनी नी साथ दिली, काहींनी मधेच साथ सोडली, तरी 

कुणाचंच काही अडलं नाही.

 *सर्वांचा मी आभारीच* *आहे.-* - 

*तरी पण मी मस्त आहे.*....


प्रत्येक जण एकदाच जन्म घेतो आणि मरतो.

जन्म घेतांना स्वतः रडतो. बाकी खुश होतात.

मरतांना आपण शांत असतो. 

बाकी काय करतात,काय करतील,?!? याची चिंता नाहीच नाही.

*तरी पण मी मस्त आहे.*....


बीपी, शुगर, सांधेदुखी 

हे आता सर्व सोबत आहेतच. 

त्यांनाही मित्र म्हणूनच सांभाळतो आहे. 

    *तरी पण मी मस्त आहे.*

 

*भार कुणावर टाकायचा नाही. झटपट मात्र जाणार नाही. शंभरी पुर्ण* 

*(100 yrs) करण्याचा निर्णय पक्का झाला आहे.* 

*होतो आहे तसा थोडा थोडा त्रास.,,, -- - + -* 

*तरी पण मी मस्त आहे.*....


 *मी मस्तच रहावे,*

*असेच मला सारखे वाटते. ....*

*कारण अजूनही* 

*मी उत्साही-मस्तच आहे.* 

    💖💞💖

*तुम्ही देखील* 

*उत्साही - मस्तच रहा,* 

*आनंदात रहा,*

*निरोगी रहा.* 

           +++

*सर्व सन्माननीय*

 *जेष्ठ-नागरीक*

 *समकालीन बंधूंना* 

 *सस्नेह समर्पित...*

         👍👍👍

*! सबका मंगल हो* !

*! सबका कल्याण हो !* 

        👍❤️👍

*Take care the most.*

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...