वन्यजीव प्रेमी मारुती चितमपल्ली (एक व्यक्तिमत्व)
आपण ॠषी म्हणुन फक्त पुस्तकात वणॅन पहातो, वाचतो.त्याच्या जीवनावरील चित्रपट, चित्रफित पहातो पण हा एक जिता जागता अरण्यऋषी आहे. जो ना जाणे कितीतरी उपाधीने आणि बिरुदावली विभुषित आहे. आज या अरण्यऋषीच्या जीवनावर प्रकाश टाकणे अगत्याचे आहे. तेव्हाच कुठे आपल्या नविन पिढिला त्यांच्या कायाॅचे महत्त्व पटेल. त्यांच्या कायाॅची जाणिव होईल.
अरण्यऋषी, वनप्रेमी, पक्षीप्रेमी, प्राणीप्रेमी,जंगल अभ्यासक, प्राणीहितचिंतक अशा कितीतरी उपाधीने त्यांना विविध क्षेत्रातुन विभुषित केले.
कुठल्याही मानाची, सन्नमानाची अपेक्षा न करता गेली चार तपापासुन हा महामानव देशाच्या विविध जंगलातुन एकटा हिंडत, फिरत कधी अनवाणी पायाने तर कधी सहकार्यांसोबत संशोधन करित राहिला.
वन्यजीव प्राणी व पक्ष्यांचा अभ्यास
सतत पाण्यापाऊसात, उन्हात, थंडीत मारुती चितमपल्ली हे जंगलात वावरणाऱ्या प्रत्येक प्राण्यांचा आणि पक्षांचा अभ्यास करु लागले. प्रत्येक ऋतुत अरण्यात कोणते पक्षी स्थलांतर करुन येतात. कोणकोणते प्राणी किती आयुष्य जगतात. प्रत्येक पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आयुष्य हे किती दिवसाचे , महिन्याचे, वर्षाचे असतात .याचा सवॅ अभ्यास आपल्या चार तपाच्या अभ्यासात केला आहे.
त्यांची लिहलेले अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. लहानपणी शाळा शिकत असतांना मी एका पुस्तकातील धड्यामध्ये जंगलप्रेमी मारुती चितमपल्ली बद्दल वाचले होते.
त्यांचे...........................
" रानवारा"हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे.
तसेच "पाखरमाया" , आनंददायी बगळे, जंगलाचे देणं." इ. अनेक कथासंग्रह प्रसिद्ध
आहे. जर तुम्हाला ती भेटलीत तर जरुर वाचावी.
त्यांच्या कथासंग्रहात विभिन्न जंगलविषयक झाडांनविषयक व प्राणीपक्षीविषयक घडामोडी लिहल्या आहे.
असा
तब्बल साडेचार तप विदर्भातील जंगलांनी चितमपल्लींना अन् त्यांनी जंगलांना, वन्यजीव, तसेच अरण्यात राहणार्या माणसांना सांभाळलं. वनाधिकारी म्हणुन तब्बल ३६ वषॅ वनखात्यात काम करतांना जंगलाचा संबंध आला तसाच ती जंगलं सांभाळणार्या माणसांशीही त्यांचा संबंध आला.
चितमपल्ली १९९० मध्ये अमरावती जिल्ह्य़ातील मेळघाट मधुन निवृत्त झाले.
तोवर पक्षी जाय दिंगतरा, जंगलाचं देणं, केशराचा पाऊस, अनुभवूनव लिहुन झाला होता.
नंतर तीस वषाॅपैकी बहुतेक काळ त्यांनी नवेगावबांध, नागझिर्यात काढला.
नागपुवरवरुन सहाशे-साडेसहाशे किलोमीटरच्या, महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावरच्या सोलापूरच्या जन्मभूमीची ओढ चितमपल्लीच्या चेहर्यावर दिसत होती.
त्यासाठी ते वधॅवरुन थेट आशुतोष शेवाळकरांच्या घरी नागपुरात पोहचले. ८८ वर्षाचे मारुती चितमपल्ली थोडे थकलेले , कोरोना विषाणू पासुन बचावासाठी डोक्यावर शिल्ड घातलेले हळुहळू कोचावर येऊन बसले व गप्पांचा फड चालु झाला.
पक्षीकोश पुणॅ झालाय. वॄक्षकोशाच॔ महाराष्ट्रापुरतं काम झालयं. मत्यकोशाचं बरच काम कोकण किनार्यावर पुणॅ झालं थोड बाकी आहे ते आता सोलापुरात पुणॅ करायच असे चितमपल्ली बोलु लागले.
वॄक्षकोशाचं अन् मत्सकोशाचं उरलेलं काम ते सोलापूरात पुणॅ करतील.
म्हणूनच जन्मभूमीतला एकांत त्यांना खुणावत असावा. हा निसगॅवेडा शब्दपुजक आयुष्याचे शतक ओलांडेल अशी त्यांच्या साठी सवाॅनी प्राथॅना करुया.पुढच्या दिडेक दशकात मराठी निसगॅसाहित्याच्या खजिन्यात आणखी मोलाची भर टाकिल . नव्या पिढ्यांना निसगॅ अभ्यासाची, निरीक्षण ची अन निसर्गातल्या सौदयॅ, गुढ, रंजकता, अदभुता असं सारं काही कागदावर उतरवण्यासाठी नक्की प्रेरणा देत राहील.
असा निसर्गप्रेमी पुन्हा या भूतलावर होणे नाही. हेच व्यक्तीमत्व जर इंग्लंड, जापान, आफ्रिका किंवा आस्टेलिया मध्ये जन्मलेले असते तर त्यांना किती बहुमान मिळाला असता. ही खंत त्यांना नाही तर त्यांच्या प्रेमींना वाटते.
मारुती चितमपल्ली यांना भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त करताना जेष्ठ लेखिका आशाताई बगे. यावेळी उपस्थित आशुतोष शेवाळकर, विजयाताई शेवाळकर, मनिषा शेवाळकर.
सर शतायुषी होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
मोहनिल
खूपच सुंदर माहिती मिळाली हा लेख वाचून... मारुती चितमपल्ली हे खरंच भारतरत्न आहेत... त्यांचं वन्यप्रेम अद्वितीय आहे... त्यांच्या या कार्याला त्रिवार वंदन🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप मस्त माहिती दिली सर खूप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद सुरज 🙏👍
हटवाखूपच सुंदर माहिती
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर माहिती मिळाली.
उत्तर द्याहटवाखुप माहिती दिली आहे सर
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद आपले🙏🙏🙏😊
हटवाखुप छान माहिती दिली आहे मोहन सर
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर व सुरेख माहिती दिली सर👌👌👌💐💐💐
उत्तर द्याहटवापुढील रचने साठी शुभेच्छा💐💐💐
देव प्रेम कवी....✍️
अतिशय सुंदर व सुरेख माहिती दिली सर...👌👌👌
उत्तर द्याहटवापुढील रचने साठी शुभेच्छा...💐💐💐
देवेंद्र... प्रेम कवी
खुप खुप धन्यवाद देव सर
हटवाखुप खुप धन्यवाद आपले मेघा मॅम 😊🙏🙏
उत्तर द्याहटवा