मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

मृगजळच ते फसवे..!

 

  • मृगजळच ते जीवन फसवे..!


सगळे सुख दारात लोळत असते,सर्वांच्या चेहर्‍यावरले हसु रोज सुर्याच्या पडणाऱ्या सोनेरी किरणांबरोबर उगवते, आणि मग ते दवबिंदू सारखे चेहर्‍यावर टिकून राहाते.सतेल,सतेज ते मनाला खुप समाधान देत राहते. प्रत्येक जण आपल्या जगात शांतपणे असलेल्या परिस्थितीत समाधान मानुन रमलेला होता.

       दुःख तर प्रत्येकालाच आयुष्यात असते. पण त्या दुःखाला बाजुला सारून किंवा डोक्‍यातुन काढून प्रत्येक माणुस जरा दुःखातही आनंद शोधत असतो. हाच खरा जीवन जगण्याचा नियम आहे.
       अहो सुख काय असते... ते पुर्ण काळ टिकणारे कायमचे आंब्याचे लोणचे नाही. किंवा उन्हाळ्यात केलेले तांदूळाचे, ज्वारीचे पापड नाही, जे सदा टिकुन राहिल..!

" सुख म्हणजे कोणत्याही गोष्टीत शोधलेले समाधान " नाहीतर हे समाधान आपण शोधले नाहीतर ते सुख मृगजळासारखे आपल्यापासून जिथे दिसेल तिथून पळुन जाईल.
   जीवनात स्पर्धा करा, स्पर्धा ही हविच पण स्पर्धेत माणुस अर्धा नाही झाला पाहीजे. तो टिकुन राहिला पाहीजे.

      आणि जीवनाच्या शयॅतीत जो टिकुन राहिला, तोच सदैव पुढे गेला.

         जेवढे सबक आपण जीवनाचे आयुष्यात कधी शिकलो नाही, तेवढे आपण या कोरोना काळात शिकलो.
        कोरोना महामारीने गरीब-श्रीमंती नाही पाहिली.,  उचनिच पणा नाही पाहिला.,शिक्षित-अशिक्षित पणा नाही पाहिला.  तर  तो आपल्या कव्येत एखाद्या जंगलात लागलेल्या वणव्यात सगळ्यांना होरपळत घेऊन गेला.

       नभुतोनभविष्येती अशी महामारी कधी दिसेल.  जी या दोन वषाॅत दिसली. घरेच्या घरं, कुटूंब,  गाव उद्वस्त झाली.
        
         सगळ्यांना जीवन काय असते,आणि किती ते मौल्यवान असते. हे शिकवुन, अजुनच शिकवत आहे. घरचा कर्ता पुरुष, आई जाते,मुले उघडी पडतात,तर कुठे मुलगा एकुलता एक गेलेला असतो. आणि बायको,मुलं व वृध्द आईवडिल निराधार झालेले असतात. परके तर सोडाच पण जवळचे भाऊबंध मदत करत नाही, येऊन पाहात नाही, एवढेच काय अंतेष्ठी साठी सुध्दा घाटावर येत नाही.
      एवढा प्रकोप जिवंत व मेलेल्यांच्या मनावर या महामारीने केला. व मरणानंतर आयुष्य स्वकियांचे कसे देशोधडीला लागते. ते आपण शिकलो. एक आईवडिल कोरोनामुळे पाच दिवसाच्या अंतरावर गेले. मागे सोडले ते कुटुंब  दोन शिक्षणाचे मुलं एक बीई ला आहे, एक बी.एस.सी. ला, आणि बहिण m.b.b.s. करत आहे . रोज अभ्यास करायला चाढेचारला तिचे बाबा पहाटेला उठवायचे, आणि आपणही तिच्यासोबत पुस्तक वाचायचे. बाबाचे स्वप्न होते. मुलगी डाॅक्टर बनावी म्हणुन.   ! ती तेरा तास अभ्यास करायची.

       आता आईबाबा गेले ,संपले सगळे !!
वडिलांच्या जागेवर लागण्याचा मुलाने प्रयत्न केला पण,तो असफल झाला!मिळेल ते काम करावे व उर्वरित बहिणचे शिक्षण पुणॅ करुन बाबांचे स्वप्न पुर्ण करावे.
      पण नोकरी मिळेना. बिचारे आजच्या पेन्शनवर जगत आहे.
      वडिल चांगल्याच पदावर होते. पण कोणी मार्गदर्शन व मदत करायला तयार नाही.
       अशी बिकट परिस्थिती या महामारीने आणुन  प्रत्येकाच्यांच जीवनशैलीला कलाटणी दिली..!
     

    म्हणून माणसाने जीवनात
    कधीही अहंकार करु नये
पैसा वेळवर कामात येत नाही.
माणुसच धाऊन येतो..!

"एकमेकां सहाय्य करु
अवघे धरु सुपंथ...!!"

धन्यवाद!
मोहन सोमलकर 🙏🙏


३ टिप्पण्या:

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...