तडजोड ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. दत्तु जोशी हे व्यक्ती दिव्यांग होते. मनाने साधे सरळ जीवन जगणारे. घरची परिस्थिती
साधारणच होती. एका मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्यात ते काम करुन आपली उपजीविका करत. त्यांच्या कायाॅवर घरातल्या मंडळींला खुप अभिमान होता.
त्यांच्या दिव्यांगतेवर त्यांच्या बायकोने कधीच प्रश्न केला नाही किंवा त्यांना कधीच कमीपणा भासू दिली नाही उलटपक्षी दत्तुजीची पत्नी महिला बचतगटा अंतर्गत पापड लाटायला एका ठिकाणी जायची. तेवढीच कुटुंबात मदत व्हायची.
दत्तु जोशींना एक मुलगी होती. गावापासून दुर सहा किलोमीटर दुर पायपीट करुन शाळेत जायची मुलगी रंजना अभ्यासात खुप हुशार होती. वगाॅत तिचा दरवर्षी पहिला नंबर यायचा . घरचे सवॅ कामे करण्यात आईला मदत करुन ती बाकी वेळेस, तर कधी रात्र जागून आपला अभ्यास
करायची.
दत्तुजीला आपली मुलगी पायपीट करुन शहराच्या ठिकाणी शाळेत जाते. त्यामुळे तिला त्रास सहन करावा लागतो व तिचा,जाण्यायेण्यात वेळही जातो.
याचे खुप वाईट वाटत होते. एक दिवस
त्यांनी त्यांच्या बायकोला मुलीसाठी जुनी सायकल घेऊ या. म्हणुन चर्चा केली.
सायकल घेण्यासाठी त्यांची पत्नी तयार झाली. जुन्या सायकलसाठी पैसे जमवाजमव सुरु झाले.
आपल्याला शाळेत जायला सायकल मिळणार या आनंदात रंजना खुप खुश होती.
ती आईला बिलगुन आनंद व्यक्त करु लागली.
एक दिवस तिचे वडिल शहरात जुनी सायकल घ्यायला गेले. शहरातील सायकलच्या दुकानात सायकल पाहुन तिची किंमत दुकानदाराला दत्तुजीने विचारली असता., दुकानदार दत्तुजीला भाव देत नव्हता. त्याने दत्तुजीला वागणुक बरोबर दिली नाही. हे कृत्य तिथुन जाताजाता गटविकास अधिकारी दुरुनच पाहत होते.
त्यांनी दत्तुजीची सवॅ शहानिशा केली. व त्वरीत त्या गरिब मुलीची शिक्षणाबद्दलची जिद्द पाहुन व वडिलांची मुलीला शिकविण्याची जिद्द पाहुन नविनच छान सायकल त्या मुलीला म्हणजेच रंजनाला घेण्याचे ठरविले.
अशाप्रकारे दत्तुजी जोशीचे मनोबल वाढवून गटविकास अधिकाऱ्याने त्या मुलीची व दिव्यांग वडिलांची पाठ थोपटून शाबासकी दिली.
व आदराने त्यांना नविन सायकल भेट करुन समाजात माणुसकीचे ताजे उदाहरण देऊन अजरामर केले....!
धन्यवाद !
समाप्त
=========================
लेखक:- मोहनिल (मोहन सोमलकर)

सुंदर शब्दांत लेखन...✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासकारात्मक विचार लिहिले दादा!बीडीओ सरांचे अभिनंदन!💐
धन्यवाद ताई
हटवाखूप छान प्रेरणा देणारी👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद खुप
हटवाव्वा...खूप खूप सुंदर लिहिलंय👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप प्रेरणादायक लिहिलंय....... 🙏
उत्तर द्याहटवा