मोहन सोमलकर

मोहन सोमलकर कवी कवयत्री समुह लिपीनाते जपणारी शब्दांच्या पलीकडली माणसे जोपासती हेची काव्य पुष्प.

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

माझ्या प्रश्नाचं काही नाही करता येणार..?

 



         काचा त्यांच्या चष्म्याची पुसटशी झाली होती, त्या चष्म्यातून त्यांना धुसरच दिसत होते. शर्ट जुनाट होता पण ,छान धुतलेला.....स्वच्छ केलेला होता....! पॅण्ट पण जुनाटच होता. पायातली चप्पल पुरतीच खालून घासुन घासुन पातळ झाली होती.
सायकल त्यांची खुप दिवसाची रक्ताचे नाते असल्यासारखी....! सहचारिणीची जागा घेतल्यासारखी सदैव साथ देत होती..!
    अपार मेहनत करुन मुलाबाळांसाठी,त्यांच्या शिक्षणासाठी कवडी कवडी जमा करत,  घरातही सरपणाचा प्रश्न सोडवत..! अनेक प्रश्नांचा बोजा आयुष्यभर डोक्यावर घेत घेत जीवन जगत.  अनेक उद्भवणाऱ्या मनातील प्रश्नाला स्वतःच उत्तर देत व शोधत काका .... आपल्या सायकलींचे पायडल मारत आपल्या विचारात चालले होते. हा संसाराचा गाडा, हे मुलांसाठी चाललेले कष्ट, अजुन किती दिवस करावे लागणार.? माझ्या प्रश्नाचं, काही नाही करता येणार..? या प्रश्नाअंती ते एका कडुनिंबाच्या झाडाखाली थबकले...!

        तेवढ्यात त्यांना एका मुलाने त्यांना थांबून आवाज दिला........! बाबा तुम्ही इथे काय करता..? आपल्याला कोण आवाज दिला म्हणुन काकांनी खाली असलेली मान वर केली व आपल्या धुसर चष्म्यातून त्या मुलाकडे पाहु लागले..?
    मुलगा बोलला चला बाबा घरी मला लठ्ठ पगाराची नोकरी लागली...! आपण दगडुशेठ हलवाई कडुन तुमच्या पसंतीचा मैसुरपाक घेऊ...!
      काकांच्या मनात उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नाचे उत्तर काकांना मिळाले होते...!


धन्यवाद
मोहन सोमलकर 🙏🙏🙏🌿


६ टिप्पण्या:

  1. अप्रतिम रचना ����������������

    उत्तर द्याहटवा

तुमच्या बहुमोल समिक्षा आम्हास प्रोत्साहन देतात.

ads3

सातपुडा साहित्य मंच..

>तपुडा साहित्य मंच आयोजित साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळावे करिता लेखन उपक्रम *विषय- विठूची वारी (अभंग) शीर्षक:- माझ...